आजकाल एक गोष्ट खूप वेदना देते.
खरंच आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का?
थोडंसं दुःख आलं, एखाद्याने नकार दिला, कुणी दुर्लक्ष केलं, कुणी अपमान केला, अपेक्षा तुटल्या आणि माणूस थेट जीवन संपवण्याचा विचार करू लागतो.
मान्य आहे.
जीवन जगताना प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो.
कधी नाती तुटतात, कधी स्वप्न मोडतात, कधी आपली किंमत कुणालाच समजत नाही असं वाटतं.
मानसिक ताण, नैराश्य, एकटेपणा, अपयश, आर्थिक समस्या, प्रेमभंग, अवहेलना. हे सगळं मनाला आतून पोखरत राहतं.
पण या सगळ्यांवरचा उपाय आत्महत्या असू शकते का?
मुळीच नाही.
आत्महत्या ही समस्या संपवण्याचा मार्ग नसतो.
ती फक्त आपल्या अस्तित्वालाच संपवते.
ज्या प्रश्नांपासून आपण पळण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रश्नांची वेदना मग आपल्या माणसांच्या आयुष्याला कायमची जखम देऊन जाते.
क्षणभर विचार करा.
तुम्ही नसाल तर तुमच्या आई वडिलांचं काय होईल?
ज्यांनी तुमच्यासाठी रात्रभर जागून काळजी घेतली, तुमच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्यांचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होईल.
तुमचे मित्र, भावंडं, तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं… ते आयुष्यभर स्वतःलाच दोष देत राहतील.
“आम्ही थोडं अजून समजून घेतलं असतं तर?”
“आम्ही त्याला थांबवलं असतं तर?”
हा प्रश्न त्यांना रोज आतून मारत राहील.
खरं तर माणूस मरायचं ठरवत नाही.
तो फक्त दुःखातून सुटका शोधत असतो.
त्याला कुणीतरी समजून घ्यावं, ऐकून घ्यावं, एवढीच गरज असते.
पण दुर्दैवाने आज माणसं बोलणं विसरत चालली आहेत.
मनात हजारो वादळं असतात, पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून जगत राहतात.
आणि मग एक दिवस ती शांतता जीवघेणी ठरते.
लक्षात ठेवा.
मनात दडवून ठेवलेल्या भावना नेहमीच घातक असतात.
रडायचं असेल तर रडा.
मन मोकळं करा.
विश्वासाच्या व्यक्तीशी बोला.
आईशी बोला, मित्राशी बोला, भावाशी बोला, कुणाशीही बोला… पण स्वतःला एकटं करू नका.
कारण प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सकाळ येतेच.
आज जे अशक्य वाटतंय, तेच उद्या कदाचित तुमच्या आयुष्याची ताकद बनेल.
आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, उद्या त्याच गोष्टीवर तुम्ही हसत असाल.
जीवन म्हणजे फक्त आनंद नाही.
जीवन म्हणजे संघर्ष, वेदना, अपयश, पुन्हा उभं राहणं आणि पुन्हा जगायला शिकणं.
जगणं म्हणजे पडूनही उठण्याची जिद्द.
कारण जिंकणारे लोक वेगळं काही करत नाहीत…
ते फक्त हार मानत नाहीत.
कधी कधी आपल्याला वाटतं की आपण संपलोय.
आपल्याकडे काहीच उरलेलं नाही.
पण खरं सांगायचं तर.
जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत संधी आहे.
देवाने दिलेलं हे जीवन खूप मौल्यवान आहे.
एका वाईट प्रसंगासाठी संपूर्ण आयुष्य संपवणं म्हणजे सुंदर पुस्तकाचं एकच पान फाटलं म्हणून पूर्ण पुस्तक जाळून टाकण्यासारखं आहे.
कितीतरी लोक आयुष्यात प्रचंड वेदना सहन करूनही हसत जगतात.
कुणाच्या शरीरात व्यंग असतं, कुणाकडे पैसा नसतो, कुणाला आधार नसतो. तरीही ते जगण्यावर प्रेम करतात.
कारण त्यांना माहिती असतं की आयुष्य सुंदर आहे.
दुःख कायम राहत नाही.
वेळ बदलतो.
परिस्थिती बदलते.
आणि एक दिवस आयुष्य पुन्हा हसायला शिकवतं.
मी स्वतः ८० टक्के दिव्यांग असूनही या जीवनावर प्रेम करू शकतो, तर तुम्ही का नाही?
तुमच्यात ताकद आहे.
तुमच्यात क्षमता आहे.
तुमचं अस्तित्व खूप मौल्यवान आहे.
कदाचित आज तुम्हाला स्वतःची किंमत जाणवत नसेल, पण कुणाच्या तरी आयुष्यात तुम्ही खूप महत्त्वाचे आहात.
एखाद्याचा नकार म्हणजे तुमचं आयुष्य संपलं नाही.
एखाद्याने सोडून दिलं म्हणून तुमचं अस्तित्व संपत नाही.
ज्यांना तुमची किंमत कळत नाही, त्यांच्यासाठी स्वतःला संपवणं ही सर्वात मोठी चूक आहे.
जगात प्रत्येक जखमेवर वेळ औषध बनून येतो.
फक्त थोडा संयम हवा असतो.
थोडा विश्वास हवा असतो.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं.
आज जर तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं आहे, तर एकदा शांतपणे स्वतःला विचारा
“मी खरंच जगणं सोडू इच्छितोय, की मला फक्त या दुःखातून बाहेर पडायचं आहे?”
उत्तर नक्की मिळेल.
कारण आत कुठेतरी जगण्याची इच्छा अजूनही जिवंत असते.
फक्त तिला आधाराची गरज असते.
आत्महत्या हा धैर्याचा मार्ग नाही.
खरं धैर्य म्हणजे संकटातही उभं राहणं.
डोळ्यात पाणी असतानाही पुढे चालत राहणं.
हजार वेळा तुटूनही पुन्हा स्वतःला सावरणं.
कारण जीवन हे एका अपयशाने संपत नाही.
म्हणून एक विनंती आहे.
जर कधी आत्महत्येचा विचार मनात आला, तर एकदा कुणाशी तरी बोला.
मदत मागायला कमीपणा वाटू देऊ नका.
तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे.
तुम्ही हरलात असं वाटत असलं तरी तुमची कहाणी अजून संपलेली नाही.
कधी कधी फक्त एक माणूस, एक संवाद, एक आधार..
पूर्ण आयुष्य बदलून टाकतो.
आणि लक्षात ठेवा.
“अंधार कायम राहत नाही.
सूर्याला उगवण्यासाठी फक्त थोडा वेळ लागतो.”
म्हणून जगा.
स्वतःसाठी जगा.
आपल्या माणसांसाठी जगा.
स्वप्नांसाठी जगा.
कारण तुमच्या जगण्यातच कुणाचं तरी जगणं दडलं आहे.
शेवटी एवढंच.
ज्याने स्वतःच्या जखमांवर स्वतःच फुंकर घालायला शिकले,
त्याला हरवण्याची ताकद नशिबातही उरत नाही.

©® सचिन कमल गणपतराव मुळे
ज.तु.स.प.जि.प्र.प्र.परभणी, ९७६७३२३३१५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा