मोहिनी... वय वर्षे एकोणीस, रंग गोरा तशी दिसायला सुंदर.
कुठल्याही तरुणाला "मोहिनी "घालेल असं सौंदर्य.
जणू काही मधुबालाच!
अशा ह्या मोहिनीच्या प्रेमात का कुणी पडू नये?
आणि आकाश तिच्या प्रेमात पडला.
छान असला तरी चेहरा जरा सुमार दिसायचा.
मोहिनी त्याला प्रचंड आवडली होती. कधी तिला मनातलं सांगतोय असं झाला.
ती वेळ आली दोन महिन्यानंतर.
तोपर्यंत तो तिला असचं दुरूनच पाहायचा.
एका दुपारी वाटेतचं त्यानं तिला गाठलं.
"एक विचारायचं होतं."
"विचारा न मग "
"राग तर नाही ना येणार?"
"आधी कळू तर द्या तुमचं म्हणणं."
"तू खूप आवडतेस मला."
"वेडा आहेस का."
"हवं तर तू म्हणं वेडा."
"ये कोण कुठला तू, असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली."
"थोडं ऐकून घे "
"काहीही ऐकायचं नाही, तोंड बघ आरश्यात आधी."
"असं म्हणू नको खूप सुखात ठेवेन मी."
"तू निघ आता."
"अग पण.."
"पण-बिन काही नाही, निघ आता नाहीतर ओरडेन मी."
अपमानित होऊन निघाला तो.
काळीज दुःखानं भरून निघालं.
~~~
"राजधानी "बारमध्ये बसला तो.
एकटाच.
उगीचं आपलं दुःख उगाळतं.
व्हिस्कीचा एक पेग झाला.
नंतर दोन..
तीन...
चौथ्या पेगला मात्र तो फुल्ल झाला.
काऊंटरला कसतरी बिल दिलं.
बारच्या बाहेर आला.
चालताना झोत जात होता. बारच्या बाहेर बदामचं झाड होतं,
तिथंच त्यानं अंग टाकलं.
बेवड्यासारखा तो तिथं तसाचं पडून राहिला.
मोहिनीला आठवत तसाचं झोपी गेला.
~~~
आठवडा कसातरी निघून गेला.
आकाशला मोहिनीला विसरण अशक्य होतं.
ती जाईन त्या वाटेला तो अधून-मधून उभा राहून तिला पाहतं राहिला.
तिनं पाहिलं की ती नाक मुरडत होती.
शेवटी...
आकाशनं मोहिनी हा विषय टाकून दिला होता.
आपल्या नशीबात ती नव्हती असं त्यानं स्वतःला समजावलं.
कुठंतरी काम करून आपला उदरनिर्वाह करावा, असं त्याला वाटू लागलं.
त्याचे काही मित्र पुण्यात होते.
त्यांच्या ओळखीने पुण्यात काम मिळेल असं त्याला खात्रीने वाटतं होतं.
मोहिनीनं अपमान केला तिथं त्याला राहू वाटेना.
आई -बाबाच्या परवानगीनं शेवटी त्यानं गाव सोडलं.
~~~
मुंबईला जाणारी एक्सप्रेस पुण्यात सातला पोहचली. स्टेशनवर त्याचा मित्र गौतम त्याला न्यायला आला होता.
आकाशला पुणे तसं काही नवीन नव्हतं.
याआधी तो कितीतरी वेळा तो पुण्यात फिरायला म्हनून आला होता.
पिंपरीत त्याचा मित्र गौतम रहात होता.
स्टेशनच्या बाहेर तो त्याची वाटचं पहात होता.
दोघे मित्र भेटले.
तिथचं जवळ एका कँटीनमध्ये चहा घेतला.
रात्री नऊ वाजता दोघे पिंपरीत पोहचले.
जेवणाचा बेत त्यांनी बाहेर केला.
"पिणं सोडलं का आहे अजून चालू.?"बाहेर आल्यावर गौतमने विचारलं.
"जास्त नाही पण कधीतरी..."
"आलं लक्षात,घेऊ मग आज बऱ्याचं दिवसांनी आपली भेट होतेय."
आकाश थोडा हसला.
दोघं "कुंदन "बार जवळ आले.
आत गेले.
कोपऱ्यात टेबल रिकामं होतं. तेथे जाऊन बसले.
"बोल काय घेणार?"गौतमने विचारलं.
"तोच आपला नेहमीचा."
"म्हणजे व्हिस्की?"
"हो."
तिथल्या वेटरजवळ ऑर्डर दिली.
"काय म्हणतो, गावी सगळं ठीक ना?"
"गावात काही राहिलं नाही म्हणून तर इकडे आलो."
"काय झालं?"
"खूप काही झालं."
"नीट सांगशील का आता."
आकाशनं मग मोहिनीचं सगळं सांगितलं.
"हे असं झालं बघ."
"मुली साऱ्या अशाचं, तू नको टेन्शन घेऊ."
"बर ते माझ्या कामाचं कसं?
"काम मिळेल त्याचं काही नाही."
"रूमवर किती जण असतात.?
"तू मिळून आता चौघं."
बोलत असताना वेटर आला.
दहा मिनिटात त्यांनी सर्व उरकलं.
आणि बिल देऊन बाहेर पडले.
~~
एक- दोन दिवस गेले.
आकाशला रहातो त्या कॉलनीत सुरवातीला करमत नव्हतं.
तिसऱ्या दिवशी जरा बरं वाटायला लागलं.
गौतमने त्याच्या कामाची चौकशी केली होती. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर पत्ता असलेला कागद आकाशकडे दिला. आकाशने पत्ता वाचला.
पत्ता येरवड्याचा होता.
"कुठला पत्ता आहे हा?"
"सिक्युरिटी एजन्सीचा पत्ता आहे हा, तिथं जगताप म्हणून सुपरव्हायझर आहेत, त्यांना भेट."
"ओळखीचा आहे का?"
"माझ्या नाही, पण माझ्या मित्राचा त्यांचं दुपारी फोन लावला."
"तरी पण सिक्युरिटी गार्ड म्हणजे..."
"माहिती आहे तुला आवडणार नाही पण, निदान चांगला जॉब मिळेपर्यंत कर हे काम तू."
"तु म्हणतो ते बरोबर आहे, आजच भेट घेतो त्यांची."
"ठीक आहे, कधी निघतो?"
"निघतो लगेच., तसं पाहिलं तर इथं थांबून बोअर होतं जरा."
"पैसे आहेत हा देऊ."
"त्याची काही गरज नाही, लागले की मागेन की."
आकाश दुपारी निघाला.
येरवड्यात पोहचला तेव्हा चार वाजून गेले होते.
दहा मिनितात ऑफिस सापडलं.
महत्वाची कागदपत्रे तिथं जमा केली.
काम सर्व ओके झालं.
हिंजवडीला एक मेडिकल कंपनी होती. तिथं त्याची सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमणूक झाली.
सिक्युरिटी एजन्सीकडून त्याला ड्रेस मिळाला.
~~~
त्याचं रुटीन व्यवस्थित बसलं.
कंपनीत जाण्या-येण्यासाठी बसची सोय होती.
कामाच्या व्यापात असताना मोहिनी प्रकरण विसरून गेला.
नाहीतरी कधीतरी तिची आठवण आली की तो अस्वस्थ व्हायचा,आणि आता मागचं सगळं तो विसरून गेला.
साधारण तीन महिने गेले.
दुपारी सेकंड शिफ्टला असताना शिंदे साहेब राऊंडला आले.
आकाशाची पर्सनॅलिटी त्यांना आवडली.
"नाव काय तुमचं "शिंदे साहेबांनी विचारलं.
"आकाश सावळकर "
"कुठं रहाता?"
"पिंपरीत."
"तुमचं गाव कोणतं?"
"सोलापूर.".
"ठीक आहे, उद्यापासून इथं काम करायचं नाही."
"काही चुकलं का माझं?"
"तसं काही नाही उद्या ऑफिसला येऊन भेटा."
"का सर?"
"तुम्ही रहाता तिथं जवळचं चिंचवडला एक कंपनी आहे, तिथं सिक्युरिटी सुपरव्हायझर जागा खाली आहे. तिथं तुमची नेमणूक होईल."
"म्हणजे?"
"तुमचं प्रमोशन होतयं अभिनंदन सावळकर."
"थँक्यू सर."
"ठीक आहे या उद्या ऑफिसला."
"हो सर."
रात्री शिफ्ट संपून घरी यायला साडे-अकरा वाजले.
प्रमोशन मिळाल्याचं गौतमला सांगितलं.
तो पण भलताच खूष झाला.
"पार्टी कधी देतोस सांग?"
"तुला कधी हवीय.?"
"आता."
"चल मग."
आकाशाचं लक्ष पलंगावर गेले.
"कोण झोपलंय?"
"निलेश."
"घे मग त्याला पण."
निलेशला मग उठवलं. यायला कसातरी तयार झाला.
तिघे मिळून हायवेच्या जवळ असलेल्या "रविकिरण "बारकडे गेले.
पार्टी म्हटलं की घसा ओला करणं आलं. तिघात व्हिस्कीचे दोन बंपर घेतले.
पेग भरले गेले.
"चिअर्स "
तिघात बारीक आवाज घुमला.
~~~
साधारण दीड वर्षाचा काल लोटला.आकाशचा पगार चांगला वाढला होता.
चांगला कमावता झाला होता.
आणि चालू वर्षात घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलं.
मुलगी जवळच्या नात्यातली होती.
त्यानं जवळचं नवीन रूम घेतली. जुनी रूम सोडताना त्याला खूप वाईट वाटत होतं.
त्याच्या नव्या आयुष्याला सुरवात झाली.
रविवारी सुट्टी असली की आकाश जुन्या रूमवर जायचा. मित्राच्या भेटीत छान वेळ जायचा.
एका रविवारी रूमवर पत्त्याचा डाव रंगला. निलेशच्या मोबाईलची रिंग वाजली.
दोन मिनिटं तो काहीतरी बोलला.
"गौतम अरे अचानक मिटिंगचं ठरलं, जावं लागतयं."
"कळली तुझी मिटिंग कसली असती ते."
"माहिती आहे ना तुला जातो मग."
"जा लेका, पण नाद बेकार बरं का."
पण निलेश हे ऐकायला थांबला नाही.
"काय रे काय भानगड ही."मध्येचं आकाशानं विचारलं.
"काही नाही रे, थोडा बाहेरचा नाद आहे याला."
"वाटतं नाही याला बघून."
"चेहऱ्यावरून हावभाव ठरवायचे दिवस गेले आता."
"तरीपण हा कुठं गेला?"
"नवीन कॉलगर्ल आली, असं रात्री म्हणतं होता."
"याला कसं कळतं.?"
"यांचे कॉन्टॅक तसं असतं."
"म्हणजे?"
"नवीन कुणी आलं की लगेच यांना मेसेज येतो. मग हे फोटो मागून घेतात. पसंत पडली जातात अशी लोक."
"बाप रे.., तुझ्याकडे आहे का फोटो.?"
"मी कशाला या फंदात पडतोय., पण एक मिनिट मागच्या आठवड्यातला फोटो आहे माझ्याकडे."
"म्हणजे तू पण..."
"तसं नाही रे, निलेशने मला सहज पाठवला होता."
"दाखवं मला."
"का तुला जायचं का?"
"अरे लग्न झालयं माझं, बघू कशी असते कॉलगर्ल.."
गौतमने मग मोबाईलवर आलेला एक फोटो दाखवला.
"हि बघ."
आकाश फोटो जरा न्याहाळून पाहू लागला.
"नाव काय रे हीच?"
"उर्मिला."
"भेटेल का?"
"काय म्हणतो?"
"अरे आता भेटेल का?"
"आता तर म्हटला की, लग्न झालयं म्हणून."
"भेटेल का नाही सांग आधी.?"
"बघतो आता कुणाकडे नंबर भेटतो का ते., नाहीतर संध्याकाळी निलेश आल्यावर कळेल काहीतरी."
~~~
दुपारी आकाशच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यावेळी तो कंपनीत होता.
"बोल गौतम."
"तुझं काम झालं बघ."
"कुठलं रे?"
"विसरला का लगेच."
"दे बाबा आठवण करून."
"उर्मिलाचा नंबर भेटला बघ."
"कुठं भेटेल सांग आधी?"
"एक लॉज आहे, पुण्याच्या थोडं बाहेर. तिथं भेटेल ती, बाकी निलेशला फोन करून विचार."
"ठीक आहे लगेच करतो."
आकाशने लगेच निलेशला फोन लावला.
दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला.
"निलेश एक काम होतं."
"उर्मिला संदर्भात का?"
"हो "
"कधी सेटिंग लावतो.?"
"कधी निवांत आहे तू?"
"परवा."
"ठीक आहे जाऊ मग."
"ओके."
गुरुवार आला.
दोघांचं प्लॅनिंग ठरलं.
आकाशनं त्याची बाईक घेतली.
दोघं निघाले. तासाभरात ते पुण्याच्या थोडं बाहेर आले.
आकाशनं बाईक थांबवली.
"काय झालं?"निलेशनं विचारलं.
"चहा घेऊ, समोर स्टॉल आहे."
छोटा स्टोल होता. बसायची सोय नव्हती.
दोघं उभ्याने चहा पिऊ लागले.
"निलेश एक विचारू?"
"विचार ना."
"रेट काय म्हटला तिचा.?"
"अडीच हजार."
"काही अडचण?"
"तू नको टेन्शन घेऊ."
"तिथल्या मॅनेजरला फोन लावून बघ."
"एक मिनिटं लगेच लावतो."
निलेशने मॅनेजरला फोन लावला. दोन -तीन मिनिटं बोलला.
नंतर फोन ठेवून दिला.
"काय झालं?"
"रूम नंबर सात मध्ये थांबलीय ती."
"अजून किती वेळ लागेल जायला.?"
"साधारण दहा मिनिटं."
दोघं लगेच तिथून निघाले.
~~~
लॉजसमोर गाडी थांबली.
नावही दिमाखात झळकत होतं.
"सप्ततारा "
निलेशला त्याने बाहेर थांबवलं. तो आत जाऊ लागला.
काळीज धडधडत होतं त्याचं.
रूम नंबर सात जवळ तो आला.
कॉलबेल पुश केली, तसा आतून मधाळ आवाज आला.
"दार उघडं आहे, या आत."
तो आत आला.
छानपैकी पंजाबी ड्रेस तिनं घातला होता.
"दाराला आतून कधी घाला."
"त्याची गरज नाही."तो बोलून गेला.
तिनं त्याच्याकडे पाहिलं.
"नाव काय तुमचं?" आकाशनं प्रश्न केला.
"उर्मिला."
"उर्मिला का मोहिनी नक्की कोणतं नाव.?
विजेचा झटका बसावा तसं तिनं आकाशकडे पाहिलं.
"कुठून आला तुम्ही आणि तुम्हाला माझं नाव कसं माहिती.?"
"विसरलीस मला?"
"हो.. काही आठवतं नाही."
"कसं आठवणार सौंदर्याचा माज होता ना तुला, मी तोच आहे गावी असताना तुझ्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं होतं."
"तो... तो तूच आहेस."
"हो मीच, खरं तर तुझ्यामुळे मी गाव सोडलं. आणि इथंच देवानं माझं नशीब बदललं. लग्न झालं, चांगली बायको भेटली. मुद्दाम तुला भेटायला आलो, वाटलं होतं आयुष्यात परत तुझं तोंड पहायला नको पण, शेवटी तुझं हे बदललेलं पहावं म्हटलं एकदा,मोहिनी ते थेट उर्मिला, बघितलं वेळ कशी येते माणसांवर."
ती सुन्न होऊन ऐकत होती.
"तुझा इथपर्यंत प्रवास कसा झाला हे ऐकायची सुद्धा इच्छा नाही, निघतो मी."
त्यानं खिशातून शंभरच्या काही नोटा काढल्या.
"हे घे तुझा रेट दोन हजार आहे ना, हे चार आहेत मला कुणाचा वेळ फुकट नकोय गुड बाय."
तसाच तो निघून गेला.
उर्मिला अचंबित होऊन आकाशकडे बघत राहिली.
सुन्न होऊन !
स्वतःच्या सौंदर्याचा गर्व आणि अहंकार अजिबात असू नये. तुम्हाला जर एकादी व्यक्ती आवडत नसेल तर तिला स्पष्टपणे सांगा की, तुम्ही मला आवडत नाही. पण कोणाच्या भावना दुखवू नका. कारण जर तुम्ही एखाद्याच्या भावना मुद्दाम दुखावल्या तर तुमची वेळ फिरायला आणि दिवस बदलायला वेळ लागत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा