मंगळवार, ३ मार्च, २०२६

2633. म्हाताऱ्याची फजीती

 "रिटायर्ड झालो म्हणजे मी म्हातारा झालो की काय?"  🤔
म्हणजे काय झालं बघा... 
आज मंडईत भाजीला गेलो. भाजी घेऊन बाहेर पडलो आणि खिसा चाचपला, छातीत धस्स झालं ! एक्टिव्हाची चावी खिशात नाही ना ! लगेच परत मंडईत शिरलो. जिथं-जिथं गेलो होतो, परत त्या सगळ्या दुकानांत, टोमॅटोंच्या ढिगात, बटाट्यांच्या पोत्यात,  सगळी कडे शोधलं… हाती काहीच नाही लागलं .
एकदम मनात वीज चमकली … "अरे ही चावी एक्टिव्हाच्या इग्निशनमध्येच राहून गेली असेल ! आणि दुसऱ्यानं सुरू करून नेली तर?"
धावत-धावत पार्किंगकडे गेलो… तर खरंच ! एक्टिव्हाची सावलीसुद्धा जागेवर नव्हती !
पोलिसांना फोन लावला. "साहेब, माझी एक्टिव्हा… मॉडेल… नंबर…" सगळं सांगितलं. आणि कबुलीही दिली, 
"हो, साहेब, चावी गाडीलाच विसरलो. माझ्या विसरभोळेपणा मुळे ही चोरी झाली."
पोलिस म्हणाले, "घाबरू नका, शोधून देऊ."
मग केलं  सगळ्यात मोठे कठीण काम.  म्हणजे बायकोला फोन. सांगताना माझा आवाज कापरा आणि अंग थरथरत होते.
दुसऱ्या बाजूला काही सेकंद एकदम शांतता… आणि मग  मोठा भडका !
"अरे देवा ! तू तर पूर्ण वेडा झालास ! अरे मीच तुला एक्टिव्हावरूनच  मंडईत सोडलं ! आणि ब्युटीपार्लरला गेले !  पार सगळं  विसरलास?????
मी म्हटलं, "अगं, आता बडबड नको... गाडी चोरीला गेली नाही. हे एक बरं झालं.  चल, आता येऊन मला इथून घेऊन जा."
ती परत भडकली ! "तू कसल्या काय भानगडी करतो  रे ! आता मी पोलिस ठाण्यात बसलेय ! त्या पोलिसांनी मला एक्टिव्हा चोरल्याबद्दल अटक केलीय ! तू लगेच इकडे येऊन सांग की ही तुझी बायको आहे, हिने चोरी केलेली 
नाही !"
मग काय गुपचुप ठाणं गाठलं, पोलिसांची माफी मागून  समजावलं. बायकोची सोडवणूक केली अन् सोबत घरी गेलो.
हम्म आताशा या वयात असे अनुभव यायचेच. 
तुमचं कस काय बाबांनो,  
म्हातारपणात अशी "मजा" येतेच ! 
तुमच्याकडेही असेल असच काही गम्मतीचं, 
तर मग कळवा ! आपली ख्याली खुशाली
हसा हसवा… मजेत जगा 😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...