दोन आजारी माणसे एका हॉस्पिटलच्या खोलीत एकत्र होती. त्यापैकी एकाचे पलंग खोलीतील एकमेव खिडकीजवळ होता. दुर्दैवाने, दुसरा रुग्ण हालचाल करू शकत नव्हता आणि त्याला पलंगावरच सरळ पडून रहावे लागत होते. खिडकीजवळचा माणूस पलंगावर पडलेल्या रुग्णाला दररोज बाहेर काय दिसते ते सांगत असे.
"किती सुंदर हवामान आहे ! तिथे समोरचा उद्यान खूपच सुंदर दिसतंय. तिथे एक तलावही आहे. बदकं पाण्यात खेळताहेत. तीन मुलं त्या तलावात त्यांच्या प्लॅस्टिकच्या होड्या तरंगवताहेत. एक वृद्ध दांपत्य हातात हात घालून, विविध रंगांच्या फुलांनी सजलेल्या मार्गावर चालताहेत. दूरवरून शहरातली गगनचुंबी इमारतीही दिसताहेत."
खिडकीजवळचा माणूस दररोज त्याच्या खोलीतल्या मित्राला बाहेर काय चाललंय ते सांगत असे. जो पलंगावर होता, तो डोळे मिटून हे सर्व बाहेरचे दृश्य एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर आणत असे. यामुळे त्याला खूप मदत होत होती. हे त्याच्यासाठी उपचारात्मकही होते आणि त्याला दैनंदिन जीवनातील निराशेपासून सुटका मिळवून देणारंही होतं.
आठवडे निघून गेले. एके संध्याकाळी, खिडकीजवळचा माणूस शांतपणे झोपेतच वारला.
दोन दिवसांनंतर, पलंगावर पडलेल्या रुग्णाने दुसऱ्या पलंगावर नेण्याची आणि त्याच्या माजी खोलीमित्राच्या आवडत्या खिडकीजवळ जाण्याची विनंती केली. नर्सने त्याची विनंती मान्य केली आणि आवश्यक ती व्यवस्था केली. हळूहळू आणि वेदनेसह, तो माणूस पलंगावरून उठला, बाहेरचं जग स्वतः पाहण्यासाठी उत्सुक होता. जेव्हा त्याचे डोळे एका पोकळ भिंतीवर पडले, तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं कारण बाहेर फक्त एक भिंत होती. तो खूपच अवाक आणि आश्चर्यचकित झाला. मग त्याने नर्सला बोलावलं आणि कुतुहलाने विचारलं:
"माझा शेजारी मला जे काही सांगत होता, ते सगळं तो कसं पाहू शकला? तेव्हा नर्सनं त्याला सांगितलं की इथे भिंतीशिवाय दुसरं काहीही नव्हत. तो माणूस अंध होता आणि तो भिंतसुद्धा पाहू शकत नव्हता. जरी तो काहीही पाहू शकत नव्हता तरी तो कल्पित आनंददायी वातावरणनिर्मिती करून त्याच्या खोलीमित्राचा दिवस आनंदी करू इच्छित होता."
बोध
कुठलाही हेतू न ठेवता दुसऱ्याला आनंदी करण्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही. कारण आनंद वाटून घेतला, तर तो दहापट वाढतोच. त्यामुळे आपल्याकडून दुसऱ्याला जे जे काही चांगल देता येऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला तर त्याहून मोठं सुख आणि पुण्यकर्म कुठलही असू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा