गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

33. कर्करोग

एक प्रेम वेडा तिच्यावर खूप प्रेम करायचा. .. म्हणतात ना, शोधणाऱ्याला देव ही मिळतो, तसेच हयाने तीला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर हयाने तिला मिळविलं होतं. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. तिचं जरा जास्त होतं. पण काय करणारदोघांचीही भेट होणं शक्य नव्हतं. कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोनवर बोलणं तसं दररोजचं. पण सहा महिन्याने भेट होतं असे. पण एक दिवस सगळं नूरच पालडतो. हयाला अचानक रक्ताच्या उलटया होतात. हयाला डॉक्टरांकडून समजतं की, मला कर्करोग झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने आहेत. हा तिला समजू देत नाही, कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो. आणि तिच्या वाढदिवसादिवशी हयाला तिला पहायचे असते. तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात. आणि हयाला कळून चुकलेलं असतं की, आपली वेळ जवळ आलीय. हा मनात विचार करतो की, हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटचं पहायचं आणि मगच आपले प्राण सोडायचे.
सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी यांची पहिली भेट झाली होती. तिच्या कॉलेजमध्ये फंक्शन (कार्यक्रम)असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते. हा तिला शेवटचं विचारतो की तुला यायचं आहे की नाही. कसलाही विचार करता ती त्याला नाही सांगते. वाढदिवसाचा दिवस उजाडतो. हयाची वेळ जवळ आलेली असते. हा तिला फोन करतो आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ही त्याला विचारते, काय करतोयस?  आणि हा शेवटी एवढंच म्हणतो, मी मृत्यूच्या दारी उभा आहे …… मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटचं पहायची खूप इच्छा होती गं…… पण तूही नाही म्हणालीस….. जाता जात तुझ्या मिठीत यायचं होतं पण तुला मला भेटायचं नव्हतं…… तेंव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठीमध्ये घेशील ना? ही विचारते, काय झालं? आणि फोन कट होतो.
ही त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते. तिला त्याच्या आईकडून समजते. ही जेंव्हा त्याला आपल्या मिठीमध्ये घेऊन रडत असते, तेंव्हा त्याचा डावा हात खाली पडतो. त्याच्या हातावर लिहलेलं असतं की, जानू रडू नकोस कारण तुझ्या डोळयातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले. मला माफ करहयानं ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं, त्याच ठिकाणी ही प्रेमवेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पहात असते, फक्त हयाच आशेने की तो कोणाच्यातरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल…… पण म्हणतात ना, डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्या आड गेलेला जीवलग परत कधीच दिसत नाही.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...