गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

57. जर खरोखरच कोणत्याही गोष्टीला मनापासून मागितलं तर

 मुलगा : मला वाटते आता आपण दोघेच ह्या जगामध्ये राहिलो आहोत. कारण माझे सगळे
           मित्र प्रेमात आहेत.  
मुलगी : मलाही असंच वाटते कारण माझ्याही सर्व मैत्रिणी  प्रेमात आहेत.
मुलगा : आता आपण काय करायचं?
मुलगी : आता आपण एक खेळ खेळूया.
मुलगा : खेळकोणता खेळ?
मुलगी : तीस दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनूया. ठीक आहे.
मुलगा : ठीक आहे.
          पहिले एक ते पाच दिवस ते सिनेमा पाहतात, भरपूर फिरतात. सहा ते पंधरा दिवस सर्कसमध्ये भूत असलेल्या हवेलीमध्ये ते जातात. ती खूप घाबरते आणि त्याचा हात पकडते. पण नंतर लक्षात येत की, तिनं चुकून दुसऱ्याचाच हात पकडला आहे.  दोघेही हसतात. बाहेरच एक ज्योतिषी बसलेला असतो. ते आपले भविष्य त्याला विचारतात. तो म्हणतो, तुम्ही लवकरात लवकर लग्न करुन घ्या आणि आनंदात रहा. आणि तो ज्योतिषी रडायला लागतो. सोळा ते अठ्ठावीस दिवस ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्यांना दिसते. एकोणतीसावा दिवस पुन्हा त्याच बागेत येऊन बसतात. मुलगा तिला मी तुला सफरचंदाचा रस घेऊन येते असे म्हणून तेथून निघून जातो. वीस मिनीटानंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो म्हणतो, तो मुलगा तुमचा बॉयफ्रेंड आहे का? मुलगी म्हणते, हो. का? काय झाले? अनोळखी माणूस, त्याला एका गाडीने उडविले आहे तो खूप गंभीर अवस्थेत आहे. हरणाच्या गतीने ती अतिशय दु:खी होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते. एकोणतीसावा दिवस रात्री अकरा वाजून सत्तावन मिनिटांनी डॉक्टर बाहेर येतात त्या मुलीच्या हातात सफरचंदाचा रस एक पत्र देतात. ती ते पत्र वाचायला सुरवात करते. त्यात लिहलेलं असतं, हे एकोणतीस दिवस जे मी तुझ्याबरोबर घालवले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते . मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा अशी माझी इच्छा होती. मुलगी रडू लागते. नाहीमी तुला मरु देणार नाही. चांदणी पडल्यावरच मी तुला मागितले  होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आता मला कळाले, तो ज्योतिषी का रडला होता? पण मी तुला मरु देणार नाही. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आय लव यूआय लव यूआय लव यू व्हेरी मचएवढ्यात रात्रीचे बारा वाजतात. मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते. तो तिसावा दिवस होता. कोणीतरी खरचं म्हटलं आहे की, अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो तो पुरी  कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...