ती दोघं… त्यांचं बिनसलंच होतं गेले कही दिवस. तो काहीही बोलला तरी ती त्याचा
वेगळा अर्थ काढायची. तो बोलला
तरी भांडण, गप्प
राहिला तरीही भांडण. ते भांडण मिटवायचं म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला. पण ती गप्पच
होती, शांतच होती, काहीही बोलायला तयार नव्हती. तिचा चेहरा सांगत होता की, तिचा निर्णय झालेला होता. ते घरी परत येत होते. तो गाडी
चालवत होता. शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच, “मला वाटतं… हे असं
रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही. मला वाटतं, आपण आपल्या वेगळया वाटांनी जावं. मी तसा निर्णय घेतलाय. यापुढे आपण न भेटणंच योग्य…… ते ऐकून त्याला धक्काच बसला. त्यानं गाडीचा वेग हळू करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. त्यानं खिशात चाचपून पाहिलं. एक कागदाची
चिठ्ठी तिच्या हातात देत डोळे पुसले. आणि ती चिठ्ठी
उघडून वाचणार तेवढयात समोरुन एक भरधाव गाडी आली… थेट यांच्या गाडीवर येऊन आदळली. त्या अपघातात तो जागीच ठार झाला आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली. हातात ती चिठ्ठी तशीच होती. ते उघडून तिनं पाहिलं तर त्यात फक्त एकच वाक्य होतं, “तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही, तू सोडून
गेलीस तर त्याच क्षणी मी मरेल.”
तो खरच
त्या क्षणी मेला होता.
प्रेमही असंच असतं. जे मागू
ते देऊन मोकळं होतं. मागायचं काय मरणं की जगणं हे प्रेम करणाऱ्यांनीच ठरवावं.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा