आज जी नवीन पिढी येतेय जिला जेन झी जनरेशन म्हटलं जातंय त्यांच्या समोर बिल गेट्स, सुंदर पिचाई, मार्क, जेफ बेझोज यांच्यासारखी नावे फार सहज येतात. गुगलची इंटर्नशिप मिळेल का किंवा मायक्रोसॉफ्टचं काय पॅकेज आहे, एमेझोनची व्हेकंसी आहे का वगैरे. ते सतत या लोकांच्या बातम्या ऐकतात, युट्यूब वर इंटरव्ह्यू पाहतात, ऍपल चे टीम कुक नाहीतर एमेझोनचे जेफ बेझोस भारतात आले की त्यांना बघून किती खुश होतात, बुकशॉप मध्ये यांच्यावर लिहिलेली पुस्तके मराठी, हिंदी ट्रान्ससलेशन सहित बेस्ट सेलर यादीत असतात. त्यामुळे विद्वान म्हणजे कोण, तर हे सगळे लोक हा प्रभाव वाढत चाललाय. आपल्याकडे काय विद्वान माणसे नव्हती आणि नाहीत का ? पण आपली माणसे जात, रिलीजन, पंथ, आडनाव यात अडकलेली असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. महापुरुष देखील असेच विभागले गेलेत. त्यामुळे इथे राहून काय आपली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, आपल्या टेलेंटला एक रेकग्निशन मिळणार नाही असा विचार करून आपली अत्यंत हुशार माणसे तिकडे ओढली जातात. त्यांच्याकडे कार्ल सेगन, रिचर्ड फाईनमन, ब्रायन ग्रीन, युव्हाल नोआ हरारी, जेरेड डायमंड अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील कितीतरी नावे जगभर चर्चेत आहेत. यात आपल्या देखील लोकांची संख्या वाढायला नको का ? छत्रपती महाराजांबद्दल मिल्ट्री सिस्टीम, एडमिनिस्ट्रेशन, नेव्ही,सायन्स इन फोर्ट बिल्डिंग, मेंनेजमेंट, सामाजिक, लोकगीते अशा अनेक दृष्टीकोनातून मांडलं गेलं. तेही अजून जागतिक लेव्हलवर जायला हवं, तसंच डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या टॉप इंटेलेकच्युएल महामानवाबद्दल, आजच्या जेन झी यांच्या काळाच्या भाषेत विद्येच्या वेगवेगळ्या शाखेच्या दृष्टीकोनातून मांडायला नको का ? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलोजी, सायन्स रीलेटेड जितक्या शाखा असतील, त्यात आपल्या देशातील टॉप ट्वेंटी उल्लेखनीय कार्य केलेली नावे चटकन तोंडावर येत नसतील तर आता हि वेळ नाही का की यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या अनेक विद्याशाखेत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून बदलत्या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडून या सगळ्याची सुरुवात व्हावी ? त्यांचं The Problem of the Rupee, Administration and Finance of the East India Company हे इकॉनॉमिक्स मधील काम आता तरी देशभरातील सर्व जेन झी पिढीपर्यंत पोहचायला नको का ? त्यांना कळायला नको का की बिल गेट्स, जेफ बेझोस यांच्यावर लिहिलेल्या किंवा यांनी रेकमेंड केलेल्या पुस्तकांशिवाय आपल्याकडे देखील विद्वान माणसे होती आणि आहेत. अर्थकारणावर कंट्रोल ठेवणाऱ्या या सगळ्या लोकांची नावे यासाठी घ्यावी लागतात कारण मार्केटिंग असेल, ब्रेंडिंग असेल, पीआर असेल किंवा वेगवेगळी माध्यमे असतील, हि नावे सतत देशभरातील जेन झी समोर फ्लेश होतायत. इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून सतत दिसतायत. आपला देश तर विक्री करण्याचं त्यांच्यासाठीचं प्रमुख मार्केट आहे. अशा काळात एकेडमिक डिस्कशन मध्ये आपल्या नवीन मुलांनी आता मोकळेपणाने डॉक्टर यांचा रेफ्रेंस द्यायला हवा ना ? काळ जितका झटपट बदलतोय तिथे नवीन जेन झी ज्यांच्याकडे पाहतेय ती माणसे तरी फक्त जगाच्या अर्थकारणावर कंट्रोल ठेवून आहेत पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे डॉक्टर आंबेडकर, ज्यांनी सामाजिक क्षेत्रात तर क्रांती घडवून आणलीच त्याचबरोबर माणसातील माणूसपण जागं करण्याचा देखील आटोकाट प्रयत्न केला आणि विद्वत्तेमध्ये देखील थोर कार्य केलं ते आज इंस्पिरेशन म्हणून भारताच्या नव्या पिढीसमोर हवे आहेत.
- अभिनव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा