मंगळवार, ३ मार्च, २०२६

2663. कोणीतरी आपलं असणं

 ती ४२ वर्षांची होती. आयुष्यात बरंच काही अनुभवलं होतं. लग्न, संसार, जबाबदाऱ्या, अपेक्षा… आणि हळूहळू मनात साचलेली शांत वेदना. नवरा कामानिमित्त कायम बाहेर असायचा. मुलं होस्टेलला. घर मोठं होतं, पण मन रिकामं.
तो ४५ चा होता. पत्नी वेगळी राहत होती. घटस्फोट झाला नव्हता, पण नातं संपल्यासारखंच होतं. मुलगी परदेशात. तो एकटाच राहत होता. बोलायला कोणी नव्हतं. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर टीव्ही सुरू करून बसायचा… पण आवाज असूनही घर शांतच वाटायचं.
ओळख झाली सोसायटीच्या लिफ्टमध्ये.
पहिल्यांदा फक्त नजरानजर.मग हळूच “नमस्कार”.
कधी लाईट गेल्यावर जिन्यात भेट.
कधी पावसात छत्री शेअर करत खाली येणं.
दोघेही जखमी होते, म्हणून फार बोलत नव्हते. पण एकमेकांच्या शांततेत स्वतःचा आवाज ऐकू येत होता.
हळूहळू ओळख वाढली.
ती सकाळी फिरायला जाताना त्याला दिसायची.
तो संध्याकाळी चहा पिताना तिला हाक मारायचा.
एक दिवस तिने सहज विचारलं,“तुम्ही एकटेच राहता का?”
तो थोडा थांबून म्हणाला,“हो… सवय झालीय.”
त्या दिवसापासून संभाषण सुरू झालं.
ती कधी जास्त भाजी केली की त्याला डबा द्यायची.
तो तिच्या मोबाईलचं नेटवर्क प्रॉब्लेम असलं की पाहायचा.
ती आजारी असली की तो औषध आणून द्यायचा.
तो उशिरा आला की ती विचारायची, “पोहोचलात ना?”
कोणी प्रेम व्यक्त केलं नाही.कोणी प्रपोज केलं नाही.
पण एकमेकांची काळजी घेतली जात होती.
या वयात प्रेम वेगळंच असतं.इथे स्वप्न नसतात.
इथे अपेक्षा कमी असतात.इथे फक्त सोबत असण्याची गरज असते.एकदा ती म्हणाली,
“मला कधी वाटलं नव्हतं की या वयात कोणाशी इतकं बोलावंसं वाटेल.”तो हसून म्हणाला,
“मलाही नाही… पण तुमच्याशी बोलल्यावर मन हलकं होतं.”
दोघांच्याही आयुष्यात अडचणी होत्या.ती संसार सोडू शकत नव्हती.तो आपल्या मुलीचा विचार करत होता.
म्हणून हे प्रेम मर्यादेत होतं.ते एकत्र फिरायला गेले नाहीत.
हातात हात घेऊन चालले नाहीत.फोटो काढले नाहीत.
पण रात्री उशिरा फोनवर बोलून झोपायचं,
सकाळी “आज काळजी घे” असा मेसेज पाठवायचा,
हे सगळं होतं.एक दिवस ती खूप आजारी पडली.
तो हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ बसून होता.तिचा हात धरून म्हणाला,“तू बरी हो… बाकी काही नको.”
तिने डोळे उघडून हळूच म्हटलं,“तुम्ही आहात… एवढंच पुरे.”
त्या क्षणी दोघांनाही कळलं हे प्रेम आहे.पण त्यांनी नाव दिलं नाही.समाज काय म्हणेल,मुलांना कसं सांगायचं,
भविष्याचं काय या सगळ्यामुळे ते वेगळे राहिले.
आजही ते वेगवेगळ्या घरात राहतात.पण रोज बोलतात.
एकमेकांची चौकशी करतात.गरज पडली की धावून जातात.
हे प्रेम तरुणांसारखं नव्हतं.हे प्रेम शांत होतं.समजूतदार होतं.
त्यागाने भरलेलं होतं.चाळीशीत उमललेलं प्रेम म्हणजे
देहाची ओढ नाही…मनाची सोबत असते.आणि कधी कधी,
एकत्र न राहता सुद्धाकोणीतरी आपलं असणं 
हेच खरं प्रेम असतं. 🤍

✍️ माणिक उचित, नाशिक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...