गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

48. आईचे प्रेम

 एक खरी घडलेली कथा आहे.
     आई आणि तिचा लहान मुलगा दोघे एकत्र रहायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. ती आपल्या मुलाला मे महिन्याच्या सुट्टीत दररोज बागेत फिरायला तसेच इतर मुलांच्या बरोबर खेळायला आणत होती. असाच एक दिवस तो मुलगा बागेत खेळत होता आणि अचानक बागेला आग लागली. आई आपल्या मुलाला वाचविण्यासाठी बागेकडे धावली. लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला.  पण ते यशस्वी झाले नाही.  तिनं मुलाला उचललं पण आगीच्या झळीनं तिचं केस, तिचा चेहरा जळाला.
      आई आणि मुलगा दोघेही वाचले पण आई कुरुप दिसू लागली होती. मुलगा जसजसा लहानाचा मोठा होत गेला तसा आईचा चेहरा पाहून त्याच्या मनात तिरस्कार वाढत गेला. तो मोठा झाला. शहरात व्यवसायासाठी निघून गेला. व्यवसायात यशस्वी झाला, श्रीमंत झाला. कोणीतरी त्याला आईविषयी विचारलं की तो सांगायचा, जी बाई दिसायला खूप कुरुप दिसते अशा कोणत्याही बाईशी माझा कसल्याही प्रकारचा संबंध नाही.
      जेंव्हा त्या आईला ही बातमी कळली तेंव्हा ती आपल्या मुलाला सर्व हकीकत सांगण्यासाठी शहराच्या प्रवासाला निघाली.  तेंव्हा गाडीचा अपघात होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला. ही बातमी जेंव्हा तिच्या मुलाला कळली तेंव्हा दु: व्हायच्या बदली तो आनंदीत झाला. तडख आपल्या गावी गेला आणि महत्वाची कागदपत्रे तो गोळा करु लागला. ती शोधत असताना त्याला तिच्या आईची वैयक्तिक डायरी मिळाली. ती डायरी बघून आपल्या आईविषयीची माहिती जाणून घेण्याची त्याची उत्सुकता झाली. हळूहळू पाने उलटत असताना त्याने एक पान उलटलं. तो दिवस होता नोव्हेंबर 1982. त्यात लिहलं होतं, आज, माझ्या अयुष्यातील सर्वात मोठा दिवस. कारण आज कितीतरी सौंदर्यवतीमधून मिस टोरंटो म्हणून माझी निवड झाली आणि हा सन्मान माझ्यासाठी अकल्पनीय होता. हे वाचताच त्याच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं. त्याच्यासमोर खूप प्रश्न निर्माण झाले. खरचं माझी आई सुंदर होती? जर ती इतकी सुंदर होती मग इतकी कुरुप कशी दिसायची? तीनं ह्याविषयी मला कधी काही सांगितलं का नाही? वेळेनुसार त्याचे प्रश्न आणि उत्कंठा वाढत गेली. तो पाने पलटत गेला आणि एक पान वाचून त्याला स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत, त्यात असं लिहलं होतं, आज बागेला आग लागली होती. माझा मुलगा तिथं खेळत होता. जेंव्हा मला त्याची जाणीव झाली तेंव्हा लोकांच्या विरोधाला झिडकारुन मी माझ्या मुलाला वाचवलं. माझा चेहरा जळाला, केस जळाले पण मला त्याचं दु: नाहीये. माझा मुलगा आज माझ्या बरोबर आहे हेच खूप आहे माझ्यासाठी…… फक्त तुझी प्रेमळ आई.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...