बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

40. जपून पाऊल टाक

        एक होता तो एक होती ती. दोघात खूप प्रेम होते. एके दिवशी ती त्याच्या घरी आली आणि त्याला म्हणाली, मला सोडून तर जाणार नाहीस ना? तेंव्हा तो म्हणाला, मी जर तुला सोडून गेलो तर तू मला शोधून काढशील. ती म्हणाली, मी तुला शोधून काढू शकेल पण तुला मिळवू शकणार नाही. हे ऐकून त्याचे डोळे पाण्याने भरुन आले. ती निघून गेल्यानंतर त्याने आपले दोन्ही पाय  तोडून टाकले. दुस-या दिवशी जेंव्हा तिने त्याला ह्या अवस्थेत बघितले तेंव्हा तिला अश्रू अनावर झाले. त्यावर तो तिला म्हणाला, आता तर ठीक आहे ना, आता मी तुला कधीही  कुठेच सोडून जाणार नाही. तो व्हीलचेअरवर बसून होता.
     एके दिवशी त्याच्या घरी तो लिखाण करत बसला होता. ती आली दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. थोड्या वेळानंतर अचानक सर्वकाही हालू लागले. भांडी, घरातील इतर वस्तू खाली पडू लागल्या. भूकंप होत आहे याची दोघांना जाणीव झाली. तो तिला म्हणला, तू इथून लवकर घराबाहेर निघून जा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांब. मला लगेच बाहेर येता येणार नाही. तुझा जीव वाचव. जा.. पळ लवकर. ती म्हणाली स्वत:ची काळजी घे. ती लगेच तेथून निघून गेली. थोड्या वेळाने भूकंप थांबला. ती लगेच त्याच्या घरी आली. पाहते तर त्याच्या मृत्यू झालेला होता. पण त्याच्या हातात एक वही होती. मृत्यूच्या अगोदर त्याने त्याच्या वहीत लिहले होते, एकदाच जर तू म्हणाली असतीस की मी तुला सोडून जाऊ शकत नाही तर कदाचित  हा भूकंप आपले काहीच  बिघाडू शकला नसता
           प्रेम हे असेच असते. इथे प्रत्येक वाट आपली नसते. जपून ठेव विश्वास, इथे प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून निर्णय घे, इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो. जपून ठेव आठवण इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो. जपता-जपता एक कर. जपून ठेव मन, कारण तेच फक्त आपले असते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...