मंगळवार, ३ मार्च, २०२६

2635. अनुबंध

    अवेळी दारावरची बेल वाजली म्हणून छोट्या पियुला मांडीवरून खाली तसच रडत ठेवत वैजुताई दार उघडायला उठल्या. उठताना गुडघ्यातून येणाऱ्या कडकड आवाजाने आई आई गं , देवा.. कसं व्हायचं रे? म्हणत हॉल मध्ये आल्या आणि दार उघडलं. 
दार उघडताच "आई" म्हणून प्रियाने वैजू ताईंना हाक मारली तेव्हा क्षणभर "नमिता" परत आली की काय असाच भास झाला त्यांना! आणि भानावर येत  म्हणाल्या नमुची मैत्रीण ना ग तू ? ती रेडिओवर बोलणारी? आपलं फक्त फोनवर बोलणं झालं होतं ना ? नमु मात्र रोज तुझ्याबद्दल भरभरून बोलायची! या या आत या. 
बसा.
थांबा  हं , याला आधी शांत करतेss , जssरा खाली ठेवलेलं चालत नाही. 
हो आई " मी प्रिया"… आणि हा अमित माझा नवरा.आण  माझ्याकडे मी शांत करते त्याला. वैजुतांईंच्या मागे जात प्रिया म्हणाली. 
प्रियाने छोट्या पियुषला छातीशी कवटाळून घेतलं आणि तो अगदी शांत झाला. 
"कसा लबाड आहे बघ! सारखं याला घ्या कोणीतरी.
काय करणार तो इवलासा जीव तरी? आईच्या उबेची उणीव कळत असणार त्याला. निष्पाप लेकरू काय नशीब घेऊन आलं बिचारं! आणि थकलेल्या वयात देवांनी हे दाखवायचं होतं का मला? 
बरं तू आजच घेऊन जाणार का याला? मला आधी कल्पना असती तर.. तयारी करून ठेवली असती त्याचे कपडे , औषधं , खेळणी… 
बरं तुम्ही थांबाल ना थोडा वेळ? मी करते तयारी. 
माझ्या तब्बेतीनं साथ द्यायला हवी गं नाहीतर मी हे लेकरू असं कोणाकडे दिल असतं का?" 
आई… काही घाई नाहीये , चल मी मदत करते. 
कुठाय बॅग? 
त्या बघ तिथे कापटवर. 
प्रियाने दोन बॅगा खाली काढल्या. 
"आगं एक बॅग होईल पुरेशी मला वाटतं आणि ही खेळण्यांची दुसरी बॅग आहेच . ती दुसरी बॅग ठेऊन दे वर" 
आई… ही बॅग पियूची झाली भरून आणि ही तुझी आता तुझं काय काय घ्यायचंय? ते दे 
तुही येतीयस आमच्याबरोबर !! 
प्रियाला दवाखान्यात असताना तिच्या शेवटच्या दिवसांत मी वचन दिलं होतं पियुला दत्तक घेण्याचं ते मी पूर्ण करणारच आहे. हे पेपर्स ही तयार झाले आहेत पण त्याच्याबरोबर अजूनही काही पेपर्स आहेत हे वाच. 
प्रियाच्या हातातले ते पेपर्स घेऊन वैजुताई ते वाचू लागल्या आणि त्यांचे डोळे घळाघळा वाहू लागले. 
आई मी आणि अमित अनाथ आश्रमात वाढलो 
आई वडील ,बहीण भाऊ असं भरलं घर कधी अनुभवलंच नाही आम्ही. मूल दत्तकच घ्यायचं हे आमचं ठरलेलंच होतं. 
नामिताच्या आजारपणात रेडिओच्या माध्यमातून आमची मैत्री झाली आणि ती कधी इतकी घट्ट झाली कळलंच नाही. कुठलीशी ओढ रोज हॉस्पिटल मध्ये तिला भेटायला मला घेऊन येत होती. सिंगल पेरेंट होण्याचा धाडसी निर्णय घेतला तिने. याचंच खूप कौतुक वाटत होतं मला पण नियतीचे डावपेच अजब आहेत ना ! तिलाच आजारपणाने ग्रासलं ! आणि या वयात तुला हे पाहायला लागतंय !  
पण आपण या नियतीला हार मानायला लावू !!
मी पियू बरोबर तुलाही दत्तक घेतीय. तू अशी या वयात एकटी राहिलेली, कोणाच्या आधाराशिवाय !
नमुला काय वाटेल गं? म्हणूनच न राहवून मी निर्णय घेतला आणि लगेचच तुझ्याकडे  आले !
तुला वाटलंच असेल ना हे असे  कसे आले भलत्या वेळेला??
नाही गं पोरी.. उलट आजकाल दाराची बेल वाजली की बरं वटतं !  
आईsss तू तुझ्या नमु सारखीच माझ्यावरही करशील ना माया !! वैजुताईंच्या कुशीत शिरत प्रियाने त्यांना विचारलं.
आणि माझ्यावर? म्हणत अमितही त्या दोघींच्या जवळ आला.   
 कडेवर घेतलेल्या पियुसह प्रियाला आणि अमितला जवळ घेत वैजुताई म्हणाल्या "देव इतका पण वाईट नाहीये हं! आज खात्री पटली. माझी लेक नेली त्यानं पण दोन दोन मुलांचं सुख पदरात घातलं बरं!!"

©अपर्णा…(ADP)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...