एका युवकाने एक
मुलीकडून फुलांचा गुच्छ विकत घेतला आणि
तो
सांभाळत टॅक्सीत बसला.
टॅक्सी त्याच्या इच्छित स्थळी पुढे जाऊ
लागली.
तसा
तो
आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला.
त्या दिवसात तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचा हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो अलीकडे मात्र तिच्या विचारात अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची. मैत्रिणीसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख. मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेल.
अशाच एका संध्याकाळी
ती
आली.
पण
थोडी उदास होती.
“काय ग, झाली का
ख्रिसमसची खरेदी?” त्याने तिला बोलतं करायला विचारलं. “हो.” तिचा स्वरही जरा नाराजीचा वाटत होता. “काय काय घेतलेस?” “काही नाही.” “काय झाले, चेहरा का पाडून आहेस असा?” काही क्षण थांबून ती म्हणाली, “आम्ही आज रात्री गोव्याला
जातोय,
परवा ख्रिसमस आहे
ना.” तिची उदासी घालवायला निघालेला तो मात्र स्वत:च उदास झाला होता. पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीच कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावलाही. “अगं, मग उदास होण्यासारखं
काय
आहे
त्यात?” “अरे… याचा अर्थ आता चार-पाच दिवस आपण…” असे म्हणून तिने शब्द आवरते घेतले. “हम्म्म्म्म्म्म्, तुला काहीच वाटत नाही का?” ती पुढे म्हणाली. “मला… मला काय वाटायचं त्यात?... किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मस्त एंजॉय करणार ना.” तिच्या मनात नक्की काय चाललयं हे चाचपडून पाहायची संधी त्याने दवडली नव्हती. चेहऱ्यावर खोट्या हास्याची एक रेघ उमटवत तिने पुस्तकांत डोक खुपसलं. काही वेळातच पुस्तक एकवटत ती म्हणाली. “
मी
आता
येथून जात
आहे.” “इतक्या लवकर.” “हो, उशीर होईल.” तिची नजर आज उठत नव्हती. कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी. उदास तर तोही फार झालेला. तरी ती जाण्याआधी एकदा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाच अवसान आणत तो म्हणाला, “मेरी ख्रिसमस, एंजॉय.” ती हसली खरी पण अश्रू मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पहात होता. पण पापण्यांच्या हालचालींने तिने लकबिने तो परतावलाही. “बर मग, भेटूया नंतर बाय”
ती
म्हणाली.
“बाय, मी
तुझी वाट…” असं म्हणत तोही थबकला.त्याचे डोळे अधिक बोलत होते.ती निघाली त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं. जरा वेळाने तोही निघून गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी
लायब्ररीत येण्याचं त्याचं मन
नक्कीच नव्हतं पण
कारण तर
होतं.
अभ्यासात स्वत:ला गुंतवून चार-पाच दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत
आला.
आज
मात्र कोणाची वाट
पहायची नव्हती.
आणि
समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती.
त्याचे डोळे पुस्तकांमधील अक्षरांवर फिरत होते,
पण
मात्र तिची सुरेख छबी
रेखाटत होतं.
तिचं ते
खळखळून हसणं,
गालातल्या गालात गोड
लाजणं,
तो
वाचनात गुंग असताना त्याच्याकडं एकटक पहात राहणं आणि
त्याचं लक्ष जाताच लगबगीने नजर
पुस्तकांत वळविणं.
कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्या तर
तर
बोट
दातांमध्ये दाबून तिथून गडबडीने निघून जाणं. या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या
मनात दाटीवाटी करत
होत्या.
अशाच सगळ्या आठवणींची उजळणी करत
असताना त्याची नजर
सहज
वर
गेली आणि
पाहतो तर
काय…
ती
समोर.
“अगं, तू
गोव्याला जाणार होतीस ना?” त्याने आश्चर्याने विचारलं. “नाही गेले.” “का?” “नाही जावसं वाटलं”
“अगं, पण…” त्या क्षणी काही समजल नसलं तरी कदाचित ती आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या. उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात. पण त्याने मनाला आवर घातला. पुस्तकांवर त्याची नजर टिकत नव्हती. सारखी फिरुन फिरुन तिच्या चेहऱ्यावर जाई. ती
मात्र शांतपण वाचत बसली होती.
दिवस असेच उलटत होते. पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये
नित्याचं येणं कमी
झालं होतं.
आणि
आली
तरीही शांत असायची,
कमी
बोलायची.
तिच्या नजरेतून सतत
तिच्या मनावर कसलंतरी दडपण असल्यासारखं जाणवायचं.
फार
गंभीर वाटायची.
तिचं हे
असं
वागणं त्याला खटकत होतं.
त्यानं अनेकदा तिचं शांत राहण्यामागचं कारण विचारण्याचा,
तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला.
पण
ती
प्रत्येक वेळी “काही नाही.”
सांगून टाकायची.
बरेचदा तो
बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत
रहायची.
हा
हा
म्हणता दिड
महिना उलटला.
“तिला अपेक्षित असेल माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबूली… हो, असेलही कदाचित.
मला
जे
तिच्याबद्दल वाटतं तेच
तिला माझ्याबद्दल वाटत असेल?...
हो
मला
खात्री आहे.
पण
जाती धर्माचं काय?
मला
काही नाही फरक
पडत.
पण
तिला?...
नाही पडणार.” एका मनाने प्रश्न विचारले आणि दुसऱ्याने सोईस्कर उत्तरही दिली…! त्याची चलबिचल थोडी कमी झाली. त्यानं ठरवलं की, व्हॅलेंटाईन डे
ला
आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल त्या तिला सांगायच्या.
तो दिवस येऊन ठेपला. आज ते पहिल्यांदाच
लायब्ररीबाहेर रम्य ठिकाणी भेटणार होते.
तो
फार
आतुरतेने तिची वाट
पहात येरझाऱ्या घालत होता.
एवढ्यात ती
समोर आली.
“खूप सुंदर दिसतेस तू आज.” ती शरमली आणि तिने मान पायाच्या
अंगठ्यावर वळवली.
हातातले ते
लाल
गुलाबाचं फुल
पुढे करत
तो
म्हणाला,
“श्रावणी, मला काही सांगायचं तुला…”
“हं, सांग ना…” “श्रावणी, माझं… माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर… आय लव्ह यू श्रावणी… आय लव्ह यू सो मच…! तिने चमकन वर पाहिलं. हळूवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं. याच क्षणासाठी
आसुसलेल्या त्या नजरेने ती
एकटक त्याच्याकडे फक्त पहात होती.
तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं.
त्याची नजर
तिच्या चेहऱ्यावरुन हटत
नव्हती.
“बोल ना काहीतरी.”
तो
तिचा हात
हातात घेत
म्हणाला.
ती
लगेच भानावर आली.
“मीही खूप प्रेम करते तुझ्यावर… आय लव्ह यू टू श्रेयस.”
लाजत तिने म्हटले.
त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचित क्षण तो
अनुभव होता.
“पहिल्याचं भेटीपासून…”
ती
म्हणाली.
त्याला आकाश ठेंगण झालं होतं.
त्याने रंगवलेली स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती.
ती
स्मितहास्य करुन डोळे भरुन त्याच्याकडे पहात होती.
“आपण लग्न पुढल्या वर्षी करु.” स्वप्नपूर्तीच्या
दिशेनं त्यानं पहिलं पाऊल टाकलं.
“तोपर्यंत माझी डिग्रीपण पूर्ण होईल आणि तुझीपण. चालेल ना तुला?”
ती
नुसती त्याच्याकडे बघत
होती.
तिला त्याच्या चेहऱ्यावरचा एकही क्षण हरवायचा नव्हता.
पण
दुसऱ्याच क्षणी कशाचीतरी आठवण झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य आलं.
“पण… पण…” ती खालच्या आवाजात म्हणाली. “पण काय?...” “मी लग्न नाही करु शकणार तुझ्याशी.” “काय?......” तिच्या या अनपेक्षित नकाराने तो गोंधळून गेला. जी स्वप्न काही क्षणामागे पाहिली होती त्यांच अस्तित्व धोक्यात होतं. “म्हणजे, पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर?” “हो. खूप, इतक की कदाचित कोणी करु शकलं असेल.” “जर इतकं प्रेम करतेस माझ्यावर
तर
मग…
मग…
लग्न का
नाही करु
शकत
माझ्याशी?” त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवाजात म्हणाला, “मी गरीब आहे म्हणून की आपली जात वेगळी आहे म्हणून?…”
त्याचेही डोळे ओलावले होते.
“असं, काय
कारण आहे
तुझ्या नकाराचं.” तिच्या नजरेतून प्रेम ओसांडत होतं. तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे ती पहात स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यांतील आता अश्रू गालांवर ओघळत होते. “अगं, बोल ना काहीतरी की अजून काही वेगळं कारण आहे?” आता मात्र त्याच्या
आवाजाचा रोख
चढत
होता.
तिच्या या
अशा
गप्प राहण्याने त्याला अधिक चीड
येत
होती.
तरीही स्वत:ला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार एवढ्यात ती म्हणाली, “जाते मी.” “जाते, मला असं कोड्यात टाकून?” “मला माझ्या प्रश्नाचं
उत्तर हवायं श्रावणी.” “मी फक्त आणि फक्त तुझ्यावर
प्रेम केलयं अँड
विल
अल्वेज लव
यू.” त्याचा चेहरा आपल्या हातामध्ये
भरुन घेत
ती
म्हणाली.
तिच्या नजरेतले हे
असे
भाव
या
आधी
त्याने कधीच पाहिलं नव्हते.
“पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाच
उत्तर.
आणि
आता
मला
जायला हवं.
खूप
उशीर झालाय.
मी
जाते.” म्हणत ती वळली. त्यानं तिचा हात पकडून तिला थांबवायचा
प्रयत्न केला.
पण
त्याची पकड
सोडत पाणावलेल्या डोळयांनी तिची पावलं मागे पडत
होती.
तिच्या या
अशा
वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत
होता.
“काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा? माझ्या प्रेमाचा
असा
अपमान करायचा होता तर
आलिसंच का
माझ्या आयुष्यात?
का
दाखवलीस मला
इतकी स्वप्न?
जी
तुला कधी
पूर्ण करायचीच नव्हती.
जा
तू
इथून.
निघून जा.” असं म्हणतं त्याने तिच्याकडं
पाठ
वळविली.
घडला प्रकार त्याला सहन
होत
नव्हता.
त्याच्या चेहऱ्यावर अश्रूंची धार
लागली होती.
तरी
स्वत:च्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी
म्हणून तो
वळला,
पण
तिथं कुणीच नव्हतं.
ती
गेली होती.
तो
तसाच काही क्षण स्तब्ध उभा
होता.
तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदानं जावं की
तिच्या लग्नाच्या नकारानं दु:खी व्हावं हे त्याचं त्यालाच समजेनासं
झालं.
तो
तसाच निराश,
निर्विकार,
शून्यात नजर
लावून एका
दगडावर बसून राहिला.
हळू
हळू
अंधार वाढू लागला.
शेवटी जड
पावलांनी तो
घरी
परतला.
रात्रभर त्याचा डोळ्याला
डोळा लागला नाही.
गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती.
मनात विचारांचं काहूल माजले होतं.
“का केलं असाव तिनं असं?”
मग
इतक्या महिन्यामध्ये जे
आमच्यामध्ये घडत
होतं ते
काय
होतं?
मी
तिला ओळखायचो चुकलो का?...
नाही…
ती
अशी
नाही…
पण
मग
तिचा हा
लग्नाला नकार,
काय
कारण असेल?
तिला कुणीतरी दुसरं…
नाही…
नाही…
त्याला मनातही या
गोष्टीचा विचार करवेना.
पण
तिच्या आजच्या वागण्यांच गुढ
त्याला उलघडलं नव्हत.
एका
क्षणासाठी या
विचारातून तो
आपली सुटका करुन घेत
नव्हता.
ती
परत
कधी
एकदा समोर येते असं
त्याला झालं होतं.
परंतु दुसऱ्या दिवशी तिच्या येण्याची वाट
बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता.
दुसऱ्या दिवशी तो वेळेत लायब्ररीत
आला.
मात्र वेळ
उलटून गेली तरीही ती
आली
नव्हती.
त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती.
तिच्या वाटेवरुन त्याची नजर
क्षणासाठीही हटत
नव्हती.
पण
ती
आली
नाही.
पुढील चार-पाच दिवस असंच चालू होतं. ती का येत नाही? का असं वागतेय ती माझ्याशी? त्याच्या
मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती.
सततच्या विचाराने तो
फार
हैराण झाला होता.
पण
त्याचा निर्णय पक्का होता.
काहीही झालं तरी
त्याला तिच्या नकाराचं कारण जाणून घ्यायचं होतं आणि
कसंही करुन तिला लग्नासाठी होकार मिळवायचाच हे
मनाशी त्यानं पक्क ठरवलं होतं.
मागचा पुढचा काहीच विचार न करता सरळ त्यानं त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला. पण आता त्याच्या
नजरेसमोर एक
नवीन प्रश्न होता की,
अचानक त्याला समोर पाहून ती
कसं
वागेल याचा.
जर
तिला माझं असं
अचानक घरी
येणं आवडलं नाही तर,
आणि
तिच्या घरचे?
पण
माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाहीये.
जसजसं तिचं घर
जवळ
येतं होतं,
त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि
तिला बघायची आसही.
एव्हाना तो
तिच्या घरी
येऊन पोहचला.
बेल
वाजवल्यावर तेवढ्यात त्याचं लक्ष दाराच्या कुलूपाकडं गेलं.
काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजाऱ्यांना विचारुन पाहणं सोईस्कर वाटलं.
त्यानं शेजारचा दरवाजा खटखटवला.
एक
वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला,
“कोण पाहिजे?”
“हे तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का?”
त्यानं श्रावणीच्या घराकडं बोट
दाखवत विचारलं. ती स्त्री म्हणाली, “तू कोण?”
तो
म्हणाला,
“
मी
श्रेयस.
श्रावणीचा फ्रेंड. चार-पाच
दिवसांपूर्वी ती
भेटली होती.
त्यानंतर लायब्ररीत आलो
नाही म्हणून आलो
तर
घर
बंद.”
ती
स्त्री म्हणाली,
“काय? किती दिवसांपूर्वी?”
तो
म्हणाला,
“साधारण चार-पाच दिवसांपूर्वी.” त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं, “तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयास नक्की. पत्ता बरोबर आहे ना?”
“हो काकू, तिनेच पूर्वी सांगितला
होता मला.”
त्यानं विश्वासानं सांगितलं.
“तू काहीतरी चुकतोयस. हे घर श्रावणीचच
आहे
पण
तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी.”
“नाही काकू, हाच पत्ता आहे. ती एम.ए. करते ना आणि रोज लायब्ररीत
यायची अभ्यासाला.”
“हो, पण… हे कसं शक्य आहे?”
ती
स्त्री जरा
विवंचनेत पडली.
“का?... काय झालं?... असं का म्हणताय तुम्ही?”
“हे घर गेलं दीड महिना बंद आहे. श्रावणी आणि तिचं कुटुंब गोव्याला
जात
असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
फार
भीषण अपघात होता.
सगळे जागीच ठार
झाले.
मग
कशी
भेटेल ती
तुला?”
“क… का????य?”
असं
मोठ्यानं म्हणत त्याने आपल्या हाताच्या मुठी आवळल्या.
त्याचा श्वास त्याच्या कंठात आडकला,
त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती.
त्या बाईचे शब्द त्याच्यावर
आभाळ होऊन कोसळले होते.
त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला.
पण
त्याची पकड
निसटून तो
खाली कोसळला.
त्याला सावरायला ती
स्त्री पुढे आली
पण
तो
आधार नाकारत कसातरी उठून उभा
राहिला.
त्याला धड
बोलताही येत
नव्हतं,
तो
कसातरी अडखळत बोलला,
“तुम्ही खोट बोलताय का?...हे असं कसं शक्य आहे? अहो, आम्ही गेले दीड महिने भेटतोय. केवळ गेले चार दिवस झाले. ती नाही भेटली… म्हणून तर आलोय मी…”
ती
स्त्री त्याच्याकडे तो
कदाचित वेडा आहे
अशा
नजरेने बघत
होती.
ती
म्हणाली,
“हे बघ, मला वाटतेय, तुला काहीतरी भास झाला असावा. मी खरे तेच सांगितले
आहे
तुला.
त्यांना जाऊन आता
दीड
महिना होत
आलाय…
आता
तर
त्यांचे कोणी नातेवाईकपण येथे राहत नाहीत.”
त्याची अवस्था पाहून त्या स्त्रीने त्याला पाणी आणून दिले.
पण
तो
ते
नाकारुन जड
पावलांनी परत
तिच्या घराजवळ आला.
फाटका आडून ते
बंदीस्त घर
पाहताना त्याच्या पापण्या लवत
नव्हत्या.
मन
सुन्न झालं होतं.
शरीर गोठून जावं तसा
तो
एका
जागी खिळून उभा
होता.
त्या स्त्रीचे अपघाती शब्द त्याचं मन
स्वीकारत नव्हतं,
पण
ते
सतत
परावर्तीत होऊन त्याच्या कानावर आदळत होते.
एकाएकी वास्तवाची जाणीव व्हावी तसा
एका
जोराच्या हुंदक्याचसरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “श्रावणीSSSSSSSSSSSSSSSS”
आणि
तो
ओक्साबोक्षी रडू
लागला.
“साहेब ह्या समोरच्या
रस्त्याने घेऊ
ना
गाडी?”
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रश्नाने तो
एकदम भानावर आला.
डोळे पुसत त्यानं होकारार्थी मान हलवली. माझ्या प्रेमाची
कबुलीच तिला माझ्यापासून दूर
घेऊन गेली.
ती
केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतरदेखील परत
आली
होती…
जर
त्या दिवशी मी
तिला प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर…
पण
तेच
ऐकायला तर
तिचा जीव
माझ्यात अडकून राहिला होता…
श्रावणी…
परत
ये
एकदाच…
नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे खेळ
सुरु झाले…
“बस, थांबव इथे… स्मशानभूमी
येताच पाकीटातील पैसे काढत तो
म्हणाला.”
ड्रायव्हर म्हणाला,
“साहेब परत जाण्यासाठी
थांबू का?”
तो
म्हणाला,
“नको, मला वेळ लागतो, भरपूर बोलायचं असतं तिच्याशी.”
असं
म्हणत तो
टॅक्सीबाहेर उतरुन तिच्या ग्रेव्हरच्या दिशेने चालू लागला.
त्या दिवसात तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचा हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो अलीकडे मात्र तिच्या विचारात अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची. मैत्रिणीसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख. मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेल.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा