एका
युवकाची आणि मुलीची ओळख आपल्या फेसबूकमधून झालेली
होती. रोजच ऑनलाईन बोलणं सुरु झालं.
ते एवढे चांगले मित्र झाले की
एकमेकांशिवाय गप्पा मारल्याशिवाय ते
राहत नसत. या
काळात अनेक भांडणं आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले.
किमान तीन ते
चार महिने असेच
चालू होते. परंतु
त्या युवकाने तिला
प्रेमाविषयी कधीच सांगितलं नाही. आणि एक
दिवस चक्क मुलीनं त्याला विचारलं, “तू माझ्यावर
प्रेम करतोस?” दोघांनी
एकमेकांना समोरासमोर कधीच
पाहिलं नव्हतं. फक्त
फोटो पाहिले होते. तिच्या
त्या प्रश्नावर युवकाने उत्तर दिले, “हो. करतो मी प्रेम तुझ्यावर.” मग त्या
युवतीने त्याला विचारले की याआधी तू
का नाही बोललास?
युवक म्हणाला, “मला माहित
नव्हतं की तू
माझ्यावर प्रेम करतेस ते? पण
मी प्रेम करतो
असे सांगितले आणि
तू मैत्री नाही
ठेवलीस तर?” अशा
प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला. आणि
रोजचा गुड मॉर्निंग हा शब्द आय
लव यू कडे
वळला. हळू हळू
फोनवर बोलणं चालू
झालं. आणि फेसबुकमधील मैत्री
एवढ्या छान प्रेमात बदलली की एकही
दिवस किंवा एकही
क्षण दोघांशिवाय न
राहण्याच्या शपथा दोघे
घेऊ लागले. वेळ
आली ती भेटण्याची.
दोघांनाही आतुरता होतीच खरी. पण
तिचं त्याला नेहमी आमंत्रण असायचं. हा
मात्र कामामुळे जाऊ
शकत नव्हता. या
प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढं
मनावर नाही घेतलं.
त्या मुलानेही ठरवले की आपण भेटायला जायचे. त्याच्या गावावरुन तो तिच्या गावी
निघाला. दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू आणि
भेटीची भिती वाटू
लागली. भेटीचे ठिकाण ठरले. त्या गावचे स्टेशनचे ते मोठे
खांब त्याच्याखाली.
युवक तेथे पोहचला त्याच्या आधी ती तेथे येऊन थांबली होती. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं. कदाचित असं होईल हे दोघांना माहित नव्हतं पण हे नक्की समजलं. त्याचं तिच्यावर आणि तिचं त्याच्यावर नक्की प्रेम होतं. कुठं फिरायला जायचं ह्या प्रश्नाला महालक्ष्मी मंदीर असे उत्तर मिळाले. आणि दोघेही तिथून महालक्ष्मीच्या दर्शनास गेले. काय बोलायचं आणि काय नाही हे प्रश्न चिन्ह दोघांच्याही चेहऱ्यावर होतं. फोनवर आय लव यू ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर कोणी बोलेना. शेवटी युवकाने धाडस केलं आणि बोलला. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर थोडीशी तब्येतीची चौकशी झाली आणि गप्पा सुरु झाल्या. किमान चार तास तरी त्या चालू होत्या. ती युवती एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती आणि ऑफिसमधून यायला वेळ होईल असे सांगून युवकासोबत फिरत होती. शेवटी निरोप घ्यायची वेळ आली आणि पुन्हा स्टेशनवरुन दिवसभराच्या भेटीची सांगता झाली. दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला कधीच न पुसण्यासाठी. अशी ही पहिली भेट झाल्यानंतर पुन्हा फोन वर बोलणं चालू झालं. एवढं झालं की एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं असं ठरवलं. किमान पुन्हा चार महिने हे प्रकरण चालू राहीलं आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला फक्त तिचे बाबा सोडून. दररोज तासन्तास बोलण् चालूच असायचं. या दोघांत कधीही कसलंही भांडण झालं नाही. ऑगस्टमध्ये त्यांनी साखरपुडा करायचं ठरवलं. नोव्हेंबर 2011 या महिन्यांत ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते. एक दिवस ते काही कारणास्तव बोलू शकले नाहीत. दोघांनाही फार आठवण आली होती. सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला की ती काल रात्री ट्रेनमधून पडली आणि हे जग सोडून गेली. युवकाला काय करावे ते सुचेना. उठून त्याने तिचे गांव गाठले आणि तिची अखेरची भेट ती सरणावर असताना घेतली. सारी स्वप्ने त्या चितेत पेटत होती. या नंतर किमान सात दिवस या युवकाने कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक झाला. परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल असं वाटत असेल. पण तो तिला विसरु शकेल का?

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा