गुरुवार, २५ जून, २०२६

2925. तर तो माझ्या मागे का धावत नाहीये ?

 आज माझ्या क्लायंटसोबत बोलताना तिने मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला, ती म्हणाली,
"मॅम, जर तो माझ्यावर खरंच प्रेम करतो, तर तो माझ्या मागे का धावत नाहीये? (Why isn't he chasing me?)"
तिच्या आवाजातली ती अस्वस्थता मला स्पष्ट जाणवत होती. 
आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं वाटतं की पुरुषाने मागे लागणं, सतत मेसेज/ फोन करणं, किंवा आपल्याला मिळवण्यासाठी जीवाचं रान करणं म्हणजेच 'खरं प्रेम'. पण आज एका मोठ्या बहिणीसारखं, किंवा फेमिनिन एनर्जी कोच म्हणून मला तुम्हाला एक गुपित सांगायचं आहे.
एक 'हेल्दी मॅस्क्युलिन'पुरुष कधीच स्त्रीच्या मागे धावत Chase करत नाही.
इंटरनेटवर तुम्ही आजवर जे काही ऐकलं असेल त्यापेक्षा हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना?
हे एका छोट्या गोष्टीच्या रूपात मी तुम्हाला सांगते म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नीट समजेल.‌
(गोष्टी खरी आहे परंतु खरी नावं यात बदललेली आहेत.) 
रिया एक अतिशय सुंदर, समजूतदार आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी. काही महिन्यांपूर्वी तिच्या आयुष्यात कबीर आला. कबीर हा खऱ्या अर्थाने एक 'हेल्दी मॅस्क्युलिन' पुरुष होता. शांत, आत्मविश्वासी, आणि त्याच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणारा.
     सुरुवातीला कबीरने रियामध्ये खूप रस दाखवला. त्याने तिला डेटवर नेलं, तिच्याशी मनापासून गप्पा मारल्या, तिची काळजी घेतली. पण रियाच्या मनात जुन्या नात्यांचे काही भीतीचे कप्पे होते. तिला वाटायचं की जोपर्यंत पुरुष तिच्या मागे वेड्यासारखा धावत नाही, तोपर्यंत तो तिचा होणार नाही. म्हणून रिया मुद्दामहून कबीरला 'मिक्सड सिग्नल्स' देऊ लागली. कधी मेसेजला उशिरा उत्तर देणं, तर कधी उगाचच भाव खाणं. तिला वाटलं कबीर आता तिच्या मागे आणखी जास्त धावेल. पण कबीरने काय केलं माहीत आहे? तो शांतपणे दोन पावलं मागे सरकला. त्याने रियाला त्रास दिला नाही, ना तो तिच्यावर रागावला. त्याने फक्त तिचा पाठलाग करणं थांबवलं.
रिया गोंधळली. तिने विचार केला, "हा माझ्या मागे का येत नाहीये? याला माझ्यात रस नाही का?
जेव्हा रिया माझ्याकडे आली, तेव्हा मी तिला कबीरच्या या वागण्यामागचं मानसशास्त्र समजावून सांगितलं. 
    लक्षात घ्या मैत्रीणींनो, हेल्थी मॅस्क्युलिन पुरुषांना स्वतःचा स्वाभिमान अत्यंत प्रिय असतो. एक मॅस्क्युलिन पुरुष स्वतःच्या मूल्यांचा आदर करतो. जर एखाद्या स्त्रीने त्याला 'मिक्सड सिग्नल्स' दिले, तर त्याला समजतं की कदाचित ती या नात्यासाठी तयार नाहीये. मग तो बळजबरी कोणाच्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करत नाही. असे पुरूष Mind Games खेळण्यात वेळ घालवत नाहीत. "ती रुसलीये मग मी मनवेन, ती भाव खातेय मग मी मागे धावेन" हे खेळ खेळायला त्यांच्याकडे मुळात वेळच नसतो. ते त्यांच्या करिअर, ध्येय आणि आयुष्यात व्यस्त असतात.
ते तुमच्या 'हो' ची वाट पाहतात, मागे लागण्याची नाही. एक मॅस्क्युलिन पुरुष पुढाकार नक्कीच घेतो म्हणजे तो तुम्हाला डेटसाठी विचारेल, तुमच्यासाठी दरवाजे उघडेल, तुमची काळजी घेईल. पण जर त्याला समोरून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर तो तिथेच थांबतो.
प्रिय सखी,
मॅस्क्युलिन एनर्जी 'पाठलाग' करते, आणि फेमिनिन एनर्जी 'आकर्षित' (Attract) करते.
लक्षात ठेव. तू फुल आहेस आणि तो मधमाशी ! फुलाला कधी मधमाशीच्या मागे धावताना पाहिलंय का? नाही ना? फूल फक्त उमलतं, स्वतःचा सुगंध पसरवतं आणि मधमाशी स्वतःहून त्याच्याकडे आकर्षित होते.
त्यामुळे स्वतःमधील खरी फेमिनीन एनर्जी जागृत कर.
यासाठी खालील गोष्टी मी सुचवेन.
 1. स्पष्ट रहा (Be Clear): जर तुला तो आवडत असेल, तर विनाकारण 'नाटकं' किंवा 'माइंड गेम्स' खेळू नकोस. त्याच्या प्रयत्नांना प्रेमाने आणि आदराने प्रतिसाद दे.
 2. स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहा: जेव्हा तू स्वतःच्या छंदांमध्ये, मैत्रिणींमध्ये आणि करिअरमध्ये आनंदी असतेस, तेव्हा तुझी फेमिनिन एनर्जी अधिक खुलते. तुझा हाच आत्मविश्वास त्याला तुझ्याकडे आकर्षित करतो.
 3. त्याला जागा दे (Give Him Space): जेव्हा तो पुढाकार घेतो, तेव्हा त्याचं कौतुक कर. आणि जेव्हा तो बिझी असेल, तेव्हा त्याला त्याची स्पेस दे.
     लक्षात ठेव, जो पुरुष तुझ्या मागे वेड्यासारखा धावतोय (Toxic Chasing), तो बऱ्याचदा प्रेमापोटी नाही तर त्याच्या इगोसाठी (Ego) धावत असतो. एकदा तू त्याला मिळालीस की त्याचा रस संपून जातो. 
पण एक 'हेल्दी मॅस्क्युलिन' पुरुष तुझ्या मागे धावणार नाही, तर तो आयुष्याभर तुझा हात धरून तुझ्यासोबत चालणारा असतो.
याबाबत तुम्हाला काय अनुभव आहे? खाली कमेंट करून मला नक्की सांगा ! 👇❤️
Love,
Dr. Maithili Savant

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...