(एक मुलगी प्रेमात एका मुलाला फसवते. प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याच्या आई-वडीलांचे प्रेम.)
मित्रांनो, प्रेमात जेंव्हा विरह होतो, तेंव्हा तुटलेल्या मनाला, आधार लागतो आणि तेंव्हा आपणास खरा आधार मिळतो तो आपल्या जन्मदात्यांचा (आई-वडीलांचा). पण आईला आपल्या लेकराचे दु:ख
बघवत नसते,
तिला खूप
वाईट वाटत असते.
अशाच एका
विरहात दु:खी मुलाची आणि आईची मन:स्थिती मांडण्याचा
प्रयत्न करीत आहे.
खरे
तर
आई
आपले मन
बरोबर ओळखते पण
आईचे मन
ओळखणे तसे
अवघड आहे.
मुलगा म्हणतो,
आई……
तुझे हे
दु:ख नाही बघवत मला.
प्रेमात हारलेला मुलगा आणि
त्याची व्यक्त न
करता आलेली आई…….
हया सर्वात वडीलांना
आपल्या मुलाचे मोठे होणे थोडे उशिरा जाणवते.
आणि
जेंव्हा त्यांना आपल्या मुलाच्या तुटलेल्या प्रेमाच्या स्वप्नांबद्दल कळते,
तेंव्हा ते
धड
त्याच्याशी मोकळेपण संवादही साधू शकत नाहीत. ही सर्व मुलाच्या मनाची घालमेल वडील थोडे आशयाच्या बाहेर राहून हाताळत असतात. ही वडीलांची धडपड फक्त त्यांनाच माहित असते. आणि त्यामुळे मी अनेक प्रयत्न करुनही वडीलांची बाजू मांडू शकलो नव्हतो.
वडील म्हणजे व्यक्त न करता आलेली एक प्रकारची
आईच
!
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
पहाटे मी
जाताना गाढ
झोपेत असतोस,
आणि संध्याकाळी नेमकी माझी परतीची वेळ
साधून घर
सोडतोस,
कोठे जातोस तिन्ही सांजेला रोज,
मलाही सांग,
म्हणजे तिथे कधीतरी आपण
दोघे मिळून जाऊ.
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
आठवते तुला,
लहान होतास तेंव्हा,
मी परतल्यावर माझ्या हातून खाऊची पिशवी घेऊन हिसकवायचास,
तेंव्हा भले
तुझ्यावर राग
भरायचो मी,
पण मला
मात्र तू
नेहमी तसाच हवाहवासा वाटायचास.
सांग आता
काय
आणू?
म्हणजे तू
बाळा परत
धावत माझ्या मिठीत येशील.
तुला हवे
ते
शकय
असेल तर
देऊ,
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
काल तुला आईच्या कुशीत डोके ठेऊन रडताना पाहिले,
कसे सांगू त्या क्षणी मी
का-
काय
हरले?
अरे तुझ्या वयातून मीही गेलोयाच की
कधीतरी.
कधीतरी बघ
माझ्याकडे मन
मोकळे करुन,
मग
मीही साथ
देईन तुला.
बघेन मीही घटका-दोन घटकाभर रडून,
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
एखादा रविवार साधून तुला गाठेन म्हणतो,
तर तू
शनिवारीच रात्री मित्रांसोबत बाहेर निघून जातोस.
मग वाटते,
चला
बरेच झाले,
तुझे मन
तिथेतरी कदाचित जाईल रमून.
पण कधीतरी मला
भीतीही वाटते,
बरका!
कधी उचलू नकोस चुकूनही वाईट पाऊल.
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
अभ्यासाठीही कधीच पहाटे जागा न
होणारा तू,
हल्ली कधीतरी भल्या पहाटे जागा दिसतोस.
हळूच डोकावून पाहिले तर
डायरीत काहीतरी लिहताना दिसतोस.
काल मी
चोरुन तुझी डायरी वाचलीच.
त्यात लिहलेल्या
कविता वाचून न
राहूनही डोळे ओलावलेतही.
वाटले बोलावे,
“ छान लिहतोस, इंजिनीअरच्या
अभ्यासाबरोबर इकडेही लक्ष दे.
कवी हो,
आणि
झालाच तर
पुढे करिअर म्हणून निवड.”
पण नको, कवी हो सांगेन, पण कसे सांगू की, काहीतरी विरह विषय निवड.
पण एवढे मात्र आता
नक्की सांगतो,
बोलू आपण
हयाही विषयावर पुढे जाऊन,
काय चालू आहे
तुझ्या मनात,
तसे
थोडे मलाही ठाऊक आहे……
आणि अशा
प्रकारे वडील हा
विषय टाळून जातात,
पण
मुलाच्या मनातील तळमळ त्यांच्या मनातही एक
कळ-कळ देऊन जाते.
आपल्याला
काहीतरी मदत
हवी
असल्यास आपल्या आई-वडीलांकडे
आपले मन
मोकळे करा.
ते
आपल्या सुखासाठी नेहमी मदतीचा हात
पुढे करायला तयार असतात.
पण नको, कवी हो सांगेन, पण कसे सांगू की, काहीतरी विरह विषय निवड.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा