एक मुलगा आणि
एक
मुलगी एकमेकांवर खूप
प्रेम करत
होते.
ते
नेहमी एकमेकांसोबत जगण्यामरण्याची शपथ
घेत
होते.
पण
ती
मुलगी हिंदू होती आणि
मुलगा मुस्लीम होता.
मुलगीला माहित होते की
तिचे वडील कधीच त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणार नाहीत.
म्हणून तिनं त्या मुलाशी बोलून त्याला तिला विसरायला सांगितले.
मुलग्याने तिला खूप
समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण
मुलगीने ते
मान्य केले नाही.
तो
आपल्या हृदयावर दगड
ठेवून त्या मुलगीपासून वेगळे झाला.
पण
त्याला विसरणे त्या मुलगीच्या आवाक्यात नव्हते. कारण ती त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती. पण तीला असं करणे गरजेचे होते. कारण ती हिंदू होती व तो मुस्लीम. असेच काही महिने होऊन गेले.
एके दिवशी अचानक तो मुलगा त्या मुलगीच्या
घरी
आला
आणि
तिला म्हणाला की,
“तू मला विसरुन गेलीस पण माझ्या प्रिये मी तुला विसरु शकलो नाही. कृपया हे पत्र वाच. मुलगीने ते पत्र हाती घेताच ती त्याला म्हणाली की माझ्या जीवा मी तुला एक वेळ मिठी मारु शकते का? कृपया…
आणि
त्या मुलग्याच्या डोळ्यात अश्रू आले. मुलगा स्मित हास्य करत म्हणाला की, का
नाही?
मुलगीने त्याला रडत
मिठी मारली आणि
म्हणाली कृपया,
माझ्या जीवा मला
माफ
कर.
मी
तुझ्यावर प्रेम करते.
मुलगा हसत
म्हणाला,
“
माझेसुध्दा तुझ्यावर प्रेम आहे.”
ठीक
आहे.
आता
मला
वेळ
होत
आहे.
काळजी घे
असे
म्हणून तो
तिथून निघून गेला.
त्या मुलगीने ते
पत्र उघडले आणि
ती
वाचायला लागली.
त्यात असे
लिहले होते,
“
प्रिये मी
तुझी वेड्यासारखी आठवण काढतो.काल मला मरुन एक वर्ष पूर्ण झाले. कृपया माझ्या कबरीवर फूल टाकायला नक्कीच ये.”
तेवढ्यात ती
अचानक भानावर आली.
तिला झालेला तो
भास
होता.
पण
मुलग्याचा खरोखरचं मृत्यू झालेला होता.
कारण तो
तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलगीचा विचार मनात आणू
शकत
नव्हता.
ती
त्याच्यापासून वेगळी झाली आहे
हे
त्याला पटत
नव्हते.
पण
कधीतरी त्याला ह्या सत्याची जाणीव व्हायची.
तिच्याशिवाय राहून तो
एकटेपणाचे दु:ख जास्त वेळ सहन करु शकला नव्हता. म्हणून त्याने आत्महत्या
केली होती.
तिलाही त्या घटनेची माहिती नंतर समजली.
आणि
ह्या घटनेला काल
एक
वर्षे पूर्ण झाले होते.
तिला त्या रात्री संपूर्ण रात्र झोप लागली नव्हती.
दुसऱ्या दिवशी ती त्याच्या
कबरेवर फूल
ठेवून तेथून रडत-रडत बाहेर आली. तिला तिच्यावर
खूप
पश्चाताप होत
होता.
तिला वाटत होते की
तिच्यामुळेच त्याला आपला जीव
गमवावा लागला.
खरचं तिनं त्यावेळी ब्रेकअप केला नसता
( म्हणजे भांडण किंचस गैरसमज होऊन बोलणे बंद
करणे,
स्वत:चे नाते तोडणे की जे प्रेमाचे
किंवा मैत्रीचे असते.) तर आज तिचे प्रेम जिवंत असते. हा विचार करत-करत
ती
मुलगी नदीजवळ जात
होती तेंव्हाच तिला तो
मुलगा पुन्हा हसत
असल्याचा दिसला. ती मुलगी वेड्यासारखे त्याच्याजवळ रडत-रडत
पळत
होती आणि
त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडते. जवळपासचे
लोक
त्या मुलगीला पाहून किंचाळत होते कारण ती
नदीच्या मध्यभागी जाऊन पोहचली होती.
पण
त्या मुलगीने पाठीमागे वळून पाहिलेच नाही.
ती
तर
त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये गुंग झाली होती.
आणि
लोक
किंचाळून किंचाळून म्हणत होते,
“कुणीतरी थांबवा या मुलीला. पाण्याला
खूप
वेग
आहे.
पाण्यात बुडून मरेल.”
कदाचित काहींचे प्रेम असेच असते !
कदाचित काहींचे प्रेम असेच असते !
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा