गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2702. स्त्रीला जर दुःख दिलं

 एक तहानलेला माणूस विहिरीजवळ गेला.
तिथे एक तरुण स्त्री पाणी भरत होती.
त्याने नम्रपणे तिला थोडं पाणी मागितलं.
तीने हसत त्याला पाणी दिलं.
पाणी पिल्यानंतर तो म्हणाला,
“मला स्त्रीस्वभावाबद्दल काही सांगाल का?”
इतकं ऐकताच ती मोठ्याने ओरडू लागली.
“वाचवा… वाचवा…!”
तिचा आवाज ऐकून गावकरी विहिरीकडे धावत आले.
तो घाबरून म्हणाला,
“तुम्ही असं का करत आहात?”
ती म्हणाली,
“जेणेकरून गावकरी येतील आणि तुम्हाला चांगलाच धडा शिकवतील.”
तो लगेच म्हणाला,
“मला माफ करा… मी तुम्हाला एक सन्माननीय आणि चांगली स्त्री समजलो.”
इतक्यात तिने बाजूला ठेवलेला माठ उचलला
आणि सगळं पाणी स्वतःवर ओतून घेतलं.
ती पूर्ण भिजली.
गावकरी आले आणि विचारू लागले,
“काय झालं?”
ती शांतपणे म्हणाली,
“मी विहिरीत पडले होते…
या सज्जन माणसाने माझा जीव वाचवला.
हे नसते तर आज मी जिवंत नसते.”
गावकऱ्यांनी त्या माणसाचं खूप कौतुक केलं,
त्याला खांद्यावर उचललं,
आदरातिथ्य केलं आणि बक्षीसही दिलं.
गावकरी निघून गेल्यावर ती स्त्री हसून म्हणाली -
“आता कळलं का स्त्रीस्वभाव?”
स्त्रीला जर दुःख दिलं, तिचा अपमान केला
तर ती तुमचं सुख-शांती हिरावून घेऊ शकते…
आणि जर तिला सन्मान, प्रेम आणि जपणूक दिली
तर ती मृत्यूच्या दारातूनही परत आणू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...