कुठे
होतास तू? तूला
अक्कल आहे का?
गेले दोन तास
मी तुला मिस
कॉल करतेय. बघ
तुझ्या मोबाईलवर, सत्तर- ऐंशी मिस
कॉल असतील. तुला
कशी रे जरासुध्दा माझी काळजी नाही.
काय समजतोस तू
कोण स्वत:ला? अग… हो
हो हो, किती
ओरडशील… मी तरी
काय करु मला
नाही जमलं फोन
उचलायला, काही प्रॉब्लेम होता… मला माहित आहे रे तुला
नेहमीच प्रॉब्लेम असतात,
खोटारडा आहेस एक
नंबरचा. हल्ली खूप
खोट बोलतोस माझ्याशी.
बसला असशील मित्रांच्याबरोबर टवाळक्या
करत. आता
लग्न झालंय तुझं.
लहान नाहीस अजून.
सोड ना राग,
ये ना मिठीत.
मला माहित आहे
तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर चटकन
पळून जातो. छुमंतर… मी नाही
येणार, सोड मला.
मला नाही यायचं मिठीत.
सचिन आणि सवी. एक वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. प्रेम खूप होत दोघांचं एकमेकांवर. पण सतत अशीच भांडणं चालू असायची. जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवीवर खूप प्रेम करत होता. तिचही त्याच्यावर खूप प्रेम होतं. शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिनं त्याला होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं.
“अगं, मला
वाटलं आज सकाळच्या भांडणानंतर तू तुझ्या आईकडे जाशील आणि
मग मी एकटाच असीन घरात म्हणून मी तुला ऑफिसमधून निघताना फोन नाही
केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत
होता, मला वाटलं अजून भांडशील. त्यापेक्षा घरी
जाऊनच तुझा राग
घालविन. म्हणून हे
बघ किती डेरी-मिल्कची चॉकलेट्स आणलीत तुझ्यासाठी.” “मला नको
आहेत ती आणि
मी काय सारखी भांडतच असते तुझ्याशी?
मला काही दुसरे उद्योग नाहीत का?
मला वाटलं मी
सकाळी जरा जास्तीच नाटक केलं. तू
रागवला असशील माझ्यावर म्हणून मी पण
तुझ्या आवडीची चायनीज डीश बनवण्याची तयारी करुन बसले होते.
मला वाटलं विचारावं तुला, की तू
कधी येतोस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवलं असतं.” “आता हे मला
माहित होतं का?
तूच एक मॅसेज करुन सांगायचं ना
हे. मग
मी ऑफिसमधून लवकर
निघून आलो असतो
माझ्या लाडक्या बायकोसाठी.
आता तरी ये
ना मिठीत.” “नाही म्हणजे
नाही… मी नाही
येणार मिठीत.” “त्यासाठी तर
आलोय ना मी
इथे.” “काय? तू
मला मिठी मारण्यासाठी इथे
आला आहेस का?
मला आधी सांग
तू कुठे होतास इतका वेळ?अन्
तेही खरं खरं
सांग.”
“बर मग, ऐक. मी ऑफिसमधून थोडा अर्धा-पाऊन तास उशीराच निघालो. निघायच्या आधीपासून तुझा कॉल येत होता. मला वाटलं तू आता रागवशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भडकशील. म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला, लवकरात लवकर गाडी चालवून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चॉकलेट्स घेऊन. पण काय करु नेमका पाऊस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला की मला पुढचं नीट दिसतही नव्हतं आणि तेवढ्यात अचानक एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला होता आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी सर्व शरीरात घुसल्या होत्या. त्यावेळीपण तुझा फोन वाजत होता. पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता. पण माझे हात निकामे झाले होते. मी प्रयत्न करुनदेखील फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही. कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला यातून वरती वरती खूप वरती घेवून गेला.”
सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली. तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होतं. सवी खरोखर झोपताना सचिनशी भांडूण झोपली होती आणि तिला अशीच सवय होती. जर भांडणं झाली असतील तर खूप फोन करत बसायची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिनं सचिनला खूप घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली. तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंचाळी ऐकून. तोही घाबरला होता आणि तिला विचारत होता, “अग सवी काय झालयं? तुला बरं वाटत नाही आहे का? काही खराब स्वप्न पडलं का? अग शोना बोल…ना… काय झालय? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी… हे घे पाणी, पी. आता सांग काय झालं?” “मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू. आणि झालंच ना एखादं भांडण तर त्या वेळी आपण ते फोनवर अजिबात बोलायचं नाही, खरंतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालंच तर. समोरासमोर बसून आपण भांडण मिटवू… आय लव यू. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंदसुध्दा.” असे बोलत तिने पूर्ण स्वप्न सांगितले सचिनला. सचिन म्हणाला, “आय लव यू टू… मी राहू शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय… बावळट कुठली.”
सचिन आणि सवी. एक वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. प्रेम खूप होत दोघांचं एकमेकांवर. पण सतत अशीच भांडणं चालू असायची. जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवीवर खूप प्रेम करत होता. तिचही त्याच्यावर खूप प्रेम होतं. शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिनं त्याला होकार दिला आणि त्यांचं लग्न झालं.
“बर मग, ऐक. मी ऑफिसमधून थोडा अर्धा-पाऊन तास उशीराच निघालो. निघायच्या आधीपासून तुझा कॉल येत होता. मला वाटलं तू आता रागवशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भडकशील. म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला, लवकरात लवकर गाडी चालवून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चॉकलेट्स घेऊन. पण काय करु नेमका पाऊस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला की मला पुढचं नीट दिसतही नव्हतं आणि तेवढ्यात अचानक एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला होता आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी सर्व शरीरात घुसल्या होत्या. त्यावेळीपण तुझा फोन वाजत होता. पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता. पण माझे हात निकामे झाले होते. मी प्रयत्न करुनदेखील फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही. कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला यातून वरती वरती खूप वरती घेवून गेला.”
सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली. तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होतं. सवी खरोखर झोपताना सचिनशी भांडूण झोपली होती आणि तिला अशीच सवय होती. जर भांडणं झाली असतील तर खूप फोन करत बसायची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिनं सचिनला खूप घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली. तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंचाळी ऐकून. तोही घाबरला होता आणि तिला विचारत होता, “अग सवी काय झालयं? तुला बरं वाटत नाही आहे का? काही खराब स्वप्न पडलं का? अग शोना बोल…ना… काय झालय? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी… हे घे पाणी, पी. आता सांग काय झालं?” “मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू. आणि झालंच ना एखादं भांडण तर त्या वेळी आपण ते फोनवर अजिबात बोलायचं नाही, खरंतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालंच तर. समोरासमोर बसून आपण भांडण मिटवू… आय लव यू. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंदसुध्दा.” असे बोलत तिने पूर्ण स्वप्न सांगितले सचिनला. सचिन म्हणाला, “आय लव यू टू… मी राहू शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय… बावळट कुठली.”
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा