बदलत्या जगातही व्यक्तीला सुखाने व समाधानाने जगता येईल. 🌷
*जगातील सर्व वस्तू गतीशील आहेत, अनित्य आहेत, सर्व अनित्य जात म्हणजे निर्माण होय. विकास पावणे, क्षय होणे, हा त्याचा स्वभाव सिद्ध गुण आहे. आपण आपली चेतना स्थिर आहे व ती जन्म जन्मांतरी स्थिर असते असे समजतो. चेतना बदलणारी असते असे म्हणतो. जगातील सर्व वस्तू बदलणार्या असल्यामुळे वस्तूचे गुणधर्म स्थिर असू शकत नाही. सर्व धर्म अनित्य आहेत.
जगात स्थिर असे काहीच नाही. जे स्थिर दिसते ते तुलनेत स्थिर आहे. सर्व जीवन सतत परिवर्तनशील आहे. आपणास वस्तू स्थिर दिसतात, त्या स्थिर आहेत असे आपण म्हणतो.
जीवन समाधानाने जगण्यासाठी जगात काही स्थैर्याची गरज आहे हे मान्य, पण सृष्टीतील बदलाकडे दुर्लक्ष करून आपण आपले जग स्थिर आहे असे कल्पून काही स्थिर नियमांच्या चौकटीत जीवन बांधून घेतल्याने स्थैर्य निर्माण होऊ शकत नाही. मन शांत करण्याचा हा मार्ग योग्य नव्हे त्याच्या उलट जग असे आहे तसे समजून घेतले तर मनातील भ्रम दूर होऊ शकतील, बदलत्या वस्तूकडे किंवा मुल्याकडे मन आसक्तीने धाव घेणार नाही व त्यामुळे मनशांत होऊ शकेल.
माणसाने जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी असे स्थैर्य फार काळ टिकून राहत नाही. जगात स्थैर्य व निश्चितता आहे असा जो आजपर्यंत समज होता तो हळूहळू नष्ट होत चालला आहे व जगात अनिश्चितता व लवचिकता आहे हा विचार सध्या समोर येत आहे.
जीवन अनिश्चित आहे त्यात सतत प्रश्न निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊन जीवनाचे प्रश्न सोडविण्यात सहाय्यक होईल असे जीवनाचे तत्त्वज्ञान भगवंताने निर्माण केले. जीवनातील प्रश्न नष्ट करण्याचा मार्ग सुचविला आहे. केवळ जगात प्रश्नच प्रश्न आहेत असे सांगत नाही, तर तेथे दुःख नष्ट होते तेथे सर्व प्रश्नांचा नाश होतो. या सत्याकडे निर्देश करतो. जगात अनिश्चितता आहे व ती आपणासाठी दुःख निर्माण करते. आपण निश्चिततेची अभिलाषा बाळगतो म्हणून हे दुःख निर्माण होते. परिवर्तन हा जीवनाचा गाभा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेत नाहीत व प्रत्येक भावना स्थिरच असावी असे समजून जगात स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळेच स्वतःसाठी दुःख निर्माण करित असतो. अशा रितीने आपण आपल्या दुःखाचे निर्माते बनतो, असे सांगणे आहे. ह्या तृष्णेची प्रक्रिया समजून घेऊन तिच्यापासून मुक्त होता आले तर ह्या बदलत्या जगातही व्यक्तीला सुखाने व समाधानाने जगता येईल.
🌞 प्रकाशाने अंधार भेदला जातो. 🌞
संपादक : गटपाडे एन आर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा