रात्री अकराची वेळ.
ती
दादरच्या स्टेशनवर लोकलची वाट
बघत
होती.
कानात हेडफोन घालून मस्त गाणी ऐकत
होती.
नेहमीची
10.50 ची
लोकल तिला चुकलेली.
त्यामुळे आता
पुढच्या लोकलची वाट
बघण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
जसजसा वेळ
जात
होता तसतशी तिलाही काळजी वाटत होती.
तसं
लहानपणापासून मुंबईत राहणारी.
दादर ते
डोंबिवली रोजचा प्रवास ठरलेला.
पण
तिला काळजी वाटत होती कारण तिला आज
बाराच्या आधी
घरी
पोहचायचं होतं.
तिच्या आईचा वाढदिवस होता ना…
सुरेखा
! सुरेखा
! नांव तिचं.
जेमतेम २५
वय
असेल तीचं.
पण
वयाच्या मानानं खूप
काही सोसलं होतं.
मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी.
दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती.
बापाची नोकरी गेलेली.
त्यात तो
बेवडा…
आई
थोडं काम
करुन पैसे मिळवायची आणि
बाप
ते
पैसे दारुमध्ये घालवायचा.
सुरेखा खूप
शिकली.
चांगला जॉबपण मिळाला.
अन
नुकतचं तिचं लग्न ठरलेलं.
२
महिन्यानंतरचा मूहूर्त होता.
थोड्या वेळात लोकल आली. ती लगेच गाडीत चढली. आज गाडी रिकामीच होती. दोन-तीन मुलीच होत्या. त्यापण थोड्या वेळाने पुढच्या स्टेशनवर उतरल्या. अन अचानक ट्रेनमध्ये तीन चार तरुण चढले. तोंडावरुन ते टपोरी वाटत होते. सुरेखा थोडीशी बावरली. पण तिने गाण्याचा आवाज वाढविला आणि मस्त गाणी ऐकत बसली. हळूहळू गाडीनेही थोडासा वेग वाढविला. एवढ्यात ते चारजण तिच्या जवळ येऊन बसले. तिने गाणी बंद केली व हेडफोन काढून पर्समध्ये ठेवला. आता मात्र ती चांगलीच घाबरली. त्यातल्या दोघांनी शेरेबाजी सुरु केली. त्यांच्या तोंडातून अश्लील शब्द ऐकून तिला खूप विचित्र वाटलं. ती उठली आणि दरवाजाकडे येऊन उभी राहिली. तिने मनात सर्व देवांची विनवणी केली. पुढे काय घडणार हे तिला चांगलच कळून चुकलं होतं. तेवढ्यात तिच्या पाठीवर स्पर्श जाणवू लागला. आता मात्र ती बिथरली. डोळ्यांतून आसव गळू लागली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या दणकट हातांसमोर तिच्या कोमल हातांचा प्रतिकार म्हणजे हत्तीला मांजराने प्रयत्न करण्यासारखे होते. त्यांचे वासनेने बरबटलेले हात तिच्या संपूर्ण शरीरावरुन फिरत होते. तिच्या छातीवरची ओढणी दरवाज्यातून उडून गेली. ती नुसती थरथरत होती. अचानक तिची हालचाल बंद पडली. तिचे शरीर थंड पडले. तिने मनाशी निर्णय घेतला आणि धावत्या लोकल मधून तिने स्वत:ला झोकून दिले.

या कुत्र्यांच्या हाती लागण्यापेक्षा तिला हा मार्ग जास्त सोयीस्कर वाटला होता. दगडावर आपटून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते. त्या नराधमांना याची काही काळजी नव्हती. त्यातल्या एकाने खिशातली सिगारेट पेटवली व म्हणाला, “मेली कर्माने… आमच्या कामी आली असती पण ते पण नाही…” तिच्या आईला रात्री बारा वाजता फोन आला. वाढदिवसांच्या शुभेच्छांचा नव्हे तर एकुलत्या एक कमावत्या लग्न ठरलेल्या मुलीच्या मृत्यूच्या बातमीचा. तिच्या समोर सुरेखाचा हसरा चेहरा उभा राहिला. पुढे मी काही लिहण्याची गरज नाही की त्या मुलांनी असं का केलं. तिच्या आईच काय होणार… तुमच्या वाचकांपैकी सर्व चांगल्या घरातून असाल आणि तुम्ही असे काही करणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्या लोकांनी जर हे वाचले असेल तर त्यांच्यात काहीही फरक होणार नाही हे देखील मला माहित आहे.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा