बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

56. फक्त सुंदर रुप म्हणजे प्रेम नव्हे

     एक मुलगा एका मुलगीवर खूप प्रेम करत होता. ती मुलगीही त्या मुलावर खूप प्रेम करत होती. मुलीने मुलाला पाहिलं होतं. पण मुलाने मुलीला पाहिलं नव्हतं. दोघेही फेसबुकवर ऑनलाईन भेटत होते. एक दिवस दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं आणि भेटण्याची वेळ ठिकाण पक्क केलं. मुलाने मुलीला विचारलं, मी तुला ओळखणार कसं? मुलगी म्हणाली, मी लाल रंगाचा ड्रेस घालेन आणि माझ्या हातात गुलाबाचं लाल फुल असेल. मुलगा पुढच्या दिवशी खूप आनंदाने त्या मुलीला भेटायला गेला.
        पण तिथं गेल्यावर पाहील की, एक वयोवृध्द आजी चेहऱ्यावर सुरकुळ्या असलेली, दिसायला खूपच विरह हातात गुलाबाच फूल आणि लाल साडीमध्ये उभी होती. त्या वयोवृध्द आजीला पाहून मुलगा एका क्षणासाठी विचारात बुडाला आणि दुसऱ्या क्षणी तो पुढे जाऊन सरसावला जवळ येऊन त्या वृध्द आजीला म्हणाला, आय लव यू. मी तोच आहे ज्याने तुझ्यावर प्रेम केलय. ती वयोवृध्द आजी म्हणाली, बाळा, मी ती नाही जिनं तुला इथं बोलवलय. ती तर त्या झाडाच्या मागे तुझी वाट पाहत उभी आहे. हे सर्व ऐकून मुलगी त्या मुलाजवळ आली आणि म्हणाली, जर मी खरोखर अशी असते तर तू माझ्यावर प्रेम केलं असतं का? तर तिला मुलगा म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्या चेहऱ्यावर नाही. मी तुला माझ्या हृदयात माझा श्वास म्हणून ठेवलय, तुझ्या रुपाला नाही. मला काहीच फरक नाही पडत की, तू कोण आहेस? तू काय आहेस? तुझे विचार, मन आणि चारित्रय चांगले आहे. बर, काहीपण असू दे, मला फक्त एवढेच माहीत आहे की, तू फक्त माझी आहेस आणि मी फक्त तुझा. हे ऐकताच तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात हळूच बोलली, आय लव यू टू.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...