आदिती आणि
निरव हे
गेली दोन
वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.
दिवसभरामध्ये कामामध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी नऊ
वाजता तिला फोन
करायचा.
बोलताना त्याचं सुरवातीचं एक
वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.
ते
म्हणजे,
“हे, डीअर आय लव यू.”
हे
वाक्य ऐकल्याशिवाय आदितीला कधी
झोप
यायची नाही.
एक
दिवसही तिचा असा
गेलेला नसतो की
तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.
एक
दिवस सत्याचा सामना करायचं ठरवून निरव तिला घरी
घेऊन गेला आणि
त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.
त्याच्या आई-वडीलांनी
मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.
त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि
त्यांना सल्ला दिला की,
एकदा आपल्या कुलदेवताला जाऊन या.
त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून ते
कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.
दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.
आदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,
देवा निरवच्या कोणत्याही बेस्ट तीन
इच्छा तू
पूर्ण कर,
एवढंच माझं मागणं आहे
तुझ्याकडं.
निरवने मागणं मागितलं की
देवा ही
जे
काही तुझ्याकडे मागतेय ते
ते
तू
तिला दे.
देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते
तिथून निघतात.
यानंतर आदितीचं त्यांच्या घरी येणं-जाणं म्हणजे कायमचं होऊन जातं. पण तरीही त्यांचं मोबाईलवरच बोलणं काही थांबलं नव्हतं. एक दिवस आदिती निरवला पूर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या उन्हाळी सुट्टीला जाते. इकडे निरवच्या काम करण्याच्या ठिकाणी जोराचा अपघात होतो आणि त्यातच त्याला आपला जीव गमवावा लागतो. त्याच्या आई-वडीलांना याचा जोराचा धक्का बसतो. पण ते हृदयावर दगड ठेवून ठरवतात की यातलं काहीही आदितीला कळू द्यायचं नाही. कारण ती हे सगळं अजिबात सहन करु शकणार नाही. दोन दिवसानंतर जेंव्हा ती त्याच्या घरी येते तेंव्हा त्याचे आई-वडील त्याच्याविषयी सांगणं टाळू लागतात. पण हार चढवलेला निरवचा फोटो बघून ती हिसक्याने तो हार खेचते आणि म्हणते, “अंकल ही कसली चेष्टा आहे.त्याच्या फोटोवर हार का चढवला तुम्ही? शेवटी लपवता येणं कठीण वाटू लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगून टाकतात. पण तिला ही गोष्ट न पटणारी असते. ती म्हणते, “ हे कसं शकय आहे? गेले दोन दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यानं मला कालच तर कॉल केला होता. ती तिच्या सेलफोनमधील रिसिव्ह कॉलमधील निरवचा फोन नंबर दाखवते. पण त्यावर आता कॉलींग करुन पाहत असताना तो नंबर बिझी दाखवत असतो. पण तरीही ती त्यांना पटवून देण्यासाठी सांगते की निरव प्रत्येक रात्री नऊ वाजता मला कॉल करतो. आजही तो कॉल नक्की करेल.” उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे
आठ
वाजल्यापासून तिचा सेलफोन टेबलवर ठेवून तिन्ही बाजूला तिघेजण बसलेले असतात.
तिघांच्याही नजरा सेलफोनवर खिळलेल्या असतात.
तिघांच्याही मनात एक
चलबिचल असते आणि
भिती असते.
घड्याळात नऊचा ठोका पडतो.
आणि
त्या मोबाईलची रिंग वाजते.
थरथरलेल्या हाताने आदिती फोन
लाऊडस्पीकरवर ऑन
करते आणि
त्यातून आवाज येतो,
“हे आय लव यू डीअर” हे ऐकून त्याच्या
आई-वडीलांना
हा
विश्वास पटतो की
हा
निरव आहे.
मला
माहित आहे
मम्मी पप्पा तुम्हीही मला
ऐकतायं.
आदिती मम्मी पापा जे
काही म्हणतायतं की
मी
मेलोय ते
अगदी खरं
आहे.”
आदिती म्हणते,
“मग तू सध्या आमच्याशी
बोलत कसा
आहेस?
कसली मस्करी करतोस?
निरव म्हणतो,
“हीसुध्दा
तुझीच कृपा आहे.
तू
देवाकडे मागितलेल्या माझ्या तीन
इच्छा पूर्ण करण्याचे मागणे यातली ही
माझी दुसरी इच्छा होती की
मृत्यूनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलू शकेन आणि
तिच
इच्छा सध्या देव
माझी पूर्ण करतोय. ते जाऊ दे, पण
आता
लक्षात ठेव.
तुला आता
तुझं आयुष्य सावरायचं आणि
योग्य तो
वर
बघून तुला लग्न करायचं आहे.
माझ्या आठवणीत तू
तुझं आयुष्य बरबाद करु
नयेस असं
मला
वाटतं.
अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याने ती
म्हणाली.
ठीक
आहे
मी
करीन लग्न.
पण
तुझी पहिली इच्छा काय
होती?
निरव म्हणाला,
“अगं, ती तर मी मंदिरातच
मागितली होती.
तु
जे
मागतेस ते
तुला मिळो आणि
देवाने तुला दिलं.
माफ
कर
मला
उद्यापासून मी
तुला कॉल
करु
शकणार नाही.”
आई-वडीलांना
लगेच तो
हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि
लगेच फोन
कट
होतो.
आदितीच्या मनात एक
प्रश्न अनुत्तरीत राहतो की
निरवची तिसरी इच्छा काय
होती.
आज आदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली. ती एका श्रीमंत घरात नांदतीये. सध्या काळचे नऊ वाजतात. तिच्या मोबाईलची
पुन्हा एकदा रिंग वाजते.
ती
फोन
उचलते.
हेलो कोण?
समोरुन आवाज येतो,
“हे, आय लव यू डीअर.”
ती
म्हणते,
“नीरव, हा तूच आहेस? कुठे आहेस तू? कुठे होतास तू?”
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.
तिच्या सेलफोनवर पडलेला नंबर ती
बघते.
तिच्याच बंगल्यातील हॉलमधला लँडलाईनचा नंबर असतो तो.
बेडरुममधून बाहेर येऊन ती
हॉलमधल्या त्या फोनकडे ती
बघते.
फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो
तिच्याकडं बघून हसत
असतो.
आता
तिला कळालं की
निरवने देवाकडं तिसरी इच्छा कोणती मागितली होती ती.
सहा
वर्ष निरवच्या आठवणींनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रूंना आज
तिनं तिच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली.
ज्यामुळं तिचं मन
खूप
हलकं झालं.
काहीजणांच प्रेम हे
अद्वीतीय असतं जे
वास्वतविकतेच्या खूपच पलीकडचं असतं.
पण
खूप
वेळा अशा
प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही आणि
म्हणून त्याची योग्य किंमत कळत
नाही.
अन्
जेंव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते तेंव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी आपल्याला किंमत राहिलेली नसते.
यानंतर आदितीचं त्यांच्या घरी येणं-जाणं म्हणजे कायमचं होऊन जातं. पण तरीही त्यांचं मोबाईलवरच बोलणं काही थांबलं नव्हतं. एक दिवस आदिती निरवला पूर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या उन्हाळी सुट्टीला जाते. इकडे निरवच्या काम करण्याच्या ठिकाणी जोराचा अपघात होतो आणि त्यातच त्याला आपला जीव गमवावा लागतो. त्याच्या आई-वडीलांना याचा जोराचा धक्का बसतो. पण ते हृदयावर दगड ठेवून ठरवतात की यातलं काहीही आदितीला कळू द्यायचं नाही. कारण ती हे सगळं अजिबात सहन करु शकणार नाही. दोन दिवसानंतर जेंव्हा ती त्याच्या घरी येते तेंव्हा त्याचे आई-वडील त्याच्याविषयी सांगणं टाळू लागतात. पण हार चढवलेला निरवचा फोटो बघून ती हिसक्याने तो हार खेचते आणि म्हणते, “अंकल ही कसली चेष्टा आहे.त्याच्या फोटोवर हार का चढवला तुम्ही? शेवटी लपवता येणं कठीण वाटू लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगून टाकतात. पण तिला ही गोष्ट न पटणारी असते. ती म्हणते, “ हे कसं शकय आहे? गेले दोन दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यानं मला कालच तर कॉल केला होता. ती तिच्या सेलफोनमधील रिसिव्ह कॉलमधील निरवचा फोन नंबर दाखवते. पण त्यावर आता कॉलींग करुन पाहत असताना तो नंबर बिझी दाखवत असतो. पण तरीही ती त्यांना पटवून देण्यासाठी सांगते की निरव प्रत्येक रात्री नऊ वाजता मला कॉल करतो. आजही तो कॉल नक्की करेल.” उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा