शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

50. सगळीच मुलं वाईट नसतात

            ज्या मुलींमुळे मुलांना त्रास सहन करावा लागला आहे आणि लागत आहे, फक्त त्या मुलींसाठी हा लेख आहे. लेख वाचून गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. 
       मुलींनी तर हे नक्कीच वाचावे.  विद्यार्थी लोकांनी पण वाचावं. मी असाच एक खेळ करुन पाहिला की मुलींना मुलांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? असे विचारले तर त्यात भरपूर मुलींची उत्तरे अशा प्रकारची होती. टपोरी असतात, खोटारडी असतात. आणि सर्वात जास्त बोललेलं वाक्य म्हणजे, सगळी मुलं सारखीच असतात.
     खर तर मूलही सगळे सारखी नसतातच आणि सगळीच मुलं वाईट नसतात…! मुळात सगळीच मुलं चांगली असतात हे पण बरोबर नाही.  मुलींना दु: झालं की त्या ढसाढसा रडतात पण त्यांना काय माहीत मुलांना दु: झालं की तोंडावर दु: दाखवता कुठेतरी एकांतात नाहीतर रात्री अंथरुणात रडतात. जिच्यावर प्रेम असतं तिला सुखी ठेव रे देवा ! अशीच देवाला प्रार्थना करतात. पण मुलींना मात्र सगळीच मुलं वाईट दिसतात. प्रेयसीच्या समोर शान वाढावी म्हणून किती खटाटोप करतात, मात्र तिनं धोका दिल्यावर मित्रांकडून घेतलेलं उसणं फेडत असतात. आई-बापापेक्षा जास्त आपल्या प्रियसीच ऐकतात आणि मुलींना वाटतं की सगळीच मुलं वाईट असतात. जिवापाड प्रेम करतात आणि काहीही करायला तयार असतात पण साला काहीतरी चूक काढून सगळा आत्मविश्वास संपवतात. स्वत: नीट अभ्यास करुन चांगले गुण पण मिळवितात पण मी फक्त टाईमपास करत होते असं म्हणून त्याच्या अभ्यासाची वाट लावतात. कारण त्यांना वाटतं, सगळी मुलं सारखीच असतात. मुलीच लग्न करायला घेतल्यावर प्रियकराला नकार देऊन सगळा दोष त्यालाच देतात पण त्यांना काय माहित जिच्यासोबत लग्न करणार आहोत तिला खूश ठेवण्यासाठी कितीतरी धडपडत असतात आणि त्यांना वाटतं सगळीच मुलं वाईट असतात. आयुष्याची राख रांगोळी करुन जेंव्हा त्या मुली जातात तेंव्हा तिची बदनामी होऊ नये म्हणून सगळ मुकाट्यानं सहन करतात आणि त्यांना वाटतं सगळी मुलं वाईट असतात. ती गेली तर जाऊ दे, आपण दुसरी शोधू असे फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात. पण एकांतात बसून तिच्या आठवणीत रडतात आणि कोणी पाहिलं तर, काय नाय रे! डोळ्यात कचरा गेला म्हणून पाणी आलं. असं म्हणणारी मुलंच असतात आणि मुलींना वाटतं सगळी मुल वाईट असतात. खरतर शंभर मधून पंच्याहत्तर मुलं वाईट असतात. पण या पंच्याहत्तर मुलांची वाट लावून त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात आणि त्यांना वाटतं मुलं वाईट असतात. कधीतरी मुलांच्या भावना, खऱ्या मनाने समजून घ्या. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, आणि सगळीच मुलं वाईट नसतात.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...