गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

2704. घर तेव्हाच सुंदर होतं जेव्हा

 आजकाल काही वेळेला असं ऐकायला मिळतं 
“मला सासू-सासरे नकोत, फक्त मुलगा हवा.”
पण मग प्रश्न असा आहे -
मुलानेही असंच म्हणायचं का?
“मला सासू-सासरे नकोत, फक्त मुलगी हवी.”
असं कधीच चालत नाही.
कारण लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नसतं,
तर दोन घरांचा, दोन संस्कारांचा, दोन कुटुंबांचा सेतू असतो.

🌸 रेस्पेक्ट दोन्ही बाजूंनी सारखाच हवा
जितका आदर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसाठी हवा असतो,
तितकाच आदर मुलालाही त्याच्या आई-वडिलांसाठी हवा असतो.
आणि म्हणूनच दोघांनीही एकमेकांच्या आई-वडिलांना मनापासून मान दिला पाहिजे.फक्त सूनच सगळं करेल, आणि मुलगा मात्र अलिप्त राहील ही अपेक्षा चुकीची आहे.

🌸 मुलाचाही पुढाकार महत्त्वाचा
अनेकदा सून तिचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असते 
सासू-सासऱ्यांची काळजी, औषधपाणी, विचारपूस, सण-वार…
पण कधी कधी मुलगा मात्र आपल्या सासू-सासऱ्यांना
साधा एक फोनही करत नाही.हे नातं एकतर्फी असू नये.
कधीतरी मुलाने स्वतःहून म्हणायला हवं —
“चल, तुझ्या आईला भेटून येऊया.”
“आज बाबांना फोन करूया.”
हा छोटासा पुढाकारही मुलीच्या मनाला खूप आनंद देतो.
तिला वाटतं — माझं माहेर अजूनही माझ्यासोबत आहे.

🌸 तुलना नाही, समजूत हवी
इतरांच्या घरात काय चालतंय,
कोण वेगळं राहतंय, कोण संयुक्त कुटुंबात आहे 
याची तुलना करून निर्णय घेऊ नयेत.
प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते.
महत्त्वाचं म्हणजे — संवाद, समजूत आणि परस्पर आदर.

🌸 काही सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवूया
 • लग्नानंतर “आपले” आणि “तुझे” आईवडील असं न म्हणता “आपले दोघांचे” म्हणूया.
 • सण-वार दोन्ही घरात आनंदाने साजरे करूया.
 • महिन्यातून किमान एकदा दोन्ही बाजूंच्या आईवडिलांची चौकशी करूया.
 • कुठलाही वाद वाढवण्याऐवजी शांतपणे बोलून सोडवूया.
 • आपल्या जोडीदाराच्या भावनांना कमी लेखू नका - माहेर तिच्यासाठी भावनिक आधार असतो, आणि आईवडील त्याच्यासाठीही तितकेच महत्त्वाचे असतात.

🌿 शेवटचं एकच…
नातं टिकवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते.
थोडा आदर, थोडं प्रेम, आणि थोडा पुढाकार पुरेसा असतो.
सून सासू-सासऱ्यांचं करत असेल,
तर मुलानेही तिच्या आईवडिलांसाठी दोन शब्द काढावेत.
कारण शेवटी 
घर तेव्हाच सुंदर होतं, जेव्हा दोन्ही बाजूंना सारखाच मान दिला जातो. 💛

अदिती कुलकर्णी ✍🏻



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...