मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

789. ओबीसी समाज

      एका मराठा बांधवाने आपल्या पत्नीला विचारले.  पाणी छान आणि थंड आहे. आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस?
पत्नीः-   शेजारच्या कुंभारा कडून.
काय?   त्या लायकी नसल्याचे पाणी मला पाजलेस , तुला लाज वाटत नाही? आपण उच्च आहोत.
आपल्याला खालच्या वर्गाचे काही चालत नाही?"
पत्नीः- (घाबरली व म्हणाली)  मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही.
 [ दुस-या दिवशी ]
मराठा बांधव-अग... जेवायला वाढ.
पत्नीः    काही-नाही.. 
मराठा बांधव काय...? पोळी केली नाही..?
पत्नीः- नाही.
 कारण.
तवा  लोहाराने व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू फेकून दिल्या.
मराठा बांधव- वेडी आहेस काय..? बरं दुध आण.
पत्नीः- मी दुध फेकुन दिले. कारण  ते लायकी नसलेल्या गवळ्याने दिले. मी म्हटले उद्या पासुन दुध आणू नको.
आम्हांला खालच्या वर्गातील लोकांचे काही चालत नाही.
मराठा बांधव- बर मी बाहेर चाललोय माझी चप्पल कुठे आहे?
पत्नीः ते मी बाहेर टाकले. 
मराठा बांधव : का?????
पत्नी : ते चप्पल तुम्हाला एका चांभाराने दिले होते म्हणून टाकले.
मराठा बांधव - (किंचाळला) काय...?
मराठा बांधव :- बरंबर.
झोपायला खाट लाव.
पत्नी म्हणाली - मी खाट तोडून टाकली  व लाकडे जाळुन टाकली. मेलं त्या सुताराचे काहीच नको आपल्याला..!!
मराठा बांधवाने डोक्याला हात लावला.
म्हणाला :- अरे.
मराठा बंधवाला भोवळ आली व म्हणाला, माझे आई घरात एवढा कचरा व घाण का? 
केरसुणी त्या खालच्या जातीतील लोकांनी बनवलेली होती , म्हणून मी ती फेकून दिली.
   मराठा बांधवाचे डोके गरगरले. घरात काहीच दिसत नाही. वस्तू कुठं गेल्या..?
पत्नी म्हणाली :- नाथ.  घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी ओबीसी समाजातील लोकांनी बनवली आहे. त्यामुळे
मी त्या तोडून मोडुन जाळुन टाकल्या. मराठा बांधव मोठयाने ओरडला
 म्हणाला," अरे आपलं तर काहीच नाही एवढे घरच काय ते  उरले आता.
पत्नी म्हणाली, नाथ चिंता करू नका,  मी आपल्या आज्ञे पुढे नाही,  मी हे घर दान करून टाकले आहे. कारण हे घर त्या लायकी नसलेल्या गवंडी वडार ने बांधले होते, नकोच बाई आपल्याला लायकी नसलेल्या लोकांनी बाधलेले.   
मराठा बांधव चक्कर येवुन खाली पडला, हे देवा माझे पान ही खालच्या ओबीसी शिवाय हालत नाही. आपलं सर्व जिवनच खालच्या समाजाच्या लोकांवर अवलंबून आहे. आपण तर उच्च आपली जात उच्च मात्र समाज रचनेत आपले काहीच कुठे योगदान दिसत नाही.     
       लक्षात ठेवा लायकी ही कर्तृत्वाने सिध्द होते.उच्च असल्याने नाही. आणि ओबीसी समाज हा या देशाचा निर्माण कर्ता आहे.या देशात जे जे निर्माण झाले आहे ते याच ओबीसी समाजाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...