मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

29. कॉफी

     त्याला ती एका पार्टीला भेटली. खूप सुंदर होती ती. साहजिकच तीच्या मागे खूपजण होते. ती सुंदर होती, बुध्दीमान होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणाला जवळीक साधू देत नव्हती. तो फार साधा, आर.के. लक्ष्मणसारख्या कॉमन मॅन सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुलीतर चंद्राइतक्या अप्राप्यच ! तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हते त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती ! पण आपण धाडस करायचं असं ठरवून सारे बळ एकवटून त्याने तिला विचारले, तू पार्टी संपल्यानंतर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील? तिला नाही म्हणणे फारच सोपे होतं. पण त्याच्या डोळयातले नितळ , पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणून तिला का कोण जाणेहोम्हणावसं वाटलं. ती  होम्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीने वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता.
     जवळच्या कॉफी पार्लरमध्ये दोघे कोपऱ्यातल्या टेबलावर बसले. कॉफीची ऑर्डर दिली पण काय बोलायचे हे त्याला सुचेचना ! तो खूपच नरवस झाला होता आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं असंही मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्याने टेबलाजवळ येऊन उभा राहिला. तो म्हणाला, थोडं मीठ देता का? मला कॉफीत टाकायचं आहे. सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहू लागले. तीसुध्दा! वेटरनं मुक्याटयानं मीठ आणून दिलं. आणि देताना कैसे कैसे लोग आते है! अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ ! अखेरीस तीनं विचारलं, तूला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?  माझं लहानपण समुद्राकाठी गेलं. शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला. सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची. तसा मी धावत धावत व्हरांडयात येई. आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्राकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणीच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते. भरलेल्या डोळयांनी तो म्हणाला. तिच हृदय भरुन आलंत्याच्या निरागसतेनं. किती हळूवार होतं त्याचं मन. मग तिही बोललीआपल्या दूरवरच्या घराबद्दलबाबांबद्दलतिच्या स्वप्नांबद्दलखरचंखूप छान डेट झाली ती ! मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं,  हाच आपला जीवनसाथी.
        तो शांत होता. संयमी होता. हळूवार होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं.  चार चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खूप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरचं त्याचं आयुष्य खूप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा आणि हो, त्याच्या बालपणाची त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमूटभर मीठही टाकायची त्या कॉफीत ! अशी भरर्कन 40 वर्षे कधी निघून गेली कळालंच नाही. एके रात्री तो झोपला ते कधीच उठण्यासाठी. काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करु लागली. एकदा सहज म्हणून त्याचं पुस्तकाच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसांत त्याने ती कधीतरी लिहली होती. माझे प्रिये मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो. त्याबद्दल मला क्षमा कर. हे एकदा असत्य मी तुझ्याशी बोललोपहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला जाणवत राहिली. पण मी तुला कधी खरं सांगण्याची हिंमत करु शकलो नाही. केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमवून बसेल या भीतीने ! प्रिये आपण सर्वप्रथम जेंव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो तेंव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरंतर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नरवस झालो होतो की, मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरुन आपलं संभाषण सुरु झालं म्हणून मी तसंच पुढं चालवून घेतलंखारटं कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती ! पण मला तू खूप आवडतेस आणि तूला गमवू नये म्हणून आयुष्यभर मी खारट कॉफी पीत राहिलो.  आता मरण्याआधी  मी तुझ्याशी सत्य उघड केलंच पाहिजे. नाहीतर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही. प्लीज ! मला माफ करशील
          स्वप्न थांबवलीत की आयुष्य थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...