त्या : ॲनिमल सिनेमा पाहिलास?
मी : हो. दोनवेळा पाहिला.
त्या : त्याविषयीच बोलायचं आहे.
मी : ओके.
त्या : तुला काय वाटतं?
मी : कशाबद्दल?
त्या : सिनेमा प्रभावी माध्यम आहे?
मी : सर्वात प्रभावी माध्यम आहे.
त्या : ते कसं?
मी : आजवर घडलेल्या घटना तर तेच सांगतात.
त्या : कोणत्या?
मी : 'एक दुजे के लिए' हा सिनेमा पाहून..
त्या : प्रेमी युगुलांनी लागोपाठ आत्महत्या केल्या.
मी : 'तेरा नाम' हा सिनेमा पाहून..
त्या : तरुणांनी हेअर स्टाईल कॉपी केली.
मी : धूम चित्रपट पाहून..
त्या : धूम स्टाईल बाईक चालवताना कित्येकांचे अपघात झाले.
मी : सिनेमा समाजमनावर खोलवर परिणाम करतो.
त्या : म्हणजे ॲनिमलच्या बाबतीतही तेच होईल?
मी : नक्कीच.
त्या : ते धोक्याचं नाहीये?
मी : ते कसं?
त्या : ॲनिमल हा सिनेमा अल्फा मेल कॉन्सेप्टवर आधारित आहे.
मी : हो. मीही ऐकलंय..
त्या : अल्फा मेल कॉन्सेप्ट ठाऊक आहे ना?
मी : थोडीफार माहिती आहे.
त्या : मी एक्स्प्लेन करते.
मी : चालेल.
त्या : चिंपँझींच्या समुहाचा एक लीडर असतो.
मी : ओके.
त्या : जो सर्वाधिक ताकदवान व क्रूर असेल त्यालाच लीडर बनण्याचा मान मिळतो.
मी : ते कसं ठरतं?
त्या : जुन्या लीडरला क्रूर पद्धतीने ठार मारून.
मी : म्हणजे?
त्या : म्हणजे ज्याला समूहाचा लीडर बनण्याची इच्छा असेल, तो म्हाताऱ्या लीडर चिंपँझीला फाडून टाकतो.
मी : फाडून?
त्या : हो. त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे करून तो समूहाला स्वतःची ताकद दाखवून देतो.
मी : बाप रे..
त्या : लीडर बनल्यानंतर तो त्याचा पहिला हक्क सांगतो.
मी : कशावर?
त्या : समूहातील मादांवर आणि अन्नावर.
मी : इतर?
त्या : इतर कमकुवत चिंपँझी त्याचं अधिपत्य मान्य करतात.
मी : का?
त्या : कारण तो समूहाच्या संरक्षणाचं आश्वासन देतो.
मी : कुणापासून?
मी : इतरांपासून.
मी : भयंकर आहे.
त्या : जनावर त्यालाच म्हणतात.
मी : ॲनिमल.
त्या : चिंपँझी मानवाचा जवळचा नातेवाईक आहे.
मी : हो.
त्या : त्यामुळे माणसाच्या उत्क्रांतीत तेच दाखले मिळतात.
मी : कसले?
त्या : अल्फा मेल प्रवृत्तीचे.
मी : ओके.
त्या : मी लहानाची मोठी त्याच वातावरणात झाले.
मी : कोणत्या?
त्या : अल्फा मेल डॉमिनंट वातावरणात.
मी : म्हणजे?
त्या : माझे वडील शीघ्रकोपी व वर्चस्ववादी मानसिकतेचे होते.
मी : मग?
त्या : त्यामुळे ताकदीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, असं त्यांना वाटायचं.
मी : ओके.
त्या : कित्येकदा ते आईला लाथा बुक्क्यांनी मारायचे.
मी : कारण?
त्या : कारण कधीच महत्वाचं नसायचं.
मी : शोषण?
त्या : हो. छोट्यामोठ्या कारणावरून ते चौकात कुणाशीही भांडायचे.
मी : अरे..
त्या : त्यामुळेच त्यांची दहशत असायची.
मी : साहजिकच.
त्या : त्यांच्या मते आडदांड शरीर, मोठी दाढी आणि पिळदार मिशा असणाराच पुरुष असतो.
मी : आडमुठे विचार.
त्या : त्याच विचारांचा प्रभाव माझ्या दोन्ही भावांवर होता.
मी : मग?
त्या : तेही वयात आल्यावर वडिलांप्रमाणे वागायला लागले.
मी : कसे?
त्या : आक्रमकपणाने.
मी : अल्फा मेल मानसिकता?
त्या : अगदी.
मी : मग?
त्या : माझी मोठी वहिनी लग्नानंतर महिनाभरातच माहेरी निघून गेली.
मी : का?
त्या : माझा भाऊ तिच्याशी जनावरासारखं वागायचं.
मी : अरे रे..
त्या : मी तेव्हा बारावीत शिकत होते.
मी : ओके.
त्या : तेव्हा कॉलेजवरून येत असताना, एका टपोरी मुलाने माझ्या मैत्रिणीची छेड काढली.
मी : मग?
त्या : मी जाणूनबुजून ती गोष्ट घरच्यांपासून लपवली.
मी : का?
त्या : कारण मला माझ्या भावांचे भांडखोर स्वभाव ठाऊक होते.
मी : मग?
त्या : एकदिवस बाहेरून त्यांना ते समजलं आणि..
मी : आणि?
त्या : आणि माझ्या दोन्ही भावांनी भरचौकात त्या टपोरी मुलाला हॉकीस्टिकने खूप मारलं.
मी : मग?
त्या : त्यानंतर आठवडाभराने..
मी : काय?
त्या : त्या टपोरी मुलाच्या मित्रांनी माझ्या लहान भावाला गाठलं आणि त्या हाणामारीत..
मी : काय झालं?
त्या : माझ्या भावाचा डावा डोळा जायबंदी झाला.
मी : मग?
त्या : त्या घटनेसाठीही मलाच जबाबदार ठरवलं गेलं.
मी : का?
त्या : माझी छेड काढल्याने ते सगळं घडलेलं, असा वडिलांनी निष्कर्ष काढला.
मी : मूर्खपणा.
त्या : अक्षय ताकदवान माणसाच्या नजरेत बुद्धिमत्तेला शून्य किंमत असते.
मी : सहमत.
त्या : वर्षभरात तर माझं लग्नही उरकून देण्यात आलं.
मी : उरकून?
त्या : हो, उरकून. कारण माझ्या पसंतीचा कुणीच विचार केला नव्हता.
मी : मग?
त्या : माझ्या वडिलांनी त्यांच्यासारखाच अल्फा मेल शोधला.
मी : म्हणजे?
त्या : म्हणजे रांगडा आणि धिप्पाड तरुण.
मी : अजबच निकष आहेत.
त्या : म्हणूनच लग्नानंतर माझ्याही नशिबी तेच आलं, जे..
मी : काय?
त्या : जे माझ्या आईने आयुष्यभर सोसलं.
मी : काय?
त्या : मारहाण आणि शिवीगाळ.
मी : वाईट.
त्या : हळद फिटलीही नव्हती, तेच..
मी : काय?
त्या : नातेवाईकांसमोर त्यांनी मला कानफटात मारलेली.
मी : का?
त्या : चहामध्ये साखर कमी पडल्याने.
मी : अमानवीय आहे.
त्या : तीच तर जनावर वृत्ती आहे.
मी : खरं आहे.
त्या : माझ्या वहिनीप्रमाणे मलाही त्रास सहन करावा लागायचा.
मी : कशाचा?
त्या : नवरा माझ्या भावनांचा कधी विचारच करत नव्हता. सगळं काही ओरबाडून..
मी : संवेदनाहीन.
त्या : माझी अगदी तशी तऱ्हा झाली..
मी : कशी?
त्या : आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी.
मी : सहमत.
त्या : म्हणून माझी एकच इच्छा होती.
मी : कसली?
त्या : माझ्या पोटी मुलीने जन्म घ्यावा.
मी : का?
त्या : कारण मला माझ्या मुलाला त्याच्या बापासारखं जनावर बनलेलं पहायचं नव्हतं.
मी : समजू शकतो.
त्या : देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मला पहिली मुलगी झाली.
मी : दिलासा.
त्या : मात्र दुसऱ्यांदा मी गरोदर राहिले आणि...
मी : आणि?
त्या : माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण झाली.
मी : मुलगा झाला?
त्या : हो.
मी : मग?
त्या : विशेष म्हणजे मुलगा दिसायलाही अगदी माझ्या नवऱ्यासारखा.
मी : ओके.
त्या : लहानपणापासून त्यानेही घरात कायम तेच पाहिलं.
मी : काय?
त्या : बापाचा आक्रमकपणा.
मी : अनुकरण करायचा?
त्या : हो. कळायला लागल्यापासून तो बापासोबत जेवायचा आणि व्यायाम करायचा.
मी : चांगली सवय होती.
त्या : अक्षय ताकद फक्त वर्चस्व गाजवण्यासाठी नसते.
मी : हो.
त्या : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं..
मी : तसं काय?
त्या : अवघ्या १४ वर्षांचा असताना त्याने त्याच्या बहिणीला मारलेलं.
मी : का?
त्या : त्याने तिला एका मुलाशी बोलताना पाहिलेलं.
मी : त्यावरून?
त्या : हो.
मी : मग?
त्या : मला ते समजल्यानंतर मी त्याचा चांगला बेत बघितलेला.
मी : बरं केलं.
त्या : मात्र त्याचा बाप त्याला त्यावरून एका शब्दानेही बोलला नाही.
मी : का?
त्या : छुपा पाठिंबा.
मी : प्रवृत्ती बळावते.
त्या : तेच झालं.
मी : म्हणजे?
त्या : हुशार असूनही आठवीनंतर त्याच्या शाळेतून वारंवार तक्रारी यायला लागल्या.
मी : का?
त्या : सतत भांडणं.
मी : मग?
त्या : मी माझ्यापरीनं त्याला समजवायचे, मात्र..
मी : मात्र?
त्या : मात्र माझ्या नवऱ्याला अभिमान वाटायचा.
मी : का?
त्या : कारण बापाकडून मारामारीचे किस्से ऐकतच तो लहानाचा मोठा झाला.
मी : शोकांतिका..
त्या : तेव्हा नुकतंच त्याचं फर्स्ट इअरला ॲडमिशन झालेलं.
मी : मग?
त्या : आम्ही फॅमिली ट्रीपसाठी गेलेलो.
मी : ओके.
त्या : ओव्हरटेक करताना बाजूच्या कारला आमची कार धडकली.
मी : अरे..
त्या : पुढे जाऊन माझ्या नवऱ्याने त्या कारला गाडी आडवी मारली आणि..
मी : आणि?
त्या : ड्रायव्हिंग करत असलेल्या मुलाला बाहेर ओढलं.
मी : त्याचं वय काय असेल?
त्या : तो मुलगा २४ वर्षांचा होता.
मी : मग?
त्या : सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत.
मी : मग?
त्या : त्यादरम्यान माझा मुलगा धावत गाडीबाहेर आला.
मी : ओके.
त्या : तेव्हा समोरच्या गाडीतील मुलाने नेमकी माझ्या नवऱ्याची गचांडी पकडलेली.
मी : चिडला?
त्या : माझ्या मुलाला राग अनावर झाला आणि त्याने गाडीत ठेवलेली बेसबॉल स्टिक हातात घेतली.
मी : बाप रे..
त्या : त्यानंतर आम्ही त्याला आवरण्याचा खूप प्रयत्न केला मात्र..
मी : मात्र?
त्या : मात्र त्याच्या ताकदीसमोर आम्ही तिघे कमी पडलो.
मी : मग?
त्या : समोरचा पोरगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर त्याचा हात थांबला.
मी : राग वाईट.
त्या : त्यानंतर पोलीस आले, माझ्या नवऱ्याला आणि मुलाला अटक झाली.
मी : तो जखमी मुलगा?
त्या : तो २३ दिवस कोमात होता आणि मग..
मी : मग?
त्या : मग एकदिवस त्याच्या मृत्यूची बातमी आली.
मी : OMG.
त्या : माझ्या मुलाने गुन्हा कबूल केल्याने त्याचा बाप सुटला.
मी : अरे रे..
त्या : तिकडे माझ्या मुलाला शिक्षा सुनावण्यात आली आणि इकडे आमच्या नशिबी जन्मठेप आली.
मी : भयावह आहे.
त्या : आजकाल जेव्हा कधी तो पॅरोलवर असताना तोंड दडवून घरी येतो, तेव्हा..
मी : तेव्हा काय?
त्या : तेव्हा मला त्याच्याकडे बघवतही नाही.
मी : का?
त्या : कधीकाळी किलोभर चिकन पचवणारं माझं वाघासारखं पोरगं आता पुरतं खंगलंय.
मी : डोकं सुन्न झालं.
त्या : त्याचा बाप रात्री अपरात्री झोपेत बडबडत असतो.
मी : काय?
त्या : निशांत नको मारू त्या पोराला, तुला शिक्षा होईल.
मी : पश्चाताप.
त्या : हो. वेळ निघून गेल्यावर झालेला पश्चाताप.
मी : खरं आहे.
त्या : म्हणूनच आज तुझ्याशी बोलायचं ठरवलं.
मी : का?
त्या : अल्फा मेल मानसिकतेचा धोका सांगण्यासाठी.
मी : पटतंय.
त्या : ॲनिमल सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं ॲडल्ट सर्टिफिकेट मिळालं आहे.
मी : हो.
त्या : असं असूनही १८ वर्षांखालील मुलं थियेटरमध्ये सिनेमा पाहताना नजरेस पडतात.
मी : प्रशासन गाफील.
त्या : शिवाय फेसबुकवर त्या सिनेमाचा एक सीन आला आहे.
मी : कोणता?
त्या : बहिणीच्या कॉलेजमध्ये बंदूकीने फायरिंग करण्याचा.
मी : हो.
त्या : त्याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो.
मी : हो.
त्या : माणसात आणि जनावरात फरक आहे अक्षय..
मी : नक्कीच.
त्या : म्हणूनच आपण नीतिमूल्य जोपासणाऱ्या समाजाची उभारणी केली.
मी : हो.
त्या : माणूस संवेदनशील असतो आणि त्याला भावना असतात.
मी : करेक्ट.
त्या : न्यायव्यवस्था सक्षम असल्याने..
मी : काय?
त्या : कुणी सहजासहजी कायदा हातात घेण्याचं धाडस करू शकत नाही.
मी : १००%
त्या : जंगलातील जनावरांचं तसं नाहीये.
मी : अगदी खरं.
त्या : मात्र ॲनिमलसारखे सिनेमे वेगळा पायंडा पाडतील.
मी : हो.
त्या : ज्यामुळे माझ्या मुलासारखं कित्येकांचं आयुष्य उद्धवस्त होईल.
मी : वास्तव.
त्या : सिनेमा मनोरंजनाचं माध्यम आहे हे जरी मानलं, तरी..
मी : तरी?
त्या : तरी सिनेमामुळे समाजमनावर होणारा परिणाम दुर्लक्षित करता येणार नाही.
मी : बरोबर.
त्या : शक्य झालं तर आज नक्की यावर काहीतरी लिही.
मी : नक्की लिहितो.
त्या : नाहीतर..
मी : नाहीतर काय?
त्या : नाहीतर आज आपण अल्फा मेल मानसिकतेचं उदात्तीकरण करणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन देऊ आणि..
मी : आणि?
त्या : आणि उद्या प्रशासनाला त्याच माणसाच्या रूपातील जनावरांची नाईलाजाने शिकार करावी लागेल.
मी : ज्जे बात!
©️अक्षय भिंगारदिवे,
१० डिसेंबर २०२३

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा