फार पूर्वी एक राज्य होतं. त्या राज्याचा एक नियम होता, कुठलाही राजा पाच वर्षाहून जास्त काळ राज्य करू शकत नसतो. त्या राज्याचा आणखी एक विचित्र नियम असतो, पायउतार झालेल्या राजाला एका होडीतून घेऊन जाण्यात येत असतं. नदीच्या त्या काठावर एक घनदाट जंगल असतं. त्यात जंगली प्राणी देखील राहत असतात. अशा जंगलात त्या राजाला सोडून देण्यात येत असतं. एकदा अशाच एक राजाची पाच वर्षाने मुदत संपते. नियमाप्रमाणे तो त्या होडीत बसतो. होडी नदीच्या मध्यभागी येते तरी तो निवृत्त राजा शांत बसून असतो. होडीचा नाविक अस्वस्थ होतो. तो हळूच राजाला म्हणतो, महाराज माफ करा, मी आत्तापर्यंत इतक्या राजांना या होडीतून समोरच्या जंगलात सोडलेलं आहे प्रत्येक राजा होडीत बसल्यावर किती घाबरलेला असायचा. तुम्हाला त्या जंगलाची जराही भीती वाटत नाही? तो निवृत्त राजा शांतपणे म्हणाला, मी ज्या दिवशी या राज्याचा पदभार सांभाळला त्या दिवशीच मला हा 'जंगलाचा नियम..' सांगण्यात आला होता. पाच वर्षांनी मला या ठिकाणी जाऊन राहायचं आहे यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली होती. नुसतीच मनाची तयारी नाही, तर माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत मी त्या जंगलाचे रुपांतर एका सुंदर नगरीत केले आहे, आणि म्हणूनच मला आता तिथे राहायची भीती वाटत नाही उलट आनंद होतो आहे.
तुमच्याही निवृत्तिनंतरच्या भयावह जंगलाचे सुंदर नगरीत रुपांतर करण्यास आपण आतापासून सुरुवात करुया. प्रथम Retirement Planning करून योग्य त्या cash flow ची सोय करु, तसेच सतत माणसं जोडून, छंद जोपासू, त्यामुळे सुदैवाने निवृत्तीनंतर उद्यापासून घरी बसून काय करायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला नसेल. तुमच्याकडे घरच्यांना आणि इतरांना तुमचा उपयोग होऊ शकेल, अशी बरीच कामे तुमच्या लिस्टमध्ये आहेत. ही इच्छाशक्तीच काम करण्याचे बळ देईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा