शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

46. वडीलांचे महत्व

        वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटते नाही ? पण आपण कधी-कधी मुद्दामून जाणून बुजून बापआज अशाच एका बापाची कहाणी.
          आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात आणि या अस्तित्वाला खरे कुणी समजून घेतय का? वडीलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही. लोकांनी वडील रेखाटलेले, पण तापट, व्यसनी मारझोड करणारे???? नाही. समजात एक-दोन टक्के वडील असतीलही असे. पण चांगल्या वडीलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, रडून मोकळी होते. पण सांत्वन वडीलांनाच करावे लागते. आणि श्रेयश्रेय नेहमी ज्योतीलाच मिळते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही सहज विसरुन जातो.???
    आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते पण रात्री उशीत तोंड खूपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात. स्वत:चे वडील वारले तरीही त्यांना रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचे असते. पत्नीने अर्धवट साथ सोडली तरीही त्यांना पोरांच्या अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाऊंनी शिवबांना  घडविले असे आवश्य म्हणावे पण  त्याच वेळी शहाजी राजांची ओढताण लक्षात घ्यावी. देवकी, यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण भर पुरात पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात घ्यावा. राम हा कौशल्येचा पुत्र जरुर आहे पण वियोगाने तडफडून मरणारा पिता दशरथच होता.
      वडीलांच्या टाचा, झिझलेल्या चपला, त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळते आपल्या नशिबाची भोक त्यांच्या बनियनला पडलेली आहेत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा काटकसर दाखवितो. मुलाला लुंगी घेतील, मुलीला गाऊन घेतील पण स्वत: मात्र जुनीच पँट वापरतील. मुलगा सलूनमध्ये तीस-चाळीस रुपये सहज खर्च करतो. मुलगी पार्लरमध्ये पन्नास रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला आहे म्हणून अंघोळीच्या साबणाने दाढी खरवडेल. तेही नाहीतर कधी कधी पाणी लावून दाढी करतो. वडील स्वत: आजारी पडले की  लगेच दवाखान्यात जात नाहीत. ते आजाराला मुळीच घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महिना घरी बसायला लावेल याची त्यांना भिती वाटते.  कारण मुलीचं लग्न, मुला-मुलींचे शिक्षण बाकी असते. घरात उत्पन्नाचे दुसरे साधन नसते. ऐपत नसते तरीही मुला-मुलींना उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेऊन दिला जातो. ओढताण करुन दर महिन्याला मुलाला पैसे पाठवून दिले जातात. सर्वच नसले तरी काही मुले अशी असतात की तारखेला पैसे पोहचले की मित्रांना परमिट रुममध्ये घेऊन जातात आणि ज्या वडीलांनी पैसे पाठविले त्यांची टिंगल करतात, एकमेकांना त्यांच्या वडीलांच्या नावाने हाक मारतात.
                    बाप सहसा ओळखता येत नसतो. कारण कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो. तर कधी पैसा नसल्याने वाईट असतो. कधी बाप रागामुळे वाईट असतो.  धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. अडाणी बाप सर्वांना माहीत असतो. पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बोलणे हे ऐकून घेतो. आतल्या आत बाप तसा रोजच रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बाप वाहत असतो.  सर्वांच्या आवडीची किंमत तो बाप चुकवत असतो. मुलांना पायावर उभ करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलाचं हातभर सुख पाहणारा  बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नसतो. आईबरोबर मुलांना घडवण्याचं काम बाप सुद्धा करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. बापाला थकण्याचीही परवानगी नसते. काही ठिकाणी बापाला अडचणी सांगण्याची ही परवानगी नसते. आणि बापाला थांबण्याची ही परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हा बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो. नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून रडत असतो. हा बाप सहजपणे ओळखता येत नसतो आणि आपले अश्रू कोणाला दिसू देत नसतो.  तो मनातलंही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो.
       ज्या घरात वडील आहेत त्या घरात कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही. कारण त्या घरातला करता जिवंत असतो. तो प्रत्यक्ष काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो. घरच्यांचे कर्म बघत असतो. आई असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते. कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात येत नाही. चत फटका बसला की, ठेच लागली की आई !हाच शब्द बाहेर पडतो पण रस्त्यावर आडव्या आलेल्या गाडीने अचानक ब्रेक लावल्यावरबाप रे ! हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटांना आई टाळते पण मोठ मोठी वादळे पेलताना बापच आठवतो. पटतय का? मंगल प्रसंगी सर्व कुटुंब जाते पण मयताच्या प्रसंगाला बापच जातो. मुलाच्या नोकरीसाठी झटणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वत:च्या व्यथा दडपणारा बाप ! खरच किती महान आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...