कधी जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी उभे राहून पाहिलंय का जी? नसेल तर तिथे गेल्यावर नक्की अनुभव करा की काळोखात तो अथांग पसरलेला समुद्र जेव्हा खवळून किनाऱ्याकडे प्रचंड वेगाने येतो , तेव्हा छातीत धडकी भरते. त्याच्या लाटांचा तो रौद्र आवाज ऐकला की वाटतं, आता हा सागर सगळं शहरच गिळंकृत करणार. पण गंमत म्हणजे, या उसळत्या समुद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेली पुरी मात्र रात्री शांत झोपलेली असते. इथल्या मातीत एक असं रहस्य दडलंय, ज्यावर सहसा कुणाचा विश्वास बसत नाही.... आपण नेहमी ऐकतो की देव भक्तांना संकटांच्या बेड्यांमधून मुक्त करतो. पण याच किनाऱ्यावर एक असं दृश्य पाहायला मिळतं, जे मन सुन्न करून सोडतं. ज्या मारुतीरायाने एका उडीत अथांग सागर ओलांडला, जो संकटमोचक आहे, तोच देव इथे पायात जाडजूड साखळदंड आणि बेड्या अडकवून उभा आहे! ज्याच्या नावाने मृत्यूही थरथर कापतो, त्यालाच इथे बेड्या का ठोकल्या असतील? या प्रश्नाचं उत्तर एका अशा काळजाला भिडणाऱ्या कथेत दडलं आहे, जिथे देव आणि भक्ताचं एक अत्यंत हळवं आणि गुंतागुंतीचं नातं उलगडतं.
शेकडो वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा जेव्हा पुरीच्या या पवित्र भूमीत विराजमान झाले, तेव्हा सगळीकडे भक्तीचं आणि आनंदाचं उधाण आलं. पण या आनंदात एकच मोठं विघ्न होतं. ते विघ्न म्हणजे साक्षात समुद्रदेव. आता पुराणांनुसार समुद्र हा माता लक्ष्मीचा पिता, म्हणजे भगवान जगन्नाथांचे सासरे ! आपल्या लाडक्या लेकीला आणि जावयाला भेटण्याची त्यांना इतकी ओढ लागायची की ते प्रेमाच्या भरात वेगाने किनाऱ्याकडे धाव घ्यायचे. पण समुद्राचं हे अथांग प्रेम पुरीच्या लोकांसाठी मात्र मृत्यूचं संकट ठरत होतं. समुद्राच्या मोठ्या लाटा थेट गावात घुसायच्या, लोकांची घरं उद्ध्वस्त व्हायची आणि सगळीकडे एकच आकांत सुरू व्हायचा. आपल्या प्रजेचे हे हाल भगवान जगन्नाथांना बघवले नाहीत. त्यांनी लगेच डोळे मिटले आणि आपला सर्वात लाडका भक्त, मारुतीरायाचा धावा केला. प्रभूची हाक कानी पडताच वायुवेगाने हनुमान पुरीच्या किनाऱ्यावर हजर झाले. जगन्नाथांनी अत्यंत प्रेमाने पण ठामपणे आज्ञा दिली की हनुमंता, या खवळलेल्या समुद्रापासून माझ्या प्रजेचं रक्षण करण्याची जबाबदारी आता तुझी आहे, तू किनाऱ्यावर पहारा दे आणि समुद्राला पुढे येऊ देऊ नकोस. देवाचा शब्द म्हणजे मारुतीरायासाठी प्राण. त्यांनी लगेच 'दरिया महावीर' हे रौद्र रूप घेतलं आणि ते किनाऱ्यावर उभे राहिले. हनुमानाचं ते उग्र रूप पाहून समुद्राचीही पाचावर धारण बसली आणि तो निमूटपणे मागे सरकला. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण हनुमानाचं प्रभू श्रीरामांवर आणि जगन्नाथांवर एवढं अथांग प्रेम होतं की, त्यांच्या दर्शनाविना त्यांना एक क्षणही करमत नसे. रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिरातून आरतीचे सूर, शंखध्वनी आणि टाळ-मृदंगाचा गजर वाऱ्यासोबत किनाऱ्यापर्यंत यायचा, तेव्हा पहारा देणाऱ्या हनुमानाचं मन खूप व्याकूळ व्हायचं. ते देहभान विसरून जायचे. प्रभूंच्या सावळ्या रूपाची त्यांना भुरळ पडायची आणि मंदिरातल्या त्या गोड प्रसादाची, विशेषतः लाडूंची त्यांना खूप आठवण यायची. याच प्रेमापोटी मारुतीराया स्वतःचं कर्तव्य विसरायचे आणि पहारा सोडून थेट मंदिरात देवाच्या दर्शनासाठी धाव घ्यायचे. पण हनुमान किनाऱ्यावरून थोडे जरी दूर गेले, की तो चतुर समुद्र पुन्हा संधी साधायचा. तो उग्र रूप घ्यायचा आणि पुन्हा गावात पाणी घुसायचं. हा लपाछपीचा खेळ अनेकदा झाला.

अखेर भक्तांच्या रक्षणार्थ प्रभू जगन्नाथांनी हनुमानाला आपल्यासमोर बोलावलं. त्या दिवशी देव आणि भक्तामध्ये झालेला संवाद कुणाच्याही डोळ्यांत पाणी आणेल असाच होता. प्रभू विचारू लागले की मारुती, तू मला दिलेला शब्द का मोडतोस, तू गेल्यावर समुद्र पुन्हा माझ्या भक्तांना त्रास देतोय. हे ऐकताच मारुतीरायांचे डोळे पाणावले. अत्यंत कातर आवाजात ते म्हणाले की प्रभू, यात माझा तरी काय दोष, तुमचे ते आरतीचे सूर कानावर पडले की माझं मन माझ्यापाशी राहातच नाही आणि पावलं आपोआप तुमच्याकडे वळतात. मला तुमच्या दर्शनाविना चैन पडत नाही आणि तुमचा तो गोड प्रसाद मला सतत खुणावतो, मी पहारा द्यायचा प्रयत्न करतो पण माझं लक्ष फक्त तुमच्या चरणांपाशीच अडकलेलं असतं. भक्ताचे हे साधे आणि खरे बोल ऐकून जगन्नाथांचाही कंठ दाटून आला. पण शेवटी जगाचा पालनहार म्हणून त्यांना प्रजेचं रक्षण करायचंच होतं आणि कर्तव्यापुढे प्रेमाला कठोर व्हावंच लागतं. प्रभू जगन्नाथांनी एक असा निर्णय घेतला जो वरवर अत्यंत कठोर वाटतो, पण त्यामागे देवाची भक्ताप्रती असलेली एक अनोखी माया दडली होती. त्यांनी चक्क सोन्याच्या बेड्या मागवल्या आणि स्वतःच्या हातांनी त्या हनुमानाच्या पायात आणि हातात अडकवल्या. हनुमानाला किनाऱ्यावर कायमचं बांधून ठेवण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मारुतीरायाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता, उलट त्यांच्या ओठांवर एक तृप्त हास्य होतं. कारण त्यांना ठाऊक होतं की या बेड्या म्हणजे शिक्षा नसून साक्षात देवाने घातलेला प्रेमाचा पाश आहे. जगन्नाथांनी हनुमानाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत वचन दिलं की माझ्या लाडक्या भक्ता, यापुढे तुला माझ्या दर्शनासाठी आणि प्रसादासाठी कुठेही येण्याची गरज नाही, माझ्या प्रसादातील पहिला वाटा आणि तुझे आवडते लाडू मी रोज स्वतः इथे तुझ्यासाठी पाठवून देईन, फक्त तू इथून हलू नकोस. तेव्हापासून आज शेकडो वर्षे उलटून गेली, पण पुरीच्या किनाऱ्यावर हे 'बेडी हनुमान' त्याच साखळदंडांमध्ये अत्यंत शांतपणे उभे आहेत. एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात देवाने दिलेला प्रसादाचा लाडू आहे. आजवर कितीही भयंकर वादळे आली, तरी समुद्राने कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. तुम्ही कधी जगन्नाथ पुरीला गेलात आणि मंदिराच्या मुख्य दरवाज्याजवळ म्हणजे 'सिंहद्वारा'जवळ उभे राहिलात, तर एक अंगावर काटा आणणारा चमत्कार अनुभवायला मिळतो. सिंहद्वाराच्या बाहेर असेपर्यंत समुद्राचा तो भयंकर आवाज घुमत असतो, पण तुम्ही जसं मंदिराच्या आत पाऊल टाकता, तसा तो आवाज एकदम शून्यावर येतो. तिथे फक्त एक दैवी शांतता असते. जणू हनुमानाच्या त्या बेड्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या उपस्थितीने समुद्रालाही प्रभूच्या दरबारात शांत राहण्याची समज दिली आहे. आजच्या जगातही हे बेडी हनुमान आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतात, ती म्हणजे भक्ती जर अढळ असेल, तर निसर्गाचे नियमही त्या प्रेमापुढे नतमस्तक होतात. एका भक्ताने जगाला वाचवण्यासाठी स्वतःला एका जागी बांधून घेण्याची ही कथा खरोखरच मन सुन्न करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा