मंगळवार, ३ मार्च, २०२६

2671. ती 'आत्महत्या' नव्हती

 ती 'आत्महत्या' नव्हती...तो तुमच्या-आमच्या घरातल्या 'मोबाईल'ने केलेला 'मर्डर' होता ! 🩸
🛑
धप्प... धप्प... धप्प ! 
रात्रीचे २:३० वाजले होते.
गाझियाबादच्या एका सोसायटीतल्या ९ व्या मजल्यावरून तीन कोवळे देह खाली कोसळले.
आणि त्यानंतर...सगळं संपलं. खाली रक्ताचा सडा आणि वर फक्त एक भयानक, जीवघेणी शांतता.
त्या रिकाम्या झालेल्या घरातल्या बेडवर आता फक्त तीन बाहुल्या पडल्या आहेत... पण त्या बाहुल्यांशी खेळणाऱ्या त्या १६, १४ आणि १२ वर्षांच्या चिमुरड्या हातांनी मात्र कायमची exit घेतली.
त्यांनी का जीव दिला?
गरिबीमुळे? नाही.
त्रास होता म्हणून? नाही.
त्यांना मारलं तुमच्या-आमच्या घरातल्या एका लाडक्या 'पाहुण्याने'... ज्याचं नाव आहे 'मोबाईल'! 📱💀
टीव्ही ९ मराठीची बातमी वाचली आणि डोकं सुन्न झालं.
पोलिसांनी जे सांगितलंय, ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल.
त्या मुली 'व्हर्च्युअल गेम' च्या जाळ्यात अशा अडकल्या होत्या की, त्यांना वास्तवातले रक्ताचे आई-बाबा 'दुश्मन' वाटू लागले होते.
पालकांनो, हा फक्त 'गेम' नाही, हा 'डिजिटल मर्डर' आहे! 🩸
तुम्हाला वाटतंय, "माझं पोरगं हा गेम खेळत नाही, मी सेफ आहे"?
गैरसमज काढून टाका डोक्यातून!
हा गेम तर फक्त एक निमित्त आहे.
तुमच्या मुलाच्या हातातला 'इन्स्टा रील्स', 'स्नॅपचॅट' आणि 'फ्री फायर' हे सुद्धा त्यापेक्षा कमी नाहीत.
तुमच्या घरातली मुलं 'जिवंत' आहेत की 'झोम्बी' झालीत? बघा हे ३ सीन ओळखीचे वाटतात का: 👇

🔥 १. "आई, तू गप्प बस ना!" (लाज वाटणे):
जरा बघा मुलांकडे...
तुमच्या मुलाला आता आईच्या हातचं साधं 'वरण-भात' किंवा 'पोळी-भाजी' नकोशी वाटते... आणि बाहेरचं 'पिझ्झा-बर्गर' किंवा 'चायनीज' भारी वाटतं?
त्याला सणावाराला भारतीय कपडे घालायची किंवा तुमच्यासोबत बाहेर यायची लाज वाटते?
सावधान! ते मुलं शरीराने तुमच्या घरात आहे, पण मनाने 'परदेशात' गुलाम झालंय. त्याला स्वतःच्या रक्ताचाच तिरस्कार वाटू लागलाय.

🔥 २. डोळ्यात जीव नाही (The Zombie Stare):
तुम्ही मुलाला हाक मारता... एकदा, दोनदा, तीनदा.
पण ते मान वर करत नाही. त्याचे डोळे स्क्रीनवर असे चिकटलेले असतात की जगात काय चाललंय याचं भान नसतं.
ते बाळ तुमच्यासमोर बसलंय, पण ते तिथे नाहीच आहे!
त्याची नजर जिवंत माणसासारखी नाही, तर एखाद्या 'झोम्बी' सारखी झालीय.
हे बघून तुमचं काळीज तुटत नाही का?

🔥 ३. जेवणाचं टेबल की 'स्मशान शांतता'?
घरातला हा सीन बघा, डोळ्यात पाणी येईल:
ताटात जेवण वाढलेलं आहे. पण जोपर्यंत आई युट्यूबवर व्हिडिओ लावून मोबाईल हातात देत नाही, तोपर्यंत पोरगं अन्नाचा घासही गिळत नाही.
आई आपल्या जगात, पोरगं मोबाईलच्या जगात.
एकाच छताखाली राहून आपण एकमेकांसाठी 'अदृश्य' झालोय.
घरात वाय-फाय फुल्ल आहे, पण संवाद 'झिरो' आहे.
जबाबदार कोण?
त्या तीन निष्पाप मुली? अजिबात नाही.
जबाबदार आपण आहोत! 🫵
आपण आपल्या कष्टाचा स्मार्ट फोन त्यांच्या हातात दिला, पण बोलायला ५ मिनिटं वेळ दिला नाही.
आपण त्यांना 'अनलिमिटेड डेटा' दिला, पण संस्कार मात्र 'लिमिटेड' दिले.
आपणच आपल्या हाताने त्यांच्या बालपणाचा 'सौदा' केलाय.
उद्याची बातमी आपल्या शहरातली नको असेल तर... ⏳

✅ जेवताना स्क्रीन बंद: नियम म्हणजे नियम. अन्नाचा मान राखा, नात्याचा मान राखा. घास भरवताना आईचा स्पर्श हवा, स्क्रीन नको.
✅ मातीशी जोडा: त्यांना सांगा की इन्स्टावरचं जग खोटं आहे. मैदानातला घाम आणि घरातली माणसं खरी आहेत.
✅ मित्र बना: मुलांच्या जगात 'पोलीस' म्हणून नाही, तर 'मित्र' म्हणून शिरकाव करा. "तुला यात काय आवडतं? मला पण शिकव," हे प्रेमाने विचारा.
गाझियाबादच्या त्या तीन चिमुकल्या जीवांनी स्वतःचा बळी देऊन आपल्याला एक धडा दिलाय.
आज रात्री एक गोष्ट नक्की करा: 🌙
जेव्हा तुमची मुलं गाढ झोपली असतील, तेव्हा त्यांच्या खोलीत जा.
त्यांच्या कपाळावर हळूच हात ठेवा आणि बघा...
हे तेच डोकं आहे का ज्याला आपण मांडीवर घेऊन थोपटायचो? की हे डोकं आता कोण्या 'गेम' ने हायजॅक केलंय?
त्यांना जवळ घ्या. त्यांना तुमची गरज आहे... मोबाईलची नाही.

वेळ जाण्याआधी सावध व्हा.
📌 ही पोस्ट आताच Save (Collection) मध्ये टाकून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांचं मोबाईलचं वेड हाताबाहेर जातंय, तेव्हा हे पुन्हा वाचा. तुम्हाला 'नाही' म्हणायची ताकद मिळेल.
📢 एक कळकळीची विनंती: ही पोस्ट फक्त वाचू नका. तुमच्या वॉलवर फॉरवर्ड करा किंवा तुमच्या जोडीदाराला (नवरा/बायको) खाली टॅग करा. एका शेअरमुळे एखाद्या घरातला हरवलेला संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो.
(संदर्भ: टीव्ही ९ मराठी वृत्त - ४ फेब्रु. २०२६)

🩺  डॉ. सुजित भरत पाटील 
तुमच्या मुलांचा डॉक्टर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...