मंगळवार, ३ मार्च, २०२६

2609. षंढ कोण?

 ★ स्त्री अंडकोश शरीराच्या आत असल्याने ते दिसत नाही. याउलट पुरषांचे अंडकोश शरीराच्या बाहेर लटकत असल्याने सहज दिसतात. या रचनेमागे निसर्गाचा एक खूप मोठा जैविक आणि उत्क्रांतीवादी हेतू आहे. स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्थेतील हा फरक केवळ स्थानाचा नसून तो 'कार्याशी' संबंधित आहे. त्यामागील वैज्ञानिक कारणे खालीलप्रमाणे आहेत -
पुरुषांचे अंडकोश (Testicles) शरीराच्या बाहेर असण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे तापमान.. शुक्राणूंच्या (Sperm) निर्मितीसाठी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा (३७°C) २ ते ३ डिग्री सेल्सियस कमी तापमानाची गरज असते, म्हणजे साधारण ३४–३५°C. जर अंडकोष पोटातच राहिले असते, तर शरीरातील उष्णतेमुळे शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि हालचाल (motility) खूप कमी होऊन प्रजनन क्षमता प्रभावित झाली असती. याउलट, स्त्रियांचे अंडकोश (Ovaries) शरीराच्या आत, ओटीपोटात (Pelvic cavity) सुरक्षित असतात. स्त्री बीज (Eggs) हे जन्मापासूनच मर्यादित संख्येत असतात आणि ते अत्यंत मौल्यवान असतात. बाहेरच्या आघातांपासून, संसर्गापासून आणि तापमानातील बदलांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने त्यांची रचना शरीराच्या आत केली आहे. स्त्री बीजांना शुक्राणूंसारख्या थंड वातावरणाची गरज नसते; उलट त्यांना शरीरातील ऊब पोषक ठरते.
★ सुरुवातीच्या गर्भावस्थेत (Embryonic stage), स्त्री आणि पुरुष दोघांचेही जननेंद्रिय शरीराच्या आत एकाच ठिकाणी विकसित होत असतात. मात्र, जसजसा गर्भाचा विकास होतो, तसे मुलांमध्ये, अंडकोश ओटीपोटातून खाली सरकून वृषणकोशात (Scrotum) येतात. मुलींमध्ये मात्र ते शरीराच्या आतच राहतात आणि गर्भाशयाला जोडले जातात.
★ शरीराबाहेर असलेले पुरुष अंडकोश आणि शरीराच्या आत असलेले स्त्री अंडकोश हे केवळ अवयव नसून ते आपल्या मेंदूला सतत 'सिग्नल्स' देणारे कारखाने आहेत.
आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमस (Hypothalamus) हा मास्टर कंट्रोलर आहे. तो 'पिट्युटरी ग्लँड (Pituitary Gland) चे नियंत्रण करून तिथून रक्ताद्वारे संदेश अंडकोषांपर्यंत पोहोचवतो.. पुरुषांच्या शरीराबाहेर असलेल्या अंडकोषांना जेव्हा मेंदू आदेश देतो, तेव्हा 'टेस्टोस्टेरॉन'ची निर्मिती होते. हे संप्रेरक पुरुषांमधील आक्रमकता, स्नायूंची ताकद आणि 'धाडस' या गुणांशी संबंधित आहे.. टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप वाढली की माणसामध्ये 'मी म्हणेन तीच पूर्व' ही वृत्ती वाढते. याउलट स्त्रियांमध्ये शरीराच्या आत असलेल्या ओव्हरीजमधून 'इस्ट्रोजेन' आणि 'प्रोजेस्टेरॉन' स्रवतात. हे मेंदूतील 'इमोशनल प्रोसेसिंग' (Amgydala) भागावर अधिक प्रभाव टाकतात, ज्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता आणि संयम विकसित होतो.
★ पुरुषांचे अंडकोश अत्यंत संवेदनशील नसांनी (Nerves) वेढलेले असतात. यामुळे त्यावर थोडा जरी आघात झाला, तरी तो थेट पोटातील नसांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे मळमळणे किंवा चक्कर येणे असे प्रकार घडतात. तसेच 'Testicular Torsion' (अंडकोशाला पीळ पडणे) किंवा 'Hematoma' (रक्त साठणे) होऊ शकते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.
★ मानवी इतिहासात 'जननेंद्रिय निकामी करणे' (Castration) ही प्रक्रिया सत्ता, नियंत्रण आणि उपयुक्तता वाढवण्यासाठी वापरली गेली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला 'कॅस्ट्रेशन' (Castration) म्हणतात. याचे परिणाम पुरुष आणि प्राणी (बैल) यांच्यावर कसे होतात, ते पाहूया -
बैलांचे 'खच्चीकरण' (Castration of Bulls)
शेतीमध्ये बैलांना 'वळू' न ठेवता त्यांचे खच्चीकरण केले जाते. यामागे निव्वळ तांत्रिक आणि स्वार्थी कारणे असतात.. वळू (Uncastrated Bull) हा मूलतः अत्यंत आक्रमक आणि अनियंत्रित असतो. खच्चीकरण केल्यामुळे त्याच्या शरीरातील 'टेस्टोस्टेरॉन' हे संप्रेरक कमी होते, ज्यामुळे तो शांत होतो आणि माणसाचे ऐकू लागतो. साहजिकच खच्चीकरण केलेला बैल हा शेतात नांगरणीसाठी किंवा ओझी वाहण्यासाठी अधिक सोयीचा ठरतो, कारण त्याचे लक्ष विचलित होत नाही. तसेच खच्चीकरणामुळे बैलाच्या खांद्यावरची 'कॅंध' (Hump) चांगली भरते, जे जू धरण्यासाठी सोपे जाते.
इतिहास आणि काही विशिष्ट परंपरांमध्ये (उदा. मुघल काळातील हरमचे रक्षक किंवा काही पंथ) पुरुषांचे खच्चीकरण केले जात असे. त्यांना 'नपुंसक' किंवा 'खोजी' (Eunuch) म्हटले जाई. जर ही प्रक्रिया तारुण्यापूर्वी केली गेली असेल, तर त्या पुरुषाचा आवाज घोगरा होत नाही, दाढी-मिशा येत नाहीत आणि त्याची शरीरयष्टी एका विशिष्ट प्रकारे (स्त्रीसदृश) बदलू लागते.
मानसशास्त्रीयदृष्ट्या टेस्टोस्टेरॉनच्या अभावामुळे त्यांच्यातील आक्रमकता आणि लैंगिक इच्छा संपते, ज्यामुळे त्यांचा वापर 'विश्वासू सेवक' किंवा 'रक्षक' म्हणून केला जात असे... इतिहासात हरममध्ये किंवा राजवाड्यात 'हिजडा' सेवकांना महत्त्व असण्याचे कारण हेच होते की, त्यांना स्वतःचे कुटुंब नसते आणि स्वतःची प्रजनन शक्ती नसते. साहजिकच जेव्हा माणसाची स्वतःची ओळख पुसली जाते, तेव्हा तो अस्तित्वासाठी पूर्णपणे त्याच्या 'मालकावर' अवलंबून राहतो. त्यात खच्चीकरणाची प्रक्रिया ही अत्यंत वेदनादायी आणि क्रूर असते. समाजात जेव्हा एखादे जबरदस्तीचे उदाहरण समोर येते, तेव्हा इतर लोक सुध्दा दहशतीखाली जगतात.
★ खच्चीकरण केलेला बैल जसा नांगराला निमूटपणे जुंपला जातो, दुर्दैवाने त्याचप्रमाणे आपल्या बहुतांश समाजाचे राजकारणामुळे वैचारिक खच्चीकरण झाले आहे.. शारीरिक 'कॅस्ट्रेशन' मध्ये महत्त्वाची ग्रंथी कापली जाते. अन् सामाजिक खच्चीकरणामध्ये माणसाचा 'प्री-फ्रंटल कॉर्टेक्स' (Pre- frontal Cortex) निष्प्रभ केला जातो, इतकेच! हा मेंदूचा तो भाग आहे, जो तर्क करतो आणि निर्णय घेतो. असा समाज आपली विचार करण्याची, सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची 'प्रजनन क्षमता' (Virility) गमावतो, त्यामुळे त्याला बौध्दिकदृष्ट्या नपुंसक म्हटले जाते.. मानसशास्त्रात याला  'Learned Helplessness' (शिकलेली असाहय्यता) म्हणतात. ही संकल्पना मानसशास्त्रज्ञ 'मार्टिन सेलिग्मन' यांनी मांडली होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला वारंवार हे जाणवून दिले जाते की, तुमच्या कृतीने काहीही बदलणार नाही, तेव्हा त्यांचा मेंदू 'प्रयत्न करणे' सोडून देतो. यामुळे त्यांच्या मेंदूतील 'अमिग्डाला' (Amygdala) इतका सक्रिय होतो की, त्यांची विचार करण्याची शक्ती पूर्णतः गोठून जाते. यास्तव 'षंढ समाज' हा केवळ शिवी किंवा अपमान नाही तर ती एका मृतप्राय होत चाललेल्या समाजाची अवस्था आहे. 
षंढ समाजाची लक्षणे - समोर अन्याय होत असूनही "मला काय त्याचे?" ही वृत्ती असणे, कृती करण्याची ताकद नसल्यामुळे हा समाज केवळ शब्दांचा खेळ (वाचाळपणा) करतो, प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे धाडस दाखवत नाही, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तो नेहमी एका प्रभावशाली' नेत्यावर अवलंबून असतो. यामुळे त्या नेत्याच्या का केली तर, षंढांना ती आपल्यावर, आपल्या आ केल्याचे वाटते.
थोडक्यात षंढ व्हायचे नसेल तर स्वतः चे विचार असणे आणि स्व संरक्षण करण्यासाठी कोणा बड्या नेत्याचे (दुसऱ्याचे)नाव न घेता स्वतः सामोरे जावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...