शनिवार, २५ जुलै, २०२६

3059. ‼️ बाप म्हणजे घरातील विठोबा ‼️

 || विठोबा गाभाऱ्यात उभा असतो. 
|| शांत, काळजीत, भक्तांच्या ओढीने भरलेला.

|| बाप घराच्या दारात उभा असतो.
|| शांत, काळजीत, आपल्या पोरांच्या भविष्याने भरलेला.

|| विठोबाला हजारो लोक 'पंढरी'ला शोधायला जातात,
|| पण आपल्या घरात, आपल्याच सावलीत,
|| एक 'न बोलणारा विठोबा' वर्षानुवर्षं 
|| आपल्यासाठी उभा असतो. 

|| बाप देव नाही. 
|| पण देवासारखं काहीतरी त्याच्यात नक्कीच असतं. 

|| तोही, 
|| नाम नाही घेत, पण कर्तव्य मात्र जपतो.

|| तोही, 
|| हात जोडून मागत नाही, 
|| पण स्वतःचं सारं काही देतो. 

|| तोही, 
|| वारी करत नाही, 
|| पण रोजची धावपळ हेच त्याचं तीर्थ. 

|| घरात शांत बसलेला बाप,
|| काहीच न बोलता,
|| प्रत्येकाच्या गरजांवर लक्ष ठेवतो.

|| म्हणून वाटतं —
|| ‘हा माणूस नाही. 
|| घरातला विठोबाच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...