आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय
करतो?
आपण
कधी
त्याचा विचार करतो का?
बऱ्याचदा नाही.
मग
खालील गोष्ट वाचा.
प्रेम म्हणजे काय
याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.
एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरे तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतोस? तो तिला म्हणाला की अगं मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे नक्की. ती म्हणते, “अरे, तू माझ्यावर प्रेम करतोस मग तुला माहीत नाही, तू का प्रेम करतोस ते? तुला मी का आवडते हेच माहीत नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?” तो म्हणाला, “प्रिये, अगं खरचं. मला त्याचं कारण माहीत नाही. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिध्द करु शकतो.” ती म्हणते, “सिध्द काय कसंही करु शकशील रे, पण मला कारण हवयं. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारण दिली होती. तुला एवढीही कारण सुचत नाहीत का?” तो म्हणतो, “ठीक आहे, तुला कारणचं हवी आहेत ना, मग ही घे सांगतो. मला तू आवडतेस कारण तू सुंदर आहेस. तुझा आवाज अतिशय सुंदर आहे. तू अतिशय काळजी घेणारी आहेस. तू अतिशय प्रेमळ आहेस. तू विचारी आहेस. तुझे हास्य मोहक आहे. तुझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.”
प्रियसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खूश झाली. दुर्दैवाने काही दिवसानंतर त्या प्रियसीचा अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगेच भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरुपयाने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातील मजकूर असा, “प्रिये, तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो पण आता तू बोलू शकतेस का? नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. तुझा काळजी घेणारा स्वभाव मला आवडायचा पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. तुझे मोहक हास्य आणि विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत होतो. पण आता तू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आता या क्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते ? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच… मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
थोडक्यात
या
गोष्टीचा निष्कर्ष असा
की
खरे
प्रेम कायम असते,
उडते ती
वासना.
प्रेमाचे बंध
आयुष्यभरासाठी असतात.
पण
ते
प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात.
मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते,
मला
तुझी गरज
आहे
म्हणून मी
तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते मी
प्रेम करतो म्हणून मला
तुझी गरज
आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे
तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते.
पण
तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे
तुमचे हृदय ठरवते.
प्रेमकथा महत्वाच्या नसतात.
महत्वाची असते ती
तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
आणि
शेवटी…
ज्यांचा देवावर विश्वास असतो ते
भू
तलावर असतात आणि
देव
मात्र स्वर्गात असतो.
पण
जे
देवावर प्रेम करतात ते
त्याच्यासमोर असतात.
एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरे तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतोस? तो तिला म्हणाला की अगं मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे नक्की. ती म्हणते, “अरे, तू माझ्यावर प्रेम करतोस मग तुला माहीत नाही, तू का प्रेम करतोस ते? तुला मी का आवडते हेच माहीत नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?” तो म्हणाला, “प्रिये, अगं खरचं. मला त्याचं कारण माहीत नाही. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिध्द करु शकतो.” ती म्हणते, “सिध्द काय कसंही करु शकशील रे, पण मला कारण हवयं. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारण दिली होती. तुला एवढीही कारण सुचत नाहीत का?” तो म्हणतो, “ठीक आहे, तुला कारणचं हवी आहेत ना, मग ही घे सांगतो. मला तू आवडतेस कारण तू सुंदर आहेस. तुझा आवाज अतिशय सुंदर आहे. तू अतिशय काळजी घेणारी आहेस. तू अतिशय प्रेमळ आहेस. तू विचारी आहेस. तुझे हास्य मोहक आहे. तुझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.”
प्रियसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खूश झाली. दुर्दैवाने काही दिवसानंतर त्या प्रियसीचा अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगेच भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरुपयाने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातील मजकूर असा, “प्रिये, तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो पण आता तू बोलू शकतेस का? नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. तुझा काळजी घेणारा स्वभाव मला आवडायचा पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. तुझे मोहक हास्य आणि विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत होतो. पण आता तू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आता या क्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते ? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच… मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा