नक्कीच
वाचा, विचार करा...
मुलगा नुकताच आफिसमधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचा आजार असतो. ते विचारतात, “बेटा माझी औषधे आणली काय? कालपासून संपली आहेत.” मुलगा, “मी आज खूप थकून आलो आहे, मी उद्या घेऊन येईन.”
बाप : “ठीक आहे बेटा, तू आराम
कर, खूप थकला असशील” (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो. घरी औषध नसल्याने त्यांना दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्यांच्या मृत्यू होतो.)
काही दिवसानंतर मुलाला त्याच्या रुमची सफाई करताना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते. त्यात त्याला 30 वर्षे अगोदरची एक लिहलेली नोंद सापडते. ती असते, “आज माझ्या
सोन्याला ताप आला होता. टॅक्सी न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेताना थोडा त्रास झाला, पण माझे
बाळ आता शांत झोपी गेला आहे... (वेळ: रात्री दोन वाजता)”. त्या
मुलाच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले होते. आता सर्व संपले होते.
तुमच्या आई-वडिलांना कधीच दु:ख देऊ
नका. तुम्ही आज जे काही
आहात ते त्यांच्यामुळेच. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे कधीच वागू नका.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा