बुधवार, २ जुलै, २०२५

2033. क्रूर चेष्टा

 आधीच दुष्काळी भाग, त्यात आठरा विश्व दारिद्र्य. नवरा चोवीस तास नशेत. पोटी तीन अपत्य असणारी ती माता. तीन मध्ये मोठया दोन मुली आणि लहान मुलगा. लोकांच्या शेतात 150 रुपये रोजंदारी वर काम करून ती एकटी संसाराचा गाढा ओढते. दारुडा नवरा म्हणजे असून नसल्यासारखा. डोंगर कपारीत फक्त दीड एकर शेती. त्या शेतात वर्षात 4/5 हजाराचा कापूस येतो. कापसाचे आलेले पैसे नवऱ्याला दारूला पुरत नाहीत.
      सविता नाव तिचं. आल्या दिवसाला पाठ देत जीवन जगत होती. तिच्या आयुष्याचं एकच ध्येय ते म्हणजे मुलांना शिकवायचं मोठं करायचं, कामावतं बनवायचं. पण पांडुरंगाने सविता बरोबर क्रूर चेष्टा केली. सविताची मोठी मुलगी अश्विनी दहावीत शिकत होती. अश्विनीच्या वर्गातील सर्व मुली फिझिकली मॅच्युअर झाल्या होत्या. पण अश्विनी अजून मॅच्युअर झाली नव्हती. खूप उशिरा सविताच्या लक्षात आलं की आपली मुलगी दहावीला गेलीय पण तिला अजून पाळी आली नाही. शेवटी रोजंदारी करून बचत केलेले 1800 रुपये बरोबर घेऊन ती बीड म्हणजे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अश्विनीला डॉक्टरकडे घेऊन गेली. त्या लेडी डॉक्टरने अश्विनीच्या सर्व तपासण्या केल्या आणि सविताला सांगितलं सॉरी ही मुलगी कधीच मॅच्युअर होणार नाही. डॉक्टरचे देण्याइतक पण पैसे सविता जवळ नव्हते. ती लेडी डॉक्टरनी सविताची परिस्थिती पाहून तिची वरील फी माफ केली.
        शेवटी आईच ती. पोरीच्या आयुष्याचं कसं होणार या चिंतेने ग्रासून गेली. गेवराई तालुक्यातील एका डॉक्टरने सांगितलं, तु मुलीला घेऊन सोलापूरला डॉक्टर भोसलेकडे जा. डॉक्टरनी सविताला माझा मोबाईलनंबर पण दिला. मला कॉल आला प्राथमिक चर्चा झाल्यानंतर मी इतकंच सांगितलं सविता मुलीला घेऊन माझ्याकडे ये. सविता अश्विनीला घेऊन माझ्याकडे आली. मी सर्व रिपोर्ट्स पाहिले. सविता आणि ती छोटी अश्विनी मी काय बोलतोय म्हणून डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे पाहत होते. डॉक्टर भोसले म्हणजे त्या मायलेकींना एक आशेचा किरण होता. रिपोर्ट पाहून मी सांगितलं की सविता अजिबात घाबरू नकोस. अश्विनी 100 नव्हे 101% मॅच्युअर होणार पण किमान दीड दोन वर्ष वेळ लागेल. मी असं बोलल्यावर त्या मायलेकीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सविताने तिची कौटुंबिक सर्व परिस्थिती मला सांगितली. डॉक्टरसाहेब नवरा दारुडा आहे. मी मोलमजुरी करून लेकरं जताण करतेय. मला तुमची फी कशी परवडणार? तुमच्या फी बरोबर दरवेळी गेवराई जिल्हा बीड वरून सोलापूरला येणं जाण तो खर्च पण असणार. डोळ्यात पाणी आणून ती माऊली बोलत होती. रोज वेगवेगळ्या पेशंटमध्ये वावरत असल्यामुळे मला लगेच समोरच्याच्या भावना समजतात. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय ते मला लगेच समजते. पण सविता जे बोलत होती ते हृदयातून बोलत होती.
     शेवटी मी सविताला एकच म्हटलं, मला लहान दोन बहिणी आहेत. मला मोठी बहीण नाही. आजपासून तु माझी मोठी बहीण. तुझी मुलगी अश्विनी म्हणजे माझ्या भाचीसारखी. माझ्याच भाचीला असा प्रॉब्लेम झाला असता तर मी उपचार केला नसता का?? मी असं बोलल्यावर तिला काय वाटलं माहिती नाही.मला काही समजायच्या आधीच,लगेच उठून सविताने माझ्या पायावर डोकं ठेवलं.तिने पायावर डोकं ठेवलं पण मी खूप खजिल झालो. पुढे बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या.मी सविताला सांगितलं की तु फक्त तूझ्या मुलीला घेऊन मी सांगेल तेव्हा येत जा. मी ट्रीटमेंट सुरू केलीय.
        जाताना सविताने 10,20,50 च्या चुरगळलेल्या काही नोटा माझ्या टेबलवर ठेवल्या. सविताचा प्रामाणिकपणा पाहून मी भारावून गेलो होतो. सविताला म्हटलं, सविता मी तुला मघाशीच बोललो, तु माझी थोरली बहीण आहॆस. बहिणीकडून कोण पैसे घेतो का? सविता तूझ्या मुलींची सर्व ट्रीटमेंट तर मी मोफत करणार आहेच, पण सर्व मेडिसिन पण मी माझ्या स्वखर्चातून घेऊन देईन. आणि तुम्हा दोघींना माझ्याकडे येण्याजाण्यासाठी पैसे कमी पडले तर माझ्याकडून लहान भाऊ समजून हक्काने मागून घे. मी असं बोलल्यावर सविता खूपच इमोशनल झाली. साहेब कोणत्या जन्मात फेडू तुमचे उपकार असं म्हणतं सविताने हात जोडले. मी सविताला म्हटलं याचं जन्मात फेड उपकार, फक्त दरवर्षी मला राखी बांधत जा.
     नोव्हेंबर 2019लाच अश्विनीची केस टोटल सॉल्व्ह झाली. गेल्या वर्षी माझ्या सांगण्यावरून डॉ. खाडिलकर ऑंटीनी अश्विनीला शिक्षणासाठी दत्तक घेतलेय. आता आपली अश्विनी B.A.M.S करतेय.गरज पडेल तेव्हा मी त्यांना प्रवासासाठी पण पैसे दिले.आज अश्विनी फिझिकली मॅच्युअर आहे. रिझल्ट येऊन 3/4 वर्ष झाली पण सविता प्रत्येक रक्षाबंधनला मी जिथे असेल तिथं येऊन मला राखी बांधते. येताना आवर्जून माझ्या आवडीची मिरचीचा ठेसा आणि बाजरीची भाकरी घेऊन येते.
     माझ्या सख्या दोन बहिणी मला रोज कॉल करत नाहीत पण सविता आणि अश्विनी मला रोज कॉल करतात. फक्त एकच प्रश्न असतो की सर कसे आहे तुम्ही??

डॉ. वैभवसिंह सुभाष भोसले. (सोलापूर )
व्हाट्सअप नं :-9011950609

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...