गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2712. श्री संत साईनाथ महाराज यांच्या आरतीचा इतिहास

 " आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा"
आरती लेखक : श्री माधवराव वामनराव अडकर.
*****
आता पर्यंत बऱ्याच साई भक्तांना श्री संत साईबाबा यांची आरती कोणी लिहिली याबाबत माहिती नाही. " आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा " ही आरती श्री माधवराव वामनराव अडकर यांनी लिहिली आहे.श्री माधवराव अडकर यांचा जन्म  ५ सप्टेंबर १८७७ ह्या दिवशी झाला. ते श्री साईनाथ महाराजांचे एक निस्सिम भक्त होते आणि त्यांनीच श्री साईबाबा यांची जगप्रसिद्ध आरती " आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा " ही आरती लिहिली. श्री माधवराव अडकर हे एक उत्तम कवी होते तसेच त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. ही आरती १९०३- १९०४ चे आसपास लिहिल्या गेली.
श्री माधवराव वामनराव अडकर हे साईबाबांच्या सानिध्यात राहणारे एक थोर महाभक्त होते. यांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला होता. त्यांच्या जीवनात सुरुवातीपासूनच धार्मिक संस्कार घडले होते म्हणून ते सांसारिक गोष्टीपासून अलिप्त होते. त्यांना मराठी, उर्दू, हिंदी, संस्कृत आणि तेलगू भाषांचे उत्तम ज्ञान होते. त्यांची " आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा " ही आरती सर्वप्रथम श्री संतकवि दासगणू महाराज यांनी ऐकली होती. ही आरती ऐकून ते मंत्रमुग्ध झाले आणि त्याचवेळी त्यांच्या मुखातून उद्गार निघाले की, " श्री संत साईबाबा समाधी मंदिरात हीच आरती गायली जाईल." आणि आजपर्यंत त्यांच्या मुखातून निघालेले शब्द अगदी सत्य झालेले दिसत आहे. हीच श्री संत साईबाबांची मराठी आरती आज प्रामुख्याने देश परदेशात गायली जात आहे.
श्री माधवराव वामनराव अडकर यांनी लिहिलेली आरती आणि त्या आरतीचा मराठी आणि इंग्रजी भावार्थ पुढीलप्रमाणे :-

आरती साईबाबा | सौख्यदातार जीवा ||
चरणरजातलीं | द्यावा दासां विसांवा, भक्तां विसावा || आरती साईबाबा ||
अर्थ: हे साईबाबा, तुम्ही ह्या अवघ्या जगाला सुख देणारे आहात त्यामुळे तुमच्या ह्या चरण रजनांच्या धुळीत आम्हाला, तुमच्या दास भक्तांना शांती व आधार मिळावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. 
Aarti Sai Baba, Saukhyadatara Jeeva. 
Charan Rajatali Dhyava Dasa Visawa, Bhakta Visawa. Aarti Sai Baba.
Refrain : We do Aarti to Sai Baba, the soul that and the giver of happiness to all. Give refuge to the downtrodden devotees who are at your feet. We do Aarti to you Sai Baba.

जाळुनियां अनंग | स्वस्वरूपी राहे दंग ||
मुमुक्षु जना दावीं | निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग || आरती साईबाबा ||
अर्थ: तुम्ही काम, अर्थात आपले सर्वांग जाळून आपल्या आत्मस्वरूपात रममाण झाला आहात. त्यामुळे तुम्ही आता आमच्या मनातील मोह आणि माया दूर करा हो.
Jaluniyan Ananga SwaswaRupee Rahe Dang.
Mumukshu Jana Davi Nija Dola Shrirang ,Aarti Sai Baba.
Burn the desires. To the seekers of Self, teach them the way to get Moksha (state of pure bliss). With their own eyes they see the Lord Vishnu (Sriranga). 
We do Aarti to you Sai Baba.

जया मनीं जैसा भाव | तया तैसा अनुभव ||
दाविसी दयाघना | ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव || आरती साईबाबा ||
अर्थ: हे दयाघना तुझ्या ज्या भक्तांच्या मनात जशी भावना असेल त्याचप्रकारे तुम्ही त्या भक्ताला आपले अनुभव देत असता आणि त्याच अनुसार तुम्ही आपले स्वरूप आपल्या भक्तांना दाखवित असता कारण तुझी शक्ती अशीच आहे.
Jaya Mani jaisa Bhav, taya taisa Anubhav, Davisi Daya Dhana, aisi tuzi hi mav Aarti Saibaba.
You grant suitable experiences to everybody in accordance with their Faith and devotion. O, merciful one, such is your way.O kind one. 
We do Aarti to you Sai Baba.

तुमचें नाम ध्यातां | हरे संसृतिव्यथा ||
अगाध तव करणी | मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा || आरती साईबाबा ||
अर्थ: हे साईनाथा, तुमचे आम्ही नित्य  नामस्मरण केल्याने आमच्यासारख्या अनाथ संसारातील लोकांचे जे दु:ख आहे व जे आपल्या डोळ्यांनी दिसणारे आहे तसेच ज्ञानेंद्रियांना जाणवणारे आहे अशा भक्तांना तुम्ही योग्य तो मार्ग दाखविता.
 Tumache Nam dhyata hare sansrithi vyatha
Agadha tava Charani Marg Davisi Anatha. Aarti Sai Baba
Meditation of your name removes the worldly sufferings. Your actions are unfathomable. Show the path to unfortunate ones. 
We do Aarti to you Sai Baba.

कलियुगीं अवतार | सगुणब्रह्म साचार ||
अवतीर्ण झालासे | स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर ||आरती साईबाबा ||
अर्थ: हे साईनाथा, तुम्ही ह्या कलीयुगात श्री दत्तगुरूंचा सगुण अवतार घेतला आहे जो अगदी खरोखरच साचार स्वरूपात आहे. 
Kali Yugi Avtar, Sagun Parabramha Sachar, Avtirna zalase Swami Datta Digambar, Datta Digambar,Aarti Saibaba.
In this age of Kaliyug (The dark and troublsome age of present ), you are true incarnation of Brahama, that has taken form and descended on this earth. You are also Swami Datta digambar (Three-headed diety who is considered as combined incarnation of Brahma, Vishnu and Maheh as a Datta digambar.
We do Aarti to you Sai Baba.

आठा दिवसां गुरुवारी | भक्त करिती वारी ||
प्रभुपद पहावया | भवभय निवारी, भय निवारी || आरती साईबाबा ||
अर्थ: हे साईनाथ महाराज आपले भक्त दर गुरुवारी तुमचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला वारी करतात. त्यांच्या संसाराचे भय दूर करण्यासाठी ते तुमच्या चरणांचे दर्शन घेतात. 
Aatha Divasa Guruvari, Bhakta kariti Wari, Prabhu Pad pahavaya, Bhavbhaya Niwari Aarti SaiBaba.
On Thursdays,every week, the devotees take a trip (to Shirdi), to have a glimpse of the Lord’s feet and to avert their worldly fears. 
We do Aarti to you Sai Baba.

माझा निजद्रव्य ठेवा | तव चरणसेवा ||
मागणे हेचि आतां | तुम्हां देवाधि देवा,देवाधि देवा || आरती साईबाबा ||
अर्थ: हे साईनाथा, मला नित्य तुझी चरणसेवा मिळो, हे देवाधी देवा, देवाधी देवा हिच माझी खरी संपत्ती आहे. यानंतर आता मला काहीही नको, आता मला फक्त तुझी सेवा करू दे.
Maza Nijdravya Theva, Tav Charan Raj Seva. Magne hechi Aata.
Tumha Devadhi Deva , Devadhi Deva Aarti Saibaba.
The only wealth I desire is to serve at thy feet. O Lord of Lords. 
We do Aarti to you Sai Baba.

इच्छित दीन चातक | निर्मळ तोय निजसुख ||
पाजावे माधवा या | सांभाळ आपुली भाक, आपुली भाक || आरती साईबाबा ||
अर्थ: जसा चातक पक्षी हा पाऊस कधी येईल ह्यासाठी अगदी आतुर असतो. कारण त्यामुळे त्यात त्याला स्वतः आंतरिक सुख मिळत असते
अगदी त्याच प्रमाणे मला तुझी भक्ती हवी आहे कारण त्यातच माझे सुख सामावलेले आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला नित्य तुमची सेवा करण्याची संधी द्या.
Ichchhit Din Chatak ,Nirmal Toy Nijsukh,pajave Madhava Ya.
Sambhal Apuli Bhak , Apuli Bhak 
Aarti Sai Baba.
Just as the chatak bird desires to drink pure raw water , so O Lord! And kindly give me your assurance (that I will receive such direct knowledge). 
We do Aarti ....

 शिर्डीचे साईबाबा यांची प्रसिद्ध आरती "आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा" ही श्री माधवराव वामनराव अडकर महाराजांनी रचली असून, ती त्यांच्या श्री संत साईबाबांच्या भक्तीचे, प्रेमाचे आणि शरणागतीचे प्रतीक आहे. ही आरती कलीयुगात साईबाबांच्या सगुण रूपाचे वर्णन करते आणि त्यांच्या चरणांशी विसावा (शांती) मागते आणि ती शांती आपल्या भक्तांना देते. त्यामुळे बाबांची ही शांती आणि आधार बाबांच्या सर्वच भक्तांना मिळो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना.
🌹लेखांकन आणि प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे.
मो. 9826685695.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...