माझा एक
मित्र आहे.
कॉलेजमध्ये सर्वजण करतात तसे
त्यानंही बरेच उद्योग केले.
पोरींना भरपूर त्रास दिला.
सरांची नक्कल केली.
कँटीनचे पैसे बुडवले.
“फर्स्ट डे फर्स्ट शो” पाहिले. दर महिन्याला
त्याच्या अंगावरचा शर्ट नवीन असायचा.
तो
नेहमी म्हणायचा,
“जन्माला आलोय तर फुल्ल ऐश करणार. प्रेमाबिमात
नाही पडणार.”
त्यानं त्याच्या बाईकवर आय
हेट
गर्ल्स असंही लिहलं होतं.
आई-वडीलांचा
एकुलता एक
मुलगा.
त्यामुळं लाडातचं मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीमध्ये भरपूर मुली.
त्यामुळं मुलींचही त्याला तसं
काही सोयर सुतक नव्हतंच.
पोरींशी बिनधास्त बोलायचा.
अभ्यासात हुशार नव्हता.
पण
खेळाची कमालीची आवड
होती त्याला.
कायम खिदळत असायचा.
पण
आज
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू
कुठल्या कुठ
पळून गेलयं.
तो
एका
मुलीच्या प्रेमात पडला होता.
गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त
प्रप्रोज केलं.
ती
हॉस्टेलला रहायला होती.
सहा
महिने तो
तिच्या मागे लागला होता.
खरं
प्रेम केलं होतं त्यानं.
त्यामुलीनंही होकार दिला.
त्याचा स्वभाव निर्मळ पण
तो
आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढत असला तरी त्याच्यावर
आई-बाबांचा धाक होताच. त्यामुळं
त्यानं प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं.
त्याची हिंमतच होत
नव्हती.
तो
तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा.
खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका
ठिकाणी ते
गप्पा मारत बसायचे.
एकदा ते
असेच फिरायला निघाले तेंव्हा त्याच्या प्रियसीने एका
कॅरीबॅगमध्ये छोटसं रोपटं घेतलं होतं.
आपण
बसतो ना,
तिथं मी
रोप
लावणार,
अशी
तिची कल्पना ऐकून तो
पोट
धरुन हसला होता.
त्याच्या हसण्यानं ती
रुसूनही बसली होती.
कसं
बसं
तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले.
दोघांनी तिथं रोपटं लावले.
सोबत पाण्याची बाटली होती.
त्या रोपट्याला पाणीही घातलं.
आठवड्यात एकदा तरी
त्यांची तिथं चक्कर व्हायचीच.
दर
वेळी ते
दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडं
गेला होता.
त्यामुळे त्या दोघांना भेटता आलं
नाही.
शिवाय ती
दोन
दिवसांनी परत
येणार होतीच.
त्यामुळं नको
येऊ
भेटायला असं
तिनंच सांगितलं होतं.
घरी
पोहचल्यावर फोन
कर
असं
सांगून त्यानं फोन
ठेवला.
तिचा फोन
आला
नाही म्हणून त्यानं फोन
केला.
पण
कुणीच उचलला नाही.
घरी
गेल्यानं मला
विसरली वाटतं असा
राग
मनात धरुन त्यानंही परत
तिला फोन
केला नाही.
दुर्दैवान दुसऱ्या दिवशी समजलं की
तिचा अपघातात मृत्यू झाला होता.
त्याला ही
बातमी कशी
सांगायची तेच
सुचतं नव्हतं.
खूप
धाडस करुन मी
त्याला सांगितलं.
हळव्या मनाचा होता तो.
जागेवरच खाली बसला अन्
मोठमोठ्यानं रडायला लागला.
आवरणार तरी
कसं
त्याला?
माझ्या गळ्यात पडून रडू
लागला.
क्षणाचाही विचार न
करता त्यानं गाडी काढली.
मला
पाठीमागं बसविलं.
अन्
आम्ही तिच्या गावाकडे गेलो.
पण
काही उपयोग नाही.
सर्वकाही उरकलेलं होतं.
तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो तिथं रडला असता तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो आणि अर्ध्या तासात माघारी फिरलो. मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं
निघाली होती.
मी
काही बोललो नाही.
पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवली अन्
एका
झाडाला पकडून तो
मोठमोठ्यानं रडू
लागला.
त्यानंतर दररोज तो
तिथं जात
होता.
अन्
झाडापाशी बसून ढसाढसा रडत
होता.
आठ
महिन्यापूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आणि त्याचा स्वभावही
बदलला आहे.
एका
शांत मुलाप्रमाणे वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहीत नाही. तो घरात काही बोलत नाही. फक्त रात्रीच्यावेळी
तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो.
तिनं दिलेलं गुलाबाचं फुल
आता
सूकलंय.
ते
एकटक बघतो आणि
उशीत तोंड खूपसून रडतो.
तो
म्हणतो,
“ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्याच्या
झाडाच्या पानाफुलात मी
तिला शोधतो.
लोक
झाडावर प्रेम करा
असं
म्हणतात पण
मी
प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन की
तुम्हीही असं
एखादं रोपटं लावा.
तुमची लव्हस्टोरी माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही.
खरं
प्रेम असेल,
तरही निस्वार्थ रोप
खूप
काही देतात.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा