गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2708. मानव शरीराचे २४ तत्त्व

 शरीर, मन आणि चेतनेचे रहस्य. भारतीय तत्त्वज्ञानानुसार मानव केवळ देह नाही. तो शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि चेतना यांचा एक सूक्ष्म संगम आहे. विशेषतः सांख्य दर्शन मध्ये मानवाच्या अस्तित्वाची मांडणी २४ तत्त्वांमध्ये केली आहे. ही तत्त्वं समजली तर जीवनाचं गूढ उलगडतं.
 
ही २४ तत्त्वं कोणती?
१️) पंचमहाभूत (५)
पृथ्वी,
आप (जल),
तेज (अग्नी),
वायू,
आकाश,
आपल्या शरीराची भौतिक रचना यांच्यापासून बनते.

२️) पंचज्ञानेंद्रिये (५)
डोळे (दर्शन),
कान (श्रवण),
नाक (घ्राण),
जीभ (रसना)
त्वचा (स्पर्श),
ही बाह्य जगाची माहिती आत आणतात.

३️) पंचकर्मेंद्रिये (५)
हात,
पाय,
वाणी,
जननेंद्रिय,
गुद,
ही कृती करण्याची साधनं आहेत.

४️) पंचतन्मात्रा (५)
शब्द,
स्पर्श,
रूप,
रस,
गंध,
ही सूक्ष्म अनुभवांची बीजं आहेत.

५️)  अंतःकरण चतुष्टय (४)
मन,
बुद्धी,
चित्त,
अहंकार,
हेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचं केंद्र.
मग चेतना कुठे आहे...?

या २४ तत्त्वांपलीकडे आहे पुरुष किंवा आत्मा,
जो साक्षी आहे.
जो पाहतो, 
अनुभवतो, 
पण गुंतत नाही.
शरीर बदलतं.
विचार बदलतात.
भावना बदलतात.
पण जो “मी आहे” असा अनुभव देतो, तो चेतनेचा प्रकाश आहे.

याचा जीवनाशी संबंध काय.?
१) घर आणि शरीर पंचमहाभूतांनी संतुलित ठेवा - आरोग्य टिकेल. समृद्धी वाढेल.
२) ज्ञानेंद्रियांचा संयम ठेवा - मन शांत राहील.
३) कर्मेंद्रियांचा योग्य उपयोग करा - कर्म शुद्ध होईल.
४) अंतःकरण चतुष्टय नियंत्रण ठेवा  - नाती टिकतील.
२४ तत्त्वांचं संतुलन म्हणजेच समग्र जीवन संतुलन.

अंतिम विचार...
आपण केवळ शरीर नाही.
आपण केवळ मनही नाही.
आपण त्या सर्वांचा साक्षी आहोत.
२४ तत्त्वांचा अभ्यास म्हणजे
स्वतःला ओळखण्याची सुरुवात.
जेव्हा शरीर, मन आणि चेतना यांचं संतुलन साधतं, तेव्हा जीवनात खरी स्थिरता आणि शांती येते. 🌹🙏

ज्योती मयेकर,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...