गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2717. मरावे आणि...

 उमाताई आणि उल्हासराव यांचा अगदी द्रिष्ट लागण्यासारखा जोडा होता.अगदी लक्ष्मिनारायणा सारखा. किंवा हल्लीच्या भाषेत 'made for each other'.सोसायटीच्या गणेश उत्सवात एकदा त्यांना फिश पौंड मध्ये  जोडी  नंबर १ चा फिशपोंड हि मिळाला होता.
दोघेही नात्यांना आणि  मैत्रीला जपणारे होते. त्यातून उमाताई अतिशय सुगरण होत्या.त्यामुळे त्यांच्याकडे आल्यागेल्याचा सतत राबता असे.उमाताई निगुतीने संसार करणाऱ्या तर उल्हासराव निर्व्यसनी..थोडीशी हौसमौज आणि बरीचशी काटकसर करीत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिले..मुलाला दिल्लीला उत्तम नोकरी लागली त्याचा संसार सुरु झाला..मुलगीही सुस्थळी पडली.आणखी काय हवे मध्यम वर्गातील माणसाला?सगळे म्हणत "अगदी नेटका संसार केला हो दोघांनी.."आणि दोघनाही कृतकृत्य झाल्यासारखे वाटे.
आता दोघेच उरल्या वर आणि जबाबदारीचे ओझे कमी झाल्यावर दोघाना स्वतःकडे पाहायला सवड मिळाली.मनात येईल तेंव्हा नाटक/सिनेमा बाहेर जेवण ,कधी छोटीशी सहल तर कधी प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे ह्याला वेळ मिळू लागला.
२ वर्षांनी उल्हासराव निवृत्त झाले तेंव्हा त्यांच्या जवळ स्वतःची गाडी आणि मालकीचा flat होता. आता दोघांकडे भरपूर वेळ होता. सकाळी फिरून आल्यावर दोघे मिळून गप्पाटप्पा करत उमाताईनी केलेला नाष्टा घेत. पोहे, सांजा, उप्पीट, शिरा इडली, डोसे, असे काहीतरी चविष्ट. पण जेवणातही उल्हासरावानी फर्माईश केल्यावरून हरतर्हेचे समोसे वडे,कचोरी,कबाब,भजी,अळूवडी असे काहीतरी करीत..उपवास म्हणजे तर जिभेचे चोचले पुरवणे असे..दोघांच्या तब्येती उत्तम असल्यामुळे मनसोक्त खवय्येगिरी करता येई. 
त्या दिवशीही  रात्रीचे जेवण घेऊन दोघे tv पहात असताना उल्हासरावाना एकेकी अस्वस्थ वाटू लागले..घाम फुटला.उमाताईनी वेळ न दवडता डॉक्टरांना फोन केला..डॉक्टरांनी तपासले आणि  त्यांना ताबडतोब हॉस्पिटल मध्ये admit करण्यास सांगितल्यावर उमाताईचा धीर सुटला. .शेजारच्या सुभाषच्या मदतीने त्यांनी उल्हास्ररावाना हॉस्पिटल मध्ये नेले.तेथे ताबडतोब सर्व चाचण्या केल्या गेल्या.डॉक्टर म्हणाले"त्यांचा रक्तदाब खूप वाढला आहे..रक्तातील साखरही वाढली आहे.मी treatment   सुरु करतो. २ दिवस त्यांना observation खाली ठेऊ. तशीही त्यांना आरामाची गरज आहेच.एकदा औषधोपचाराची निश्चिती झाली कि तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता.२ दिवसांनी उल्हासराव घरी आले.डॉक्टरांनी औषधांबरोबर काय करायचे/काय करायचे नाही/काय खायचे/काय खायचे नाही याची मोठीच यादी लिहून दिली होती.उमाताई त्यावर हुकुम वागत सकाळी  बिन साखरेचा किंवा गोळी घालून केलेला एकच कप चहा आणि गव्हाच्या पीठाचे एकाद दुसरे बिस्कीट तर नाश्त्याला ओटमील हा भयानक प्रकार.उल्हासरावांसाठी आता तळलेले पदार्थ अजिबात वर्ज्य होते. शिवाय जेवणात  मैदा नाही, साखर नाही,,मीठ कमी, फोडणीला तेलतूप कमी  असे नियम होते. उल्हासरावाना  ते बेचव अन्न घश्याखाली उतरत नसे. उमाताई गूगल वरून अनेक नव्या पाककृती शिकत पण उल्हासरावाना ते काहीच आवडत नसे..एक दिवस उमाताइनी नाचणीची  लापशी चवीत जरा बदल म्हणून केली तर उल्हासराव नुसते चवताळून उठले.
डॉक्टर मधून मधून तपासायला येत ते उमाताईच्या सुश्रुशेवर खूष होते.ते म्हणत  "उल्हासराव उमाताईमुळे तुमची तब्येत उत्तम राहिली आहे.'त्यावर  लगेच उल्हासराव चिडून  म्हणत "अहो डॉक्टर, ह्याला काय जगणे म्हणायचे?हे खाऊ नका/ते खाऊ नका..जिने चढू नका यंव नि त्यंव.."डॉक्टर ह्यावर नुसतेच स्मित करीत. 
आता उल्हासराव ८० चे झाले होते आणि उमाताई ७५ च्या. एक दिवस मुलीने खूप आग्रहाने बोलावले म्हणून दोघे तिच्याकडे जाण्यासाठी निघाले आणि काय योगायोग पहा, अपघात होऊन दोघेही जागाच्याजागी कैलासवासी झाले.
*****
स्वर्गात गेल्यावर तेथील सेवकाने त्यांच्या समोर उत्तमोत्तम पदार्थ आणि सोमरसाची सुरई आणून ठेवली. थोडेसे साशंक होत उल्हासरावानी विचारले 
"ह्याचे किती पैसे होतील?" सेवक हसत म्हणाला 
"हा स्वर्ग आहे येथे सर्व फुकट आहे." 
"मी ड्रिंक घेऊ शकतो का?' उल्हासरावानी विचारले. 
"..हा स्वर्ग आहे येथे तुम्ही काहीही आणि हवे तेव्हढे खाउपिऊ शकता." सेवक म्हणाला.. 
"तसे नाही. मला रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास आहे ,म्हणून...."उल्हासराव म्हणाले.
"घाबरू नका हा स्वर्ग आहे. येथे तुमच्या तब्येतीला कोणताही धोका नाही. कारण येथे मरणच नाही".सेवक म्हणाला.
उल्हासरावांचा पारा आता एकदम चढला.ते उमाताईना म्हणाले 
"तुझ्यामुळे...तुझ्यामुळे मी ह्या स्वर्गसुखाला इतके दिवस मुकलो. तुझे ते आहार नियंत्रण, औषधे, ह्यामुळे मी आजाराची सुरवात झाल्यावर २० वर्षे जगत राहिलो. त्याच वेळी तुझे ऐकले नसते तर ६० व्या वर्षीच मेलो असतो आणि हे स्वर्गसुख अनुभवले असते ना ! 'सेवक स्मित करीत तेथून निघाला आणि उल्हासराव तेथील पदार्थांवर तुटून पडले.

---नीला शरद ठोसर---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...