शनिवार, २५ जुलै, २०२६

3068. हेही नसे थोडके

  केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते? 😳
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते? 😳 
 केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊
 
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते?
याची चोरी मात्र होते.
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 
काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ??😳

कधी शेतक-याला   बियाणं दान देऊन बघ.😊
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ. ... 😊
कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊
कधी एखाद्या उपाश्याला घ‍ास भरवून बघ.. .😊
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ ...😊
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ.. .😊
कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघ....😊
कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघ...😊
एकदा  दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !!😊
जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ...😇
पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇
सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत...😇
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇
शाळेचे छत गळके आणि 
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳
शाळेत मुलांना बसायला साधीफरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी ?😳
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशीही करत नाही...😔
आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳
पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला फूटपाथवर...😔
म्हणे आमचा देश कृषी प्रधान!!
आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔
शेकडो मैल चालतो वारकरी...😳
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मंत्री..! 😊
वाचा, विचार करा आणि पटल तरच पुढे पाठवा....!!

🙏 शुभस्य शीघ्रम्🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...