सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

741. पायाभूत मूल्ये

      जीवनातल्या कुठल्याही क्षणी आपण  एकटे आहोत का? की हा फक्त आपल्या मनाचा भ्रम आहे? डोळ्यांनी बघून नाही, तर ईश्वरावर विश्वास ठेवून पुढे चला. आज आम्ही आपल्यासाठी चिरोकी या जमाती मधील (Original North American Tribe) तरुणांच्या संदर्भातील असलेल्या काही धार्मिक प्रथांबद्दलची गोष्ट घेऊन आलो आहोत. चिरोकी या जमातीतील काही जातीत अजूनही ह्या जुन्या परंपरांचे पालन आणि त्यांचा पाठपुरावा केला जातो. त्यातील एक प्रथा अशी - चिरोकी जमातीतील पिता आपल्या मुलाला घनदाट जंगलात घेऊन जातात. आणि जंगलात नेऊन आपल्या मुलाच्या डोळ्यांवर ते पट्टी बांधतात आणि संपूर्ण रात्र त्याला एका खडकावर बसवून ठेवतात. मुलाला त्या घनदाट जंगलात एकटे सोडून दिले जाते आणि आदेश दिला जातो,की जोपर्यंत सूर्याची पहिली किरणे  त्याला आपल्या शरीरावर जाणवत नाही, तो पर्यंत तो डोळ्यावरील पट्टी काढू शकत नाही. चिरोकी जमातीमधे ही मान्यता आहे, की या प्रथेमुळे छोट्या मुलाचे प्रौढ मुलात रूपांतर होते. जेव्हा एक मुलगा संपूर्ण रात्रभर घनदाट जंगलात जिवंत राहतो, तेंव्हा त्या बालकाचे रूपांतर प्रौढ व्यक्तीत होते. आता तो एकटा मुलगा त्या घनदाट जंगलातील अंधारात कोणाला मदतीसाठी हाका पण मारू शकत नव्हता. जेव्हा त्याला वन्य प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते, त्याने तो घाबरून जात होता व भीतीने त्याच्या अंगावर काटा येत होता. खडकावर त्या मुलाला पूर्ण ताकदीने घट्ट पकडून बसावे लागत होते, कारण सोसाट्याच्या वार्याचे त्याच्या शरीरावर खूप जोराने तडाखे बसत होते आणि त्या मुलाचे संतुलन ढासळत होते, आणि त्यामुळेच त्याचा पुढच्या बाजूला सारखा झोक जात होता. पण तो मुलगा चिकाटीने त्या कठीण परिस्थितीचा सामना करत होता. तो रात्रभर जंगली प्राण्यांचा आवाज ऐकत राहिला आणि जोरदार वाऱ्यांच्या थापडा पण सहन करत राहिला, कारण तोच एक मात्र उपाय होता ज्यामुळे तो बालकांच्या श्रेणीतून प्रौढांच्या श्रेणीमधे पदार्पण करणार होता.शेवटी, एकदाची पहाट झाली आणि सूर्याच्या किरणांनी त्याच्या डोळ्यांच्या पट्टीतून आतमधे प्रवेश केला. त्या मुलाने त्या क्षणी लगेचच आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढून टाकली. जसे, त्याने आपले डोळे उघडून बघितले, तर वडिलांना समोर बघून तो खूप आश्चर्यचकित झाला. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले, की ते संपूर्ण रात्रभर त्याच्या जवळच होते आणि त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. प्रथेनुसार, तो मुलगा दुसऱ्या मुलांना आपला अनुभव ही सांगू शकत नव्हता. चिरोकी जमातीच्या प्रथेनुसार प्रत्येक मुलाला आपल्या हिमतीवर प्रौढांच्या श्रेणीत प्रवेश घ्यायचा असतो आणि एक मजबूत व्यक्तीमत्व विकसित करायचे असते. परंतु आपल्याला हे कधीही विसरून चालणार नाही की आपले गुरु, ईश्वर आणि आई -वडील हे कायमच मार्गदर्शकाच्या रूपाने आपल्याबरोबर असतात. ते आपल्यावर अदृश्य रुपाने, एखाद्या जादूसारखे आपल्यावर कार्य करीत असतात. अध्यात्मिक आणि भौतिक जगातसुद्धा, अदृश्य शक्तींवर आपला पूर्ण विश्वास ठेऊन, भक्तीने,चिकाटीने आणि साहसाने... ह्या बरोबरच ईश्वरावर ही संपूर्णपणे  विश्वास ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे.
”ईश्वराला अनेक प्रकारे परिभाषित केले गेले आहे. परंतु त्यापैकी कोणतीही परिभाषा बरोबर नाही. जर ईश्वराला परिभाषित केले गेले, तर तो कुठल्याही स्थितीत ईश्वर राहू शकत नाही.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...