"बाबा , तुम्ही सांगितलं होतं ते तुमचं बँकेचं पासबुक update करुन आणलय हो...! "
रोहित चे बाबा नुकतेच महिन्याभरापुर्वी रिटायर झाले होते , आधी खरतर वाट पहात होते कधी एकदा रिटायर होतो ह्याची पण महिन्याभरातच घरात राहून कंटाळले होते ..!
रोहित ची आई टिव्ही समोर मटार सोलत बसली होती , तिथेच समोर बसून ते पण तिला सोलून द्यायला मदत करत होते ..!
रोहित आला तसा जरा upset दिसत होता..!
" बाबा तुमच्या अकाऊंट मधे एवढेच पैसे कसे हो.? तेवीस लाख फक्त...? "
आज कॉलेज मधे त्याने वरच्या खिशात ठेवलेलं पासबुक एका मित्राने उघडून बघितलं पण त्यावर काहीच कॉमेंट न करता पुन्हा हळूच खिशात ठेऊन दिलं त्यांचं त्याला वाईट वाटलं , त्याच्या ग्रुप मधले सगळे पैसेवाले आहेत ह्याची कल्पना होती त्याला..!
"इतकी वर्ष रोज ऑफीस मधे आठ तास घालवून शेवटी एवढीच शिल्लक कशी काय हो तुमची बाबा..? माझ्या एका मित्राने वर्षभरात घरबसल्या तीस लाख कमावले आहेत शेयर मार्केट मधे invest करुन "
रोहित च्या आईला ते ऐकवलं नाही , मान वर करुन तिने बाबांकडे पाहिलं त्यांना काय वाटलं असेल असा विचार आला तिला पण बाबा शांत होते , नजर खालीच होती त्यांची , रोहित च्या बोलण्याने बाबा नक्कीच मनात कुठेतरी दुखावले आहेत हे जाणवलं तिला , थोड्याच वेळात ते काही न बोलता उठून बेडरूम मधे निघून गेले .!
रोहित कडे थोडं रागानेच बघत ती पण स्वतः ला control करत होती , बाबांनी आजवर किती काय आणि कसं केलं ज्याची रोहितला कल्पना नव्हती ती आज काहीही झालं तरी त्याला द्यावी म्हणुन तिने खुणेनेच त्याला जवळ येऊन बसायला सांगितलं ...
"तुझे बाबा कसं आयुष्य काढत आले आहेत हे तुला माहित नाही रोहित, आज तुझ बोलणं ऐकून मला तुला सगळं सांगावच लागेल, ऐकशील का शांतपणे?
पावसाचे दिवस होते ते, तुझ्या वेळी मी दवाखान्यात admit होते. एक दिवस बाबा घरुन माझ्यासाठी डबा घेऊन येत असताना रस्त्यात त्यांची स्कूटर स्किड झाली, मोठा accident झाला, तुझा जन्म झाला तेव्हा ते बेशुद्धच होते , उपचारा दरम्यान काय झालं कुणास ठाऊक अचानक त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत म्हणाले डॉक्टर , transplant साठी किडनी मॅच होऊ शकणारे आवश्यक डोनर कोणी मिळेनात. आजतागायत कोणी मिळाला नाही, आठवड्यातून दोनदा स्वतः च जाऊन ते डायलिसिस करून येतात. अशक्त झाले आहेत तेव्हापासून , ऑफीसच काम करून थकून येतात. अशा परिस्थितीतही तुला बेस्ट स्विमर, एक उत्तम बॅडमिंटनपटू, गिटारिस्ट शिवाय अभ्यासात हुशार त्यांनीच वेगवेगळ्या कोच, टीचर्सकडे नेऊन नेऊन बनवलं आहे. तुला त्यांच्या तब्येती बद्दल काही कळायला नको असं त्यांनीच मला बजावलं होतं , त्याच्या करियर मधे बाधा यायला नको म्हणायचे...!
वर्षाचा बारा पंधरा लाख त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्च , तुझ्या शिक्षणाचा तसच इतर गोष्टींचा खर्च, कशी शिल्लक उरणार तूच सांग , घर चालवणं सोपी गोष्ट नसते रे बाळा, आयुष्य सगळं त्यात खर्च होतं तेव्हा कुठे पुढे सुखाचे दिवस येतात.
काय कमी केलं त्यांनी तुझ्यासाठी ह्याचा कधी विचार केला आहेस..? तू कशात मागे रहायला नको म्हणून स्वतः चा विचार न करता सगळया गोष्टींत तुला सर्वोत्तम करायचा प्रयत्न केलाय..!
त्यांना नाही वाटत उरलेलं आयष्य सुखात काढावसं..? स्वतः च्या खुशी साठी काय केलं त्यांनी आजपर्यंत..? ऑफीस घर ऑफिस घर एवढंच करत आले आजपर्यंत ..! आराम करायचं वय पण रिटायर झाल्यावरही घरी स्वस्थ बसवेना त्यांना..!
सतत तूच डोळ्यासमोर , रोहित ला हे करु ते करु, दुसरं काही ध्येयच नाही त्यांचं, आपल्याला किडन्या नाहीत हे तर ते सोयीस्कर पणे विसरले आहेत असं वाटतं कधी कधी...."
रोहितने मान वळवली अन् काही न बोलता उठून आपल्या रूम मधे निघून गेला. बहुतेक डोळ्यातले अश्रू आईला दिसू द्यायचे नव्हते त्याला..!
**********
पुढच्याच आठवड्यात रोहित मित्रांसोबत कॉलेजच्या दहा दिवसांच्या excursion trip ला गेला असतांना एक दिवस हॉस्पिटल मधून बाबांना फोन आला , एक किडनी डोनर मॅच होतो आहे, transplant करुन घेणार असाल तर लगेच admit व्हावे लागेल ..!
अचानक कसं काय admit होणार , त्यात रोहितही नेमका नाही हाताशी असा त्यांचा विचार सुरु होता पण हा डोनर पुन्हा हातचा जायला नको म्हणून ते शेवटी त्याचं रात्री होऊन गेले admit ..!
दुसऱ्याच दिवशी Operation झालं , छान झालं , यशस्वी झालं म्हणाले डॉक्टर, आठ दिवस झाले, आज डिस्चार्ज मिळणार होता , जायच्या आधी बाबांना डोनर ला भेटायची इच्छा होती पण हे फर्स्ट फ्लोअर वर होते अन् तो डोनर चोविसाव्या फ्लोअर वर आहे असं कळलं. त्याला पण आजच discharge मिळणार होता. बाबांच्या आग्रहा वरुन सिस्टर wheel chair वरुन बाबांना लिफ्ट मधून वर घेऊन जायला तयार झाली होती , आई होतीच सोबत ..!
"तुमचा डोनर वेगळाच आहे की हो दादा , ही डोनर लोकं करोडो घेतात बघा किडनी द्यायचे पण आश्चर्य म्हणजे तुमच्या डोनरला एक पैसा नको होता.
त्याच्या ऑपरेशन वर होणारा सगळा खर्च देखिल त्याच्या मित्रांनी भागवला, पहिल्यांदा बघितलं बघा असं...!
एवढा खुश आहे तो आणि त्याचे मित्र तुमचं ऑपरेशन छान झालं समजल्या पासून, पेढे वाटले आम्हाला सगळयांना . " लिफ्ट मधून वर जाता जाता सिस्टर बोलत होती..!
चोविसाव्या फ्लोअर वर समोरच डोनर ची रुम होती, VIP room मधे होता तो, बेड भोवती मित्र असल्याने तो दिसत नव्हता. एव्हाना आई च्या लक्षात आलं होतं डोनर कोण होता ते , डोळ्यातून already अश्रू वाहू लागले होते तिच्या ..!
धक्का बाबांना बसला रोहित ला बेड वर बघून , त्यांना भरून आलं लेकराला बघून.
"अरे बाळा हे सगळं करायच्या आधी सांगायचं तरी ना.."
"तुम्ही तरी इतकी वर्षे कुठे सांगितलं बाबा."
दोघेही एकमेकांना बिलगले होते, डोळे अश्रू गाळत होते.
आई दुरुन समाधानाने बघत होती , मित्र स्तब्ध होते...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा