सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

52. प्रेम ठरवून होत नाही… नकळत होऊन जातं…

         दुपारची वेळ होती. ऑफिसमध्ये फार काम नव्हतं. मग सगळेजण गप्पा मारत बसलो. गप्पांचा विषय ठरला. ग्रुपमध्ये एक मित्र होता. त्याला त्याची लव स्टोरीची सुरवात विचारली आणि त्याने जे सांगितलं ना, जवळ जवळ पंधरा मिनिटं आम्ही पोट धरुन हसत होतो. तुमच्यासोबत शेअर करावीसी वाटली म्हणून सांगते.
    ते दोघेही तेंव्हा कॉलेजमध्ये होते. एकाच गावामध्ये रहात असल्यामुळे ओळखत होते एकमेकांना. ती अभ्यासात हुशार होतीदिसायलाही गोरी पान आणि सुंदर आणि तो अभ्यासाच्या नावाने . तिचे नोट्स नेहमी तयार रहायचे. ती लिहून घ्यायची म्हणून. तो बोलायचा तिच्याशी. आणि दिसायला तर विचारुच नका. तिच्यापेक्षाही एकदम विरुध्द. पण तिचा तो साधेपणा, स्वभाव आवडायचा त्याला. पण कधी बोलायची हिंमत व्हायची नाही. पण एकदा व्हॅलेंटाईन डे ला तो ठरवतो. आज काहीही करुन बोलायचं. जातो गुलाब घेऊन. ती नोट्स लिहीत बसलेली असते.
    तो काही बोलणार इतक्यात काही मुलांचा ग्रुप तेथे येतो आणि त्यातला एक मुलगा तिला म्हणतो, हे बघ ! कॉलेजमध्ये दोनच गोष्टी प्रसिध्द आहेत. एक म्हणजे मी कारण मी दिसायला चांगला मुलगा आहे म्हणून आणि एक तू कारण तू सर्वांत सुंदर आहेस म्हणून. मग ह्या दोन्ही गोष्टी एक झाल्या तर दोघांचाही फायदा होईल. म्हणजेच याचा अर्थ मला तू आवडतेस. तो पुढे काही बोलायच्या आतच ती त्याला जोरात कानाखाली मारते आणि म्हणते, कदाचित तुझा गैरसमज झाला होता. प्रसिध्द तर तू आजपासून झालास. आता सगळे तुला आणि मला एकत्र आठवतील. बरोबर ना?... आणि ती तेथून निघून जाते. हे पाहून माझा मित्र इतका घाबरतो की तिला काही सांगताच घरी येतो.
   त्या दिवसानंतर तो थोडे दिवस शांत राहतो. पण मन शांत होत नसते. म्हणून पुन्हा एकदा ठरवतो. जातो कॉलेजला. ती मैत्रिणीसोबत असते. तो तिला बाजूला बोलवतो. खूप प्रयत्न करत असतो पण दुसरच काहीतरी बोलतो. जाताना म्हणतो की, खूप दिवसांपासून एक विचारायचं होत तुला?????????? ती म्हणाली, काय?... विचार ना ! तो मोठा श्वास आत घेतो, डोळे बंद करतो आणि म्हणतो, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. डोळे उघडतो. ती काही बोलायच्या आधीच तो म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी…… तुला राग आला असेल तर पण आय लव यू. आणि जे पळतो तिथून ते डायरेक्ट चर्चगेट स्टेशनवर येऊन थांबतो. (खरं तर शब्दांत हे मांडण जमलं नसेलं मला कदाचित. पण तो जेंव्हा हे सांगत होता तेंव्हा आम्ही पोट धरुन हसत होतो.)
     आणि मग पुढचे चार दिवस तो कॉलेजला जात नाही. पाचव्या दिवशी जातो कॉलेजला. ती त्याला पाहते आणि बोलायला येतच असते. पण तो तिला घाबरत असतो. सारखा पळतच असतो. तो लायब्ररीमध्ये जातो. ती पणतो कँटीनमध्ये जातो. ती पणमग पूर्ण वेळ ती त्याच्या मागे आणि तो पळतमग शेवटी तो लेक्चरला जाऊन बसतो. ती पण वर्गात येते. शिक्षक शिकवत असतात. पण तरीही ती त्याला खाणाखुणाने बोलवत असते. तरीही तो दुर्लक्ष करत असतो. शिक्षकांच्या हे लक्षात येताच दोघांनाही वर्गाबाहेर हकलून काढण्यात येतं. तिला तेच हव असतं. ती बाहेर येते. त्याचा हात पकडते, काय झालयं तुला सकाळपासून, पळत का आहेतस???????  चार दिवसापासून कॉलेजला आला नाहीस. त्या दिवशी तू पळून गेलास. तुझ्या मित्रांना विचारलं तेंव्हा ते म्हणाले तो टॅक्सी पकडता पळत गेला इथून. काय झालं तुला???????????
    तो म्हणाला, मला वाटलं, मी तुला आय लव यू बोलल्यावर तू त्या मुलाला मारलं, तसं मला कानाखाली मारशील. मला तुझी खूप भिती वाटली तेंव्हा. आणि नंतर चार दिवस हिम्मतच होत नव्हती माझी. आज आलो. तू बोलवल होतीस. पण मला वाटलं, तू कानाखाली मारायला मला बोलवत आहेस. म्हणून मी पळत होतो. हे ऐकल्यावर ती हसायला लागते, इतकं प्रेम करतोस ना? मग घाबरतोस का इतका? तो म्हणाला, कारण तू राग आला तर तू दु:खी होशील आणि मला तुला दु:खी करायच नाही. आणि तसही माझ्याकडे तुझ्यावर प्रभाव पाडायला तसं काहीच नाही. मी ना हुशार आहे आणि ना चांगला दिसतो आणि ना माझ्याजवळ पैसे आहेत. मला वाटलं जर तू त्या चांगल्या दिसणाऱ्या मुलाला कानाखाली मारु शकते, तर मला तर तू बदडूनच टाकशील. म्हणून मी पळत होतो. ती हसते आणि म्हणते, अरे पण उत्तर ऐकायचं ना? हा, तू त्या मुलासारखा चांगला दिसत नाहीस पण तुझं मन सुंदर आहे. प्रामाणिक आहेस आणि हा जो मला इतका घाबरतो तो पुढे आयुष्यामध्ये मला दु:खी कधीच नाही करणार. तरीसुध्दा तू मला आवडतोसमूर्ख कुठला. हे सांगण्यासाठी मी सकाळपासून तुझ्या मागे आहे आणि तू बावळटासारखा पळत आहेस. जाऊ दे. आता मला मिठी मार.
    तर अशी त्या मित्राची लव स्टोरी सुरु झाली. त्याला पाहिलं की तो प्रसंग आठवतो. तो नेहमी बोलतो, प्रेम हे ठरवून होत नाही, नकळत होऊन जातं. आणि जर मन सुंदर असेल तर समोरचा कसाही असू दे, तुमच्यापेक्षा जास्त असू दे प्रत्येक गोष्टीत. पण तो तुमच्यातल्या चांगल्या गुणांनाच नेहमी पाहतो आणि तुमच्यावर प्रेम करतो

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...