शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

34. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी

 7 वी ला असताना :
     मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुलीकडे पहात रहायचो. ती माझी Best Friend (उत्कृष्ट मैत्रिण) होती.  पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हतं आणि मला ते माहित होतं. वर्ग सुटल्यानंतर तिनं माझ्याकडे तिच्या Miss (चुकलेल्या) झालेल्या तासांच्या नोट्स मागितल्या. मी दिल्या, ती गेली . मला सांगायचं होते बरंच काही, पण जमलं नाही. माहित नाही, असे का झाले?
कॉलेजला असताना :
     माझ्या फोनवर कॉल आला. तिचाच होता तो. ती रडत होती आणि त्यातच पुटपुटत होती आणि मला सांगत होती, तिचं ज्याच्यावर प्रेम होतं त्यानं कसा त्रास दिला तिला. तिनं मला भेटायला बोलवलं. मी तिला भेटायला गेलो. मी तिच्या समोर बसलो होतो. मी  तिच्या डोळयात आणि अश्रू पहात बसलो होतो. 2 तास काही बोललो नाही. मला तिला सांगायचं होतं. मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीटं काढली. पण तिनं मला म्हटलं, मी झोपते. तिने म्हटले, बरं वाटलं, तू माझ्यासाठी इथं आलास. खूप वेळा शांत उभा होतो. मग मी निघालो. आजही मला म्हणता आलं नाही की, माझे तिच्यावर प्रेम आहे. माहित नाही, असे का झाले?
सिनीअर वर्षाला :
     आमच्या कॉलेजमध्ये प्रोम नाईट (कार्यक्रम) होती ज्यांत मुलगा आणि मुलगीनं जोडीनं जायायचं. ती माझ्या लॉकरजवळ आली आणि म्हणाली, माझ्यासोबत कोणी नाही आहे. तू माझ्यासोबत येशील? माझ्यासोबतही कोणीही नव्हतं. आम्ही दोघांनी बेस्ट फ्रेंड या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला.
कार्यक्रमातून बाहेर पडताना :
     प्रॉम नाईटला सगळं काही नीट झालं. आम्ही दोघे निघालो. मी तिची वाट पहात होतो. ती तेवढयात आली, तिनं माझ्याकडं बघून Smile ( स्मित हास्य) दिली. आजही नेहमीसारखं तिला काही बोलू शकलो नाही. पण मी आनंदीत होतो कारण ती आनंदीत आहे.
ग्रॅज्युएशनला असताना :
     दिवसामागून दिवस गेले. आठवडे लोटले, कितीतरी महिने गेले. तिला काही बोलण्याआधीच ग्रॅज्युएशन डे आला होता. मी तिला पाहिलं. तिनं साडी नेसली होती. खूप छान दिसत होती ती. माझं तिच्यावर एकतफी्र प्रेम होतं. पण काय करणार, तिचं जमत नव्हतं नाआमची शेवटची भेट होणार होती. ती समोरुन आली, मला तर काही बोलताच आलं नाही. तिनं माझ्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि म्हटली, आपण नक्कीच भेटू कधीतरी, काळजी घे.  बघा ना गंमत, आजही जमलं नाही बोलायला.
तिच्या लग्नाच्या वेळी :
काही वर्षांनी मी लग्नात आलो होतो आणि ते लग्न होत तिचं. तिचं दुसऱ्यासोबत लग्न ठरलं होतं. माझं प्रेम कधी व्यक्तच करता नाही आलं. पण तिला मैत्रिचं नातं जास्त पसंत होतं आणि मी तेच निभावलं. आजही तिला म्हणता आलं नाही की, माझं तुझ्यावर प्रेम आहे.
     खूप वर्षांनी मी आमच्या शाळेत एकदा गेलो. तिथे आमच्या वर्गात सगळेजण आले होते, ती ही.  तिथे प्रत्येकानं आपली लहान पानं लिहलेली पत्रं ठेवली होती. मी तिनं लिहलेलं पत्र सहज घेतलं आणि वाचायला लागलो.
7 वीच्या वर्गात असताना :
विनीत नेहमी माझ्याकडे बघत असतो, किती वेडा आहे हा मुलगा.
कॉलेजला असताना :
     आजही मी त्याला खोटं सांगितलं की माझा ब्रेकअप झाला. तरीही हा वेडा माझ्यासाठी आला.
प्रॉम नाईटला :
     आज तरी त्यानं मला म्हणावं की, माझ्यावर प्रेम आहे, मी वाट बघतोय.
ग्रॅज्युएशनला असताना :
     किती लाजाळू आहे हा. साडीत पाहून काही बोलला नाही.
लग्नाच्या वेळी :
     आज माझं लग्न आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. पण अजूनही त्यानं मला म्हटलं नाही, तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील.
     हे सगळं वाचल्यानंतर तो तिथं रडायला लागला  आणि त्यानं पाहिलं तर समोरुन ती आज रडत होती. कारण एकमेकांचे असीम प्रेम व्यक्त करायला जमलं नाही दोघांना.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...