सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

731. पिझ्झाचे आठ तुकडे

 एक दिवस बायको म्हणाली, आज धुण्यासाठी अजून कपडे काढू नकोस ..."
नवरा - "का ??"
"तुमची कामवाली बाई दोन दिवस येणार नाही…"
"का ??
"गणपतीत नातवाला भेटण्यासाठी मुलीच्या घरी जाणार आहे."
"बरं, जास्त कपडे घालू नकोस…"
"अहो !!! गणपतीसाठी तिला पाचशे रुपये द्यायचे का? सणासाठी म्हणून…"
"का? आता दिवाळी येईल, तेव्हा देऊया,…"
"अरे बाबा, तसं नाही!! ती गरीब आहे. आता ती आपल्या मुलीकडे नातवाच्या घरी जात असेल तर तिलाही ते आवडेल… आणि या महागाईच्या काळात नुसत्या पगाराने हा सण कसा साजरा करेल ती?"
"ए, इतकं भावुक होण्याची गरज नाही हं!"
"अरे… काळजी करू नकोस… मी आजचं पिझ्झा डिनर रद्द करते… पावाच्या त्या आठ तुकड्यांच्या मागे पाचशे रुपये खर्च करण्यापेक्षा…
"व्वा, काय बोलू !! आमच्या तोंडातून पिझ्झा हिसकावून घेणार का आता तू ??
तीन दिवसांनंतर… नवऱ्याने कामवालीला विचारले…
"काय बाय ? सुट्टी कशी होती?"
"एकदम मस्त होती साहेब… दीदीने पाचशे रुपये दिले होते, गणपतीचा बोनस म्हणून…"
"मग? जाऊन आलीस लेकीकडे? भेटलीस नातीला?"
"हो साब… मजा आली, दोन दिवसात 500 रुपये खर्च केले…"
"ते ठीक आहे !! पण एवढं केलंस तरी काय त्या पाचशे रुपयांचं?"
"नातीसाठी एक दीडशे रुपयांचा शर्ट, पन्नास रुपयांची बाहुली, मुलीला चाळीस रुपये पेढ्यांसाठी, देवळात पन्नास रुपयांचा पेढ्यांचा प्रसाद, पोरीला पंचवीस रुपयांच्या बांगड्या आणि जावयासाठी पन्नास रुपयांचा पट्टा घेतला, साठ रुपये प्रवासखर्च आणि उरलेले पंचाहत्तर रुपये नातीला वह्या पेन्सिलिंसाठी दिले."
लादी पुसता पुसता सगळा हिशोब अगदी बिनचूक सांगितला तिनं!
"500 रुपयात एवढं सगळं?"
नवरा आश्चर्यचकित होऊन विचार करायला लागला. एक मोठा आठ-तुकड्यांचा पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागला, प्रत्येक तुकडा त्याच्या डोक्यात जणू हातोड्याचा घाव घालत होता. एका पिज्जाच्या किंमतीची तुलना तो बाईच्या उत्सवाच्या खर्चाशी करु लागला. नातीच्या ड्रेसचा पहिला तुकडा, पेढ्यांचा दुसरा तुकडा, मंदिरातील पेढे. तिसरा तुकडा, भाड्याचा चौथा, बाहुलीचा पाचवा, बांगड्यांचा सहावा तुकडा, जावयाच्या पट्ट्याचा सातवा तुकडा आणि नातीच्या वही-पेन्सिलचा आठवा तुकडा.
     आजपर्यंत त्याने नेहमी पिझ्झाची फक्त एक बाजू पाहिली होती, मागच्या बाजूने तो पिझ्झा कसा दिसत होता हे कधीच पाहिले नव्हते. पण आज बाईने त्याला पिझ्झाची दुसरी बाजू दाखविली. पिझ्झाच्या आठ तुकड्यांमुळे त्याला जीवनाचा अर्थ समजला - “आयुष्यासाठी खर्च” कि “खर्चासाठी आयुष्य".
त्याला क्षणार्धात "जीवनाचा" नवीन अर्थ समजला.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...