तो : अक्षय तू माझ्या लहान भावासारखा असल्याने..
मी : काय?
तो : हक्काने मी तुला अरेतुरे करू शकतो ना?
मी : हो. अजिबात हरकत नाही.
तो : थँक यु.
मी : वेलकम.
तो : परवाच तुझी ती पोस्ट वाचली.
मी : कोणती?
तो : आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या मुलाची.
मी : आई आणि मुलगा संवाद.
तो : हो.
मी : मग?
तो : आणि त्यानंतर..
मी : त्यानंतर काय?
तो : त्यानंतर लगेचच ती बातमी वाचण्यात आली.
मी : कोणती?
तो : उज्जैनमधील अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येची.
मी : ट्रोलिंगला कंटाळून इन्फ्लुएन्सरची आत्महत्या.
तो : हो.
मी : त्याचं काय?
तो : त्यासंबंधी माझा अनुभव शेअर करायचा आहे.
मी : ओके.
तो : सुरुवातीला थोडक्यात माझा परिचय देऊ?
मी : चालेल.
तो : मी ४० वर्षांचा असून, पेशाने व्यावसायिक आहे.
मी : ओके.
तो : माझी बायकोही मला व्यवसायात मदत करते.
मी : कसला व्यवसाय?
तो : आमचं प्लायवूड शॉप आहे.
मी : ओके.
तो : माझा मुलगा १५ वर्षांचा असून तो नववीत शिकतोय.
मी : वेल सेटल फॅमिली.
तो : तुझे लेख वाचून मला एक समजलं.
मी : कसली?
तो : मुलांना चांगल्या शाळेत ॲडमिशन देणं, त्यांचे लाड करणं आणि त्यांना कपडालत्ता पुरवणं एवढं पुरेसं नाही.
मी : मग?
तो : मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजीही तेवढीच आवश्यक.
मी : १००%
तो : माझा मुलगा स्पेशल आणि गॉड गिफ्टेड आहे.
मी : म्हणजे?
तो : स्पेशल कारण तो बोबडं बोलतो आणि गॉड गिफ्टेड..
मी : कारण?
तो : तो कोणतंही गाणं ऐकलं की, त्या गाण्याच्या चालीवर माऊथ ऑर्गन वाजवतो.
मी : कमाल..
तो : वयाच्या दहाव्या वर्षापासून तो वेगवेगळे इंस्ट्रुमेन्ट वाजवत असल्याने..
मी : असल्याने?
तो : आम्हीही त्याला वाढदिवसाला नवनवीन वाद्य गिफ्ट करत आलो.
मी : क्या बात!
तो : त्याच्या त्या कौशल्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक व्हायचं.
मी : व्वा!
तो : त्याच्या रूममध्ये एक कपाट तर ट्रॉफीजनी भरलं आहे.
मी : ग्रेट.
तो : सर्वकाही सुरळीत सुरु असताना मागच्या वर्षी अचानक..
मी : काय झालं?
तो : आम्ही नवराबायको दोघे शॉपमधून घरी आलो आणि..
मी : आणि काय?
तो : डोळ्यांसमोरचा प्रकार पाहून आम्हाला घाम फुटला.
मी : का?
तो : माझ्या मुलाने रागाच्या भरात गिटार आणि इतर वाद्य तोडून टाकली होती.
मी : काय?
तो : माऊथ ऑर्गन तर त्याने डंबेलने अक्षरशः ठेचला होता.
मी : बाप रे..
तो : त्यावेळी माझे आईवडील घरी असल्याने आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली.
मी : मग?
तो : तर त्यांनाही काही ठाऊक नव्हतं.
मी : अरे..
तो : मी मुलाला जवळ घेऊन, त्याच्या रागाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मी : मग?
तो : तर तो तोंड झोडून घेत फक्त रडत राहिला.
मी : च्यामारी.
तो : अक्षय मला तेव्हा जाणीव झाली.
मी : कसली?
तो : घडलेला हा प्रकार साधारण नाही.
मी : का बरं?
तो : कारण माझ्या मुलाला मी यापूर्वी एवढ्या रागात कधीच पाहिलं नव्हतं.
मी : मग कारण काय?
तो : तेच मला शोधायचं होतं.
मी : काय केलं?
तो : आठवडाभर तर मी त्याच्या शाळेत आणि शेजारी पाजारी चौकशी केली.
मी : मग?
तो : शाळेतील शिक्षकांसाठीही हा प्रकार आश्चर्यकारक होता.
मी : का?
तो : कारण माझा मुलगा अगदी शांत स्वभावाचा.
मी : शेजारी?
तो : शेजाऱ्यांनाही काही ठाऊक नव्हतं.
मी : मग?
तो : महिनाभर मी माझ्यापरीने शोध सुरु ठेवला.
मी : गुड.
तो : कोरोनापासून..
मी : काय?
तो : प्रत्येक कुटुंबातील मुलांच्या हातात स्वतःचे मोबाईल आणि टॅब्लेट आले.
मी : ऑनलाईन शिक्षण.
तो : माझ्या मुलालाही आम्ही त्याकाळात मोबाईल घेऊन दिलेला.
मी : ओके.
तो : अभ्यासाव्यतिरिक्त तो..
मी : काय करायचा?
तो : व्हिडीओ बनवून माझ्या युट्युब चॅनेलवर अपलोड करायचा.
मी : ओके.
तो : माऊथ ऑर्गन वाजवतानाचे त्याचे २ व्हिडीओ व्हायरल झालेले.
मी : सही..
तो : त्यामुळे त्याच्या युट्युब चॅनेलवरील फॉलोअर्स अचानक वाढले.
मी : ओके.
तो : तो त्याच्या व्हिडिओवर आलेल्या कौतुकाच्या कमेंट मला वाचून दाखवत असायचा.
मी : अभिमान वाटत असणार.
तो : साहजिकच.
मी : मग?
तो : मात्र मग अचानक..
मी : काय झालं?
तो : त्याने मोबाईल हातात घेणंच बंद केलं.
मी : का?
तो : तेच आम्हालाही कळत नव्हतं.
मी : मग?
तो : म्हणून मग एकदिवस मी त्याचा मोबाईल चेक केला.
मी : ओके.
तो : आणि मी थक्क झालो.
मी : का?
तो : त्याच्या वर्गमित्रांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला होता.
मी : आजकाल सगळे बनवतात.
तो : त्या ग्रुपवर मात्र..
मी : काय?
तो : माझ्या मुलाची रोज खिल्ली उडवली जात होती.
मी : मित्रांमध्ये चालतं.
तो : हो, मात्र मर्यादा असायला हवी की नाही?
मी : नक्कीच असायला हवी.
तो : त्या ग्रुपवरील मुलं आणि मुली.
मी : काय करत होते?
तो : जणू काही ठरवून त्याच्या तोतरेपणाची नक्कल करत होते.
मी : काय?
तो : शिवाय त्यातही एक पॅटर्न होता.
मी : कोणता?
तो : एक म्होरक्या दरवेळी विषय काढायचा आणि बाकीचे त्याला साथ द्यायचे.
मी : ग्रुपने?
तो : हो.
मी : मग?
तो : विशेष म्हणजे त्याकाळातच..
मी : काय?
तो : माझ्या मुलाच्या व्हिडीओखालीही अगदी वाईट कमेंट येत होत्या.
मी : वाईट म्हणजे?
तो : म्हणजे त्याच्या बोलण्याची खिल्ली उडवणाऱ्या..
मी : ट्रोलिंग?
तो : हो.
मी : कोण करत होतं?
तो : फेक अकाउंट होते.
मी : भेकड जमात.
तो : हो ना.
मी : मग?
तो : माझी तर खात्री झाली.
मी : कसली?
तो : व्हॉट्सॲप ग्रुपवरील रोजची खिल्ली आणि ट्रोलिंगमुळेच..
मी : काय?
तो : त्यादिवशी त्याच्या रागाचा उद्रेक झाला.
मी : शक्यता आहे.
तो : म्हणूनच दुसऱ्या दिवशी..
मी : काय केलं?
तो : मी मुलाला सोबत घेऊन, थेट त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील फ्रेंड्सचं घर गाठलं.
मी : ओके..
तो : त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एकूण १२ जण होते, त्यापैकी..
मी : त्यापैकी..
तो : २ मुली आणि ४ मुलांनी मिळून त्याला टार्गेट केलं होतं.
मी : ओके.
तो : मी फक्त त्या ६ जणांच्याच घरी गेलो.
मी : काय समजलं?
तो : त्या सर्वांनीच जाणूनबुजून त्रास देत असण्याला साफ नकार दिला.
मी : म्हणजे?
तो : म्हणजे आम्ही सहजच मस्करी करत असतो, असं त्यांचं म्हणणं आलं.
मी : मग एकट्याची का?
तो : त्यामुळेच मी त्या ६ जणांकडे त्यांचे मोबाईल मागितले.
मी : बरं केलं.
तो : सुरुवातीला त्या सर्वांनी विरोध केला आणि रडायला सुरुवात केली.
मी : त्यानंतर?
तो : त्यानंतर मात्र पालकांनाही संशय आला.
मी : कसला?
तो : दाल में कुछ काला है..
मी : का बरं?
तो : कारण त्यांची काही चुकी नसती, तर त्यांनी हसत हसत मोबाईल माझ्या स्वाधीन केले असते.
मी : बरोबर..
तो : म्हणूनच पालकांनी दम दिल्यावर त्यांनी मोबाईल सोडला आणि..
मी : आणि काय?
तो : क्षणार्धात सगळं उघड झालं.
मी : काय?
तो : त्यासर्वांनी ठरवून माझ्या मुलाला त्रास देण्याचा प्लॅन केला होता.
मी : एवढ्या लहान मुलांनी?
तो : हो. कारण माझ्या मुलाचं सगळ्यांकडून होणारं कौतुक त्यांना आवडत नव्हतं.
मी : काय?
तो : त्याला ऑनलाईन मिळणारी प्रसिद्धीही त्यांना खुपत होती.
मी : अरे..
तो : अक्षय विशेष म्हणजे युट्युब व्हिडिओच्या खाली वाईट कमेंट करण्यासाठी..
मी : काय?
तो : त्यातील ४ जणांनी तर फेक अकाउंट बनवले होते.
मी : विकृती.
तो : माझ्या मुलाला होणारा त्रास पाहून त्यांना असुरी आनंद मिळायचा.
मी : डोकं सुन्न झालं.
तो : आपल्याला एवढा त्रास होतोय, तर तू विचार कर की माझ्या मुलाची काय अवस्था..
मी : हो ना.
तो : अखेरीस त्यांच्या म्होरक्याने उद्देशही बोलून दाखवला.
मी : कोणता उद्देश?
तो : त्रास देण्याचा उद्देश...
मी : का त्रास देत होते?
तो : माझ्या मुलाने व्हिडीओ बनवणं बंद करावं याउद्देशाने ते सर्वजण..
मी : नीचपणा.
तो : अक्षय आजकाल सोशल मीडियावर हे सर्रास घडतंय.
मी : म्हणजे?
तो : म्हणजे टीका आणि द्वेष करण्याच्या नादात, लोकांना मर्यादांचा विसर पडलाय.
मी : खरं आहे.
तो : विशेष म्हणजे हे ट्रोलर घोळक्याने एखाद्याला टार्गेट करत असल्याने...
मी : त्यामुळे?
तो : मुलं नैराश्याच्या आत्मघातकी दरीत लोटले जात आहेत.
मी : शोकांतिका.
तो : तू मान्य कर किंवा नको करू..
मी : काय?
तो : ट्रोलिंगला चारचौघात विरोध करणारेच, बऱ्याचदा एखाद्याला ट्रोल करण्यात आघाडीवर असतात.
मी : सहमत.
तो : म्हणजे लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण.
मी : परफेक्ट.
तो : मी सजग असल्याने वेळीच माझ्या मुलाच्या मानसिक त्रासाचं कारण शोधलं.
मी : जबाबदारीची जाणीव.
तो : आजकाल सोशल मीडिया हे जणू काहीसांठी ती हातोडी झालं आहे..
मी : कोणती?
तो : जिच्या मदतीने कमेंटचे घाव घालून राग व्यक्त करण्यात लोकांना समाधान मिळतंय.
मी : संवदेनाहीन लोक.
तो : म्हणूनच तर मागील काही वर्षांमध्ये ट्रोलिंगला कंटाळून, कित्येकांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं.
मी : वास्तव.
तो : तुला ठाऊक आहे?
मी : काय?
तो : ऑनलाईन होते, तशी ऑफलाईनही ट्रोलिंग होते.
मी : म्हणजे?
तो : म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी काही विकृत माणसं हेतुपुरस्सर..
मी : काय?
तो : आपल्याला मानसिक त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
मी : हो.
तो : आपणही खूपदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि..
मी : आणि?
तो : आणि त्यांची प्रवृत्ती बळावते.
मी : खरं आहे.
तो : खिळ्यावर घाव घातले की तो आत रुततो.
मी : हो.
तो : तसंच अगदी ट्रोलिंगचं आहे.
मी : म्हणजे?
तो : म्हणजे ट्रोलिंगमुळे माणूस नकारात्मक विचारांमध्ये खचत जातो.
मी : सच बात.
तो : म्हणूनच योग्यवेळी काही कठीण निर्णय घेणं गरजेचं आहे.
मी : कोणते?
तो : ऑफलाईन असो की ऑनलाईन..
मी : काय?
तो : त्रासदायक मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच दूर करायला शिकलं पाहिजे.
मी : पटतंय.
तो : ऑफलाईन आयुष्यात त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवायचं आणि..
मी : आणि?
तो : आणि ऑनलाईन जगात त्यांना थेट ब्लॉक करायचं.
मी : करेक्ट.
तो : म्हणजे आपोआप उभारी आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांचा सहवास आपल्याला लाभेल.
मी : १००%
तो : तुझ्या माध्यमातून मला सर्वांना एकच संदेश द्यायचा आहे.
मी : कोणता?
तो : ट्रोलिंगरुपी हातोडीला कमी लेखण्याची चूक कुणीच करायला नको.
मी : का बरं?
तो : कारण ट्रोलिंगचा प्रत्येक घाव..
मी : काय करतो?
तो : कळत नकळत आपल्या मानसिक आरोग्याला रक्तबंबाळ करत असतो.
मी : ज्जे बात!

©️अक्षय भिंगारदिवे,
३० नोव्हेंबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा