ओपीडी च्या दारातून आत येत ती जरा घाईघाईतच, पण दबलेल्या आवाजात म्हणाली "डॉक्टर, माझ्या वडिलांना तपासायला आणलंय, पण ते आत यायच्या आधी मला पाच मिनिट बोलायचंय. चालेल ना?".
तिला नमस्कार करून मी खुर्चीवर बसण्यासाठी इशारा केला. एक आवंढा गिळून, खूप विचार करून आल्यासारखी ती बोलायला लागली "डॉक, माझे बाबा खूप ब्रिलिअंट आहेत, त्यांनी आयुष्यभर नुसता भरपूर पैसाच नाही, तर खूप माणसं आणि प्रतिष्ठाही कमावलीय. आमच्यासाठीही खूप केलंय. पण गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी बिघडलंय. नेमकं काय ते समजत नाही, पण अगदी वेगळे आणि विचित्र वागायला लागलेत, आमची पर्वा नसल्यासारखे. काही गोष्टी अगदी विसरून जाताहेत. मित्रांना टाळतात, आमच्याशीही फारसं बोलत नाहीत. आधी ते म्हणजे आमच्या कुटुंबाचा प्राण असल्यासारखे सगळ्यांना हसवायचे, बोलायचे, बाहेर जेवायला घेऊन जायचे, पण आता मात्र अगदी स्वतःचं जेवण, अंघोळ देखील विसरतात. आम्ही आठवण करून दिली तर चिडून ओरडतात, दार आतून बंद करून बसतात. अगदी मध्यरात्रीनंतरही फोनवर काहीतरी चालू असतं, सकाळीही लवकरच उठून बसतात. लॉकडाऊन मध्ये तर हे सगळं खूपच वाढलंय. आज यायचं कारण म्हणजे गेल्या दोन आठवड्यात अगदी आमची नावं देखील विसरताहेत. दिवसरात्र फेसबुक, इन्स्टा वर ऑनलाईन दिसतात, शेकडो व्हाट्सअँप सगळ्यांना फॉरवर्ड करत असतात. आम्ही विचारलं तर चक्क नाकारतात. परवा तर हद्दच झाली, आईनं मोबाईल हातातून काढून घेतला, तर तिच्यावर हातच उगारला! असे नव्हते हो आमचे बाबा.. काय करावं समजत नाहीय". ती रडायला लागली. घोटभर पाणी पिल्यावर ती थोडी शांत झाली. तिच्या वडिलांना आम्ही आत बोलावलं. थोडे नाराजच दिसले.
"मला काहीही झालेलं नाहीये डॉक्टर. या लोकांना मी शांत बसलेलं पाहवत नाही. आयुष्यभर मी यांच्यासाठी झटलो, पण मला थोडा एकांतही हे मिळू देत नाहीत. मला वेड लागलंय, मी म्हातारा झालोय असं यांना वाटतं" बसल्या बसल्या त्यांनी मन मोकळं केलं.
त्त्यांची क्लिनिकल तपासणी (म्हणजे डॉक्टर स्वतः हातांनी, डोळ्यांनी आणि स्टेथोस्कोप, इतर औजारांनी तपासतात ती) अगदी नॉर्मल होती. स्मरणशक्ती आणि मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचं विश्लेषण इत्यादी सगळ्या तपासण्या जवळपास नॉर्मल होत्या. एम. आर. आय. मध्ये थोडीशी वयोमानानुसार दिसणारी झीज होती, पण त्यामुळे अशी लक्षणं सहसा दिसत नाहीत. आता माझं मत त्यांना स्पष्ट सांगायची गरज होती. आपण प्रत्येक पेशंटच्या पसंतीस उतरावं असं प्रत्येकच डॉक्टरला वाटतं, पण खरं बोलायची वेळ अली कि बरेचदा ती इच्छा बाजूला ठेवावी लागते, कारण पेशंटशी खोटं बोलणं शक्यच नसतं.
"सर, तुम्हाला स्क्रीन आणि मोबाईलचं अतिशय वाईट व्यसन लागलंय." मी त्यांना सांगितलं.
"अजिबात नाही. कधीतरी मेसेज बघायला मोबाईल वापरतो मी" ते इकडेतिकडे बघत म्हणाले. वयस्कर माणसाला मुलाबाळांसमोर खोटं बोलताना बघणं खूप क्लेशदायक असतं.
त्यांची मुलगी जरासं चाचरतच म्हणाली "बाबा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिवसातून निदान वीस-पंचवीस तरी व्हाट्सअँप फॉरवर्ड पाठवता, रात्री उशीरा पर्यंत फेसबुकवर दिसता".
संतापानं लालबुंद होऊन माझ्याकडे बघत ते स्वतःच्या मुलीला म्हणाले "आता नाही पाठवणार कुठलेही मेसेज तुला".
त्यांच्या वयाचा मान राखत, थोड्या तडजोडीच्या आवाजात मी म्हणालो, "सर, आपण आत्तापासून काही काळजी घेतली तर यातून बाहेर पडू शकाल. फार नुकसान झालेलं नाहीये अजून".
पण ते दुसऱ्याच जगात होते-व्यसनाच्या. दारू, सिगरेट, गांजा किंवा राजकीय विचारधारणेचा आंधळेपणा यापलीकडेही गेलेल्या या नवीन स्क्रीन-व्यसनामुळं नव्या-जुन्या सगळ्याच पिढ्या बौद्धिकदृष्ट्या उध्वस्त होताहेत!
त्यांच्या मुलीला विश्वासात घेऊन मी त्यांची केस आमच्या सायकोलॉजी कौन्सेलर (मानसशास्त्र सल्लागार) कडे पाठवली. वयस्कर लोकांच्या या नवीन व्यसनामुळे त्यांच्यात विसरभोळेपणा, निर्णयक्षमता कमी होणे, मानसिक अस्थैर्य आणि अस्वस्थपणा, चिडचिड ही लक्षणं तर दिसतातच, पण मानदुखी, पाठदुखी, दिसण्याचा त्रास, चकरा येणे, डोकेदुखी, निद्रानाश असे अनेक विकारही होतात. नवीन संशोधनात असं दिसून आलंय की त्यांच्या मेंदूची झीजही वाढते. मानवी मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना होणे, अनेक प्रकारच्या उत्तेजना (स्टिम्युलस) मिळणे आवश्यक आहे, ते न मिळाल्यास मेंदूच्या पेशींची वाढ खुंटते, आहेत त्याही पेशी निकामी व्हायला लागतात. दिवसभर स्क्रीन-मोबाईलकडे बघत राहणे हे एकच काम करण्यानं मेंदूला इतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. हे फार भयंकर आहे.
अगदी श्रीमंतांपासून ते गरीब-वंचितांपर्यंत, दीड-दोन वर्षांच्या बाळांपासून ते नव्वदीतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत अनेकांना या व्यसनानं गिळून टाकायचा प्रयत्न चालवलाय. धार्मिक, राजकीय, लोकांच्या भाषणांपासून ते वैज्ञानिक माहितीपर्यंत, व्हाट्सअँप फॉर्वर्डस पासून ते पॉर्नपर्यंत, कुणाला कशाचं स्क्रीन-व्यसन असेल ते कळणं अवघड झालंय, मात्र मोबाईल काढून घेतला तर घालमेल होणे हे एकच लक्षण या आजाराच्या निदानासाठी पुरेसं आहे. सगळी कामं, सगळ्या जवाबदाऱ्या विसरून नुसतं मोबाईल, कॉम्प्युटर मध्येच हरवून जाणं यात अनेकांच्या आयुष्याचं अतोनात नुकसान होतंय. मागच्या आठवड्यात तर एका सुशिक्षित वयस्कर गृहिणीनं "तासंतास मोबाईल गेम खेळू नकोस" असं सांगणाऱ्या नवऱ्याशी मारामारीच केली, तेव्हा तिच्याही ते लक्षात आलं आणि ती स्वतःहून दवाखान्यात आली. माझ्यासहित आपण सगळेच थोडंसं नकळत या व्यसनाच्या आहारी जात आहोत याचं भान ठेवायला हवं. कारण रोजच्या कामात सतत हाती लागणारा फोन. या व्यसनातून सुटायचं असेल, तर पहिली पायरी म्हणजे ते व्यसन आहे, आणि आपण त्यात अडकलोय हे समजून घ्यायला हवं. इथेच माणसं मार खातात! दिवसातून ठराविकच वेळेपुरता स्क्रीन, मोबाईल वापरण्याचा निश्चय करणे आणि तो पाळणे ही दुसरी महत्वाची पण अवघड पायरी. सगळे नोटिफिकेशन / सूचना बंद करून ठेवणे, आणि चार-पाच तासांनी एकदाच दहा मिनटं मोबाईल चालू करून उत्तरं देणं हेही आवश्यक. फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअँप यासाठी दिवसातील तीस-चाळीस मिनिटं राखीव ठेवून इतर वेळी लॉग-आऊट करणं, रात्री झोपायच्या वेळेआधी तासभर मोबाईल स्विच ऑफ करणं जरूरी आहे. जेवताना, अभ्यास करताना, वाहन चालवताना तर मोबाईल बंदच असावा, पण आठवड्यातून दोन दिवस मोबाइलशिवाय काम करण्याची सवय करायला हवी. यासाठी मनाचा निश्चय करणं ज्यांना जमलं, त्यांना या निर्दयी, गंभीर व्यसनावर मात करणं शक्य आहे. इतरांनी काही वर्षात झिजलेले निकामी मेंदू घेऊन जगण्याची तयारी ठेवावी.
डॉक्टर, लहान मोठे विक्रेते, राजकीय नेते यांना समाजाशी संपर्कात राहण्यासाठी फोन आवश्यक असतो, पण "माझ्याशिवाय जग चालूच शकत नाही" अशी हास्यास्पद धारणा कुणीही ठेवू नये. उत्क्रांतीनं दिलेला अतिशय तल्लख मेंदू स्वतःहून नासवणे यापेक्षा मोठं दारिद्र्य ते काय? तुमच्या मेंदूपेक्षा, कुटुंबापेक्षा जर लोक, पैसे आणि स्क्रीन महत्वाचे असतील, तर तथास्तु!
आपणा सर्वांस "हॅपी स्विच-ऑफ".
(c) डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट
पुणे- मुंबई

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा