मंगळवार, ३ मार्च, २०२६

2687. नसांच्या जागेचा आजार

 “डॉक्टर, पूर्वी मी एकटी १० माणसांचा स्वयंपाक न थकता करायची. पण आता १५ मिनिटं पोळ्या लाटायला उभं राहिलं, की कंबर आणि दोन्ही पाय असे भरून येतात, जणू त्यात १०० किलोचं ओझं बांधलंय. गॅस बंद करून ५ मिनिटं खाली बसावंच लागतं. बसलं की लगेच बरं वाटतं.”
माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पन्नाशी ओलांडलेल्या अनेक महिलांची हीच तक्रार असते.
त्यांना वाटतं, "वय झालंय, हाडांची ताकद कमी झालीये किंवा कॅल्शियम कमी पडतंय."
पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का?
जेव्हा त्या खाली बसतात किंवा पुढे वाकतात, तेव्हा दुखणं एका मिनिटात गायब होतं. जर हाडं कमजोर असती, तर बसल्यावरही ती दुखायलाच हवी होती ना?
इथेच खरं गुपित लपलंय. हा हाडांचा आजार नाहीये, हा ‘नसांच्या जागेचा’ आजार आहे.
मेडिकल सायन्समध्ये याला ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ (Lumbar Canal Stenosis) म्हणतात.
सोप्या भाषेत सांगायचं तर:
तुमच्या मणक्याच्या आतून एक मुख्य नस (Spinal Cord/Nerves) जाते. ज्या पाईपमधून ती जाते, तो पाईप वयानुसार आणि झिजेमुळे ‘अरुंद’ (Narrow) होतो.
जेव्हा तुम्ही ताठ उभे राहता किंवा चालता, तेव्हा तुमचा मणका थोडा मागे खेचला जातो. यामुळे तो अरुंद झालेला पाईप अजूनच बारीक होतो आणि आतल्या नसेचा 'गळा दाबला' जातो.
नसेला रक्तपुरवठा कमी होतो आणि तुमचे पाय जड पडतात, मुंग्या येतात किंवा भरून येतात. (याला Neurogenic Claudication म्हणतात).
आणि जेव्हा तुम्ही खाली बसता किंवा पुढे वाकता, तेव्हा मणक्याची जागा 'ओपन' होते, नसेचा श्वास मोकळा होतो आणि तुम्हाला लगेच बरं वाटतं!
(म्हणूनच असे लोक सुपरमार्केटमध्ये ट्रॉलीवर पुढे झुकून खूप वेळ चालू शकतात, पण ताठ चालता येत नाही.)
आयुर्वेदात याला 'अस्थि-मज्जा गत वात' म्हणतात. वाढलेला कोरडा वात मणक्याच्या पोकळीला (Srotas) अरुंद करतो.
अशा वेळी काय करू नये?
"मला चालायला जमत नाही, तरी मी जिद्दीने १ तास चालणारच" असा हट्ट करू नका. तुम्ही तुमच्या नसेला अजून डॅमेज करत आहात.
उपचार काय?
इथे पेनकिलर काम करत नाही, कारण प्रॉब्लेम जागेचा आहे.
आम्ही अशा रुग्णांना ‘क्षीर बस्ती’ (Ksheer Basti - औषधी दुधाची बस्ती) देतो. दूध आणि तूप मणक्याच्या आत जाऊन त्या सुकलेल्या नसांना ओलावा (Lubrication) आणि पोषण देतात. सोबत पुढे वाकण्याचे (Flexion) व्यायाम शिकवतो.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा:
"उभं राहिल्यावर येणारा थकवा हा स्नायूंचा असू शकतो, पण बसल्यावर जाणवणारा 'आराम' हा तुमच्या मणक्याची नस दाबली गेल्याचा पुरावा आहे."
तुमच्या घरात आईला किंवा आजीला असा त्रास होतो का?
पोळ्या करताना त्यांना मध्येच बसावं लागतं का?
आम्हाला सांगा किंवा त्यांना ही पोस्ट वाचायला द्या.

– डॉ. रुचिता पाटील
निर्भय आयुर्वेद आणि स्पाईन केअर क्लिनिक, पुणे.
(क्लिनिकल डायरीतून)
7709833886

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...